Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला महापौर के लिए 41 की जादुई संख्या पूरी होते ही सत्ता की लड़ाई गरम

JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 07:46:02
Akola, Maharashtra
अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ४१ नगरसेवकांचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ३८ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंना आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार फील्डिंग सुरू असून, काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत महापौर पद कोणाकडे जाणार ? यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच अपक्ष उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, अकोला महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. काँग्रेसकडे तीन, वंचित बहुजन आघाडीकडे एक, तर उद्धव ठाकरे गटाकडे दोन महिला नगरसेविका असल्याने महापौर पदावरून चर्चा अडकल्याचं सांगण्यात येत आहे. महापौर पदावर एकमत न झाल्यामुळे चर्चा तात्पुरती थांबवण्यात आली असून, ५ नगरसेवकांची ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका मांडली आहे, ही चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच आम्ही महा फोर चा उमेदवार जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल आहे. काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना सोबत येण्यासाठी आवाहन केले आहे. तर वंचित बहुजन आघाडी सोबत सकारात्मक चर्चा झाली असून महापौर चा निर्णय प्रकाश आंबेडकर येथील असं काँग्रेसने म्हंटल आहे. दुसरीकडे भाजप सत्ता स्थापनेच्या अधिक जवळ असल्याचं चित्र आहे, कारण भाजपला बहुमतासाठी केवळ ३ नगरसेवकांची गरज आहे. तर भाजपकडे १३ ओबीसी महिला उमेदवार आहेत. तर भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी केला असून काही तासातच आम्ही सत्ता स्थापनेची घोषणा करू असं रणधीर सावरकर यांनी इन कॅमेरा प्रतिक्रिया न देता भ्रमणध्वनी द्वारे सांगितलं आहे. आता पाहूया आकड्यांचा खेळ नेमका कसा होऊ शकतो… भाजप समीकरण : भाजप – ३८ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – १ अपक्ष – १ एकूण : ४१ काँग्रेस समीकरण : काँग्रेस – २१ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ६ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ अपक्ष – १ एकूण : ३९ Graphics : अकोला महानगरपालिका – अंतिम आकडेवारी (एकूण जागा : ८०) भाजप – ३८ शिवसेना (शिंदे) – १ राष्ट्रवादी (अजित पवार) – १ शिवसेना (ठाकरे) – ६ काँग्रेस – २१ राष्ट्रवादी (शरद पवार) – ३ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ इतर – २ काँग्रेसचे आकडे पाहता, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र महायुतीतील हे मित्रपक्ष काँग्रेसला साथ देतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Jan 23, 2026 10:46:00
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेत 50 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने यश मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज नाशिक येथील विभागीय कार्यालयात निघाले असून, तेथे अधिकृतपणे गट स्थापन करून नोंदणी केली जाणार आहे. यानंतर महापौर पदाचा उमेदवार 31 जानेवारीपूर्वी निश्चित केला जाणार आहे. यावेळेस भाजपाकडून 28 महिला नगरसेविका निवडून आल्याने, यावेळी महापौर पदावर कोणत्या महिला उमेदवाराची वर्णी लागते ? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.यासंदर्भात आमदार अनूप अग्रवाल यांनी सांगितले की, धुळे शहरासाठी योग्य आणि सक्षम असा चेहरा महापौरपदी दिला जाईल. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 23, 2026 10:04:44
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटलांनी राष्ट्रवादी शरद पक्षाचा जाहिरनाम केला प्रसिध्द. सांगली जिल्हा परिषद निवडणुकिची रणधुमाळी सुरू झालेली है, तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला है, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला है. तासगाव मध्ये पार पडलेल्या या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यामधून रोहित पाटलांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणूक या स्वबळावरच लढल्या जातील,अशी संकेत देत आघाडीबाबत घटक पक्षांसोबत बोलणी देखील सुरू असल्याचे सांगितले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Jan 23, 2026 09:36:01
Amravati, Maharashtra:पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल; या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल. सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा पलटवार. अँकर :- एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले असून राणा यांनी सहर शेख यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे काय आहे ही भानगड पाहूया झी 24 तास स्पेशल रिपोर्ट. दोन आवाज बुलेट स्पष्ट करतात: एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी टीका केली आहे. पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा रक्त घेऊन आम्ही काम करतो या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या संपूर्ण प्रकारावर बावनकुळे यांनी सहर शेख यांचे कान टोचले आहेत. निवडून आल्यावर अतिउत्साहीपना दाखवणे योग्य नाही पाकिस्तानचा झेंडा व भडकवणे हे करू ते करू असे योग्य नाही आणि असे उत्साह जास्त काळ टिकू शकत नाही असा सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. उत्साहात भाषण केल्याप्रकरणी सहर शेख यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान टोचले आहे. मात्र अशाच प्रकारचे भडकावू भाषण भाजपमधील काही हिंदुत्ववादी नेत करत असतात त्यामुळे त्यांचेही कान बावनकुळे टोचणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 23, 2026 09:33:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना संपवण्यासाठी दोन कोटींची सुपारी दिल्याच्या आरोप प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. जरांगगेंची सुपारी घेतल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपी पैकी एकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यावर अडीच कोटींची सुपारी घेतल्याचा आरोप होता. तर यासाठी कांचन साळवी याने धनंजय मुंडे आणि दोन्ही आरोपींमध्ये मध्यस्थी केल्याचा आरोप होता. दरम्यान वकील धनंजय गव्हाड पाटील यांनी आरोपींच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज केला होता. ज्यात साळवी यांचा जामीन अर्ज मान्य करण्यात आला आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jan 23, 2026 09:22:18
