Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

कर्जत नगरपंचायत ने अजित पवार के श्रद्धांजलि फलक हटाने पर शहर में नाराज़गी

LBLAILESH BARGAJE
Feb 04, 2026 13:45:36
Ahilyanagar, Maharashtra
कर्जत, अहिल्यानगर अहिल्यानगरच्या कर्जत नगरपालिका ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रद्धांजली फलक काढल्याने कर्जत शहरात तीव्र नाराज़गी श्रद्धांजली फलक हटवल्याच्या निषेधार्थ कर्जत शहरात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दीड तास वाहतूक ठप्प नगरपंचायतीवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप, मुख्याधिकारी बडतर्फ करण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. फलक आणि छायाचित्राची विटंबना झाल्याचा आरोप, प्रांताधिकारी नितीन पाटील यांना निवेदन निःपक्षपाती चौकशी करून श्रद्धांजली फलक पुन्हा सन्मानपूर्वक लावण्याची मागणी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 04, 2026 14:48:58
Latur, Maharashtra:जिल्हा परिषद और पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री गुलाबराव पाटील हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभर त्यांच्या सभा पार पडल्या कार्यकर्त्यांशी संवाद ही गुलाबराव पाटील यांनी साधला त्यानंतर ते लातूर विमानतळाकडे रवाना झाले.... पण क्लिअरन्स न मिळाल्यामुळे हवाई उड्डाण ऐनवेळी रद्द करण्यात आले आहे. हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथून आवश्यक परवानगी न मिळाल्याने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उड्डाण रद्द झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ निर्णय घेत रस्ते मार्गाने संभाजीनगरकडे प्रस्थान केले आहे. गुलाबराव पाटील यांचे ते विमान सहा आसन क्षमतेचे आहे. विमान उड्डाणासाठी सज्ज होते, मात्र क्लिअरन्सअभावी विमानतळावरच थांबाव लागलं आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 04, 2026 14:30:18
Pune, Maharashtra:Headline : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी टोल वसुली करून देखील अशा परिस्थितीत नागरिकांना उपाययोजना नाही Anchor : पंचवीस तासानंतर पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली असून उर्से टोल नाक्यावरील वाहने मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागलीये. मुंबई कडून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनवरून ही वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी अपघातग्रस्त टँकर मधील गॅस अन्य टँकर मध्ये शिफ्ट करण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे वाहतूक पुण्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या लेनवरून सुरू होण्यासाठी आणखी चार तासांचा अवधी लागणार आहे. मात्र या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी आयआरबी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. टोल घेऊन देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आयआरबीने टोल घेऊन देखील कोणतीही उपाययोजना नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या वाहतूक कोंडीत पश्चिम महाराष्ट्रातून MPSC आणि UPSC च्या परीक्षेसाठी विद्यार्थी मुंबई ला जाणार होते, मात्र वाहतूक कोंडीचा फटका या विद्यार्थ्यांना बसला.. बाईट : खोळंबलेले प्रवासी (file.no.04,05,06,07)
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 04, 2026 14:18:03
Dhule, Maharashtra:धुळे जिलेतील शिंदखेडा तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी वस्तगृह अधीक्षकसह संस्थेच्या चेअरमनाला अटक करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील प्रायमरी रेसिडेन्सी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या वस्तीगृहात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी वस्तीगृह अधीक्षकासह संस्थेचे चेअरमनला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनी ही आदिवासी समाजातील असून, वस्तीगृह अधीक्षक विजय भास्कर कोळी याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनीने तक्रार केली असतानाही संस्थेचे चेअरमन सुभाष चौधरी तसेच महिला शिक्षकांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी संस्थेची सखोल चौकशी केली. चौकशीनंतर वस्तीगृह अधीक्षक विजय भास्कर कोळी याच्यासह संस्थेचे संचालक सुभाष चौधरी व दोन महिला शिक्षिका विरुद्ध पिडीत विद्यार्थीनीच्या फिर्यादी नंतर पोक्सो कायदा व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वस्तीगृह अधीक्षक विजय भास्कर कोळी व चेअरमन सुभाष चौधरी याला ताब्यात घेतले असून, शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वस्तगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यीनीच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 04, 2026 13:53:43
Kalyan, Maharashtra:डोंबिवली मध्ये मराठी तरुणीचा लागला स्टॉल. मनसे नेते राज ठाकरे यांचा फोटो लावून लावण्यात आला स्टॉल. अविनाश जाधव यांच्या हस्ते लावण्यात आला शोर्मा चा स्टॉल.. मराठी तरुणी एकता सावंत हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो लावून शोरमाचा स्टॉल उभारला असून व्यवसाय सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत येऊन एकता सावंतच्या शोरमा स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अविनाश जाधव म्हणाले की, २०१७ साली आम्ही वारंवार ओरडून सांगत होतो की १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांवर बंदी घाला. मात्र पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने आमचे ऐकले नाही. आज २०२६ उजाडले तरी परिस्थिती जैसे थेