Back
अकोला भर्ती घोटाले में स्वास्थ्य सेवा अधिकारी पर गंभीर आरोप, CBI जांच की मांग
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 09:08:48
Akola, Maharashtra
सरळ सेवा भरती 2024 मधील एनएसडब्ल्यू भरतीत झालेल्या कथित गैरव्यवहारावरून अकोल्याचे तत्कालीन उपसंचालक आरोग्य सेवा , कमलेश भंडारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते फैजान मिर्झा यांनी या दोघांनी संगनमत करून भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.या घोटाळ्याचा तपास चुकवण्यासाठी कमलेश भंडारी यांनी अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करून “बळीचे बकरं” बनवल्याचा आरोपही मिर्झा यांनी केला. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे तसेच अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात देखील दाखल केल्याचं त्यांनी सांगितले. दरम्यान, कमलेश भंडारी सध्या मुंबई येथे संयुक्त संचालक (Joint Director) पदावर रजू झाले असले तरी ते पुन्हा अकोल्यातील उपसंचालक आरोग्य सेवा पदावर परत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप मिर्झा यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी बदली झालेला अधिकारी पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी प्रयत्न करत असल्याने शंका आणखी गडद होत असल्याचे ते म्हणाले. भंडारी यांची अकोल्यात पुनर्नियुक्ती झाल्यास त्यांनी सरळ सेवा भरती प्रक्रियेत केलेल्या कथित गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्याचा गंभीर आरोप मिर्झा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
142
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowNov 22, 2025 10:06:260
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 09:54:040
Report
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 09:23:05151
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 22, 2025 09:16:2766
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 09:08:21163
Report
PNPratap Naik1
FollowNov 22, 2025 09:05:45120
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 22, 2025 09:05:34124
Report
ABATISH BHOIR
FollowNov 22, 2025 09:05:00111
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 22, 2025 09:04:45154
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 22, 2025 08:02:48140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 22, 2025 08:02:29104
Report
KJKunal Jamdade
FollowNov 22, 2025 08:00:49204
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 22, 2025 07:37:08132
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 22, 2025 07:32:29169
Report