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात मराठी भाषा विभाग संचालनालय तर्फे बोलींचा जागर कार्यक्रम मराठी भाषा विभाग संचालनायक तर्फे भंडारा जिल्ह्यातील समर्थ महाविद्यालय लाखनी येथे भाषेंचा जागर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ह्या भाषेच्या जनजागृती करिता ग्रंथदिंडी काढण्यात आली तसेच पथनाट्य सादर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र शासन आपल्या बोलीभाषा विषयी नेहमी जागृत असते या अनुषंगाने बोली भाषेमध्ये प्रोत्साहन मिळावं व बोलीभाषा जिवंत राहावे व त्यांच्या संवर्धन व्हावं पुढील पिढी करिता उपयोगी व्हाव्यात म्हणून बोलींचा जागर हा कार्यक्रम अभिनव कार्यक्रम महाराष्ट्राच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जात आहे त्या भागांमध्ये असलेल्या बोलीभाषेत उत्थान यामुळे मिळणार आहे समर्थ महाविद्यालय लाखनी हे भंडारा जिल्ह्यात येत असल्यामुळे इथं असणाऱ्या ज्या भाषा आहेत. या भाषा मधल्या दोन भाषांना केंद्रस्थानी ठेवलं एक आहे कोळी आणि दुसरी आहे कोसरी या दोन भाषा लोकांना अवगत व्हाव्यात व पुढील पिढींना त्याचं ज्ञान व्हावं या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला कला, साहित्यिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 09:18:24
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 23, 2026 09:17:54
Kolhapur, Maharashtra:आरटीओ विभागाला पंधरा दिवस अगोदर स्कूल व्हॅन बाबत दक्षता घेण्याच्या सूचना देऊनही आणि मॉक ड्रिल घेऊनही बदापूरची घटना घडली हे दुर्दैव असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे। घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा अगोदर का दक्षता घेतली नाही असा संतप्त सवाल त्यांनी आरटीओ विभागावर व्यक्त केलाय। शिवाय जे नियम शाळा पाळत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय। कोणत्याही सरकारने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या पाठीशी राहणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे। महिला आयोगाने या घटनेची गंभीर दाखल घेतली आहे। पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली。
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Jan 23, 2026 09:17:25
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Jan 23, 2026 08:50:42
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील भाजपचे 65 नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवन येथे दाखल. नवी मुंबई मनपा मध्ये भाजपाच्या गट नेते पदी सागर नाईक यांची नियुक्ती. माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नगरसेवक कोकण भवन येथे दाखल. 14 गाव येथील अपक्ष नगरसेवकानेदेखिल भाजपला पाठिंबा दिलाय त्यामुळे भाजपाची संख्या 66 वर गेलेय. आम्ही महापौर पदासाठी काही नावे वरिष्ठान्ना देणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या नावाला सहमती दर्शवतील तो महापौर होईल. लोकशाही मध्ये सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. बाईट - संजीव नाईक माजी खासदार बाईट- सागर नाईक- गट नेते भाजपा नवी मुंबई मनपा
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 23, 2026 08:49:25
Nagpur, Maharashtra:राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशात नगरपरिषद व महानगरपालिका प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये देखील स्वीकृत सदस्यांची नेमणूक व्हावी असा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे महत्वपूर्ण विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. बावनकुळे यांनी काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्वीकृत सदस्यांबाबत पत्र लिहून मागणी केली होती. नुकत्याच महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. सत्ता समीकरणे बनली. यावेळी राजकीय पक्षांकडून ज्यांना उमेदवारी दिल्या जाऊ शकली नाही किंवा जे महत्वाचे उमेदवार पराभूत झाले. अशांचे पुनर्वसन करण्यासाठी संख्याबळानुसार स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली. याच धर्तीवर आता मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही "स्वीकृत सदस्य" हे महत्त्वाचे राजकीय पद येण्याची शक्यता आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत दहा सदस्या मागे एक आणि पंचायत समितीमध्ये पाचसदस्याां मागे एक स्वीकृत सदस्य निवडावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर आता ग्रामविकास मंत्री यांनी चर्चा केली आहे. याबाबत शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी सकारात्मक पद्धतीने मदत करण्याचे सांगितले आहे. येत्या सभागृहात हा कायदा होईल. असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. आरक्षणामुळे अनेकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे स्वीकृत सदस्यांबाबत कायद्यात आवश्यक ते बदल करून सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 08:34:17
Akola, Maharashtra:नवनीत राणांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र निषेध. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. देशात केवळ भगवा आणि निळा रंग राहील, तर हिरव्या रंगाने पाकिस्तानात जावं, असं विधान नवनीत राणांनी केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी नवनीत राणांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध केला आहे. अशा प्रकारची वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी असून देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारी आहेत, असं फैजान मिर्झा यांनी म्हटलं आहे.इतकंच नव्हे, तर नवनीत राणा या पुन्हा कशा खासदार होतील, याचा त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोलाही फैजान मिर्झा यांनी लगावला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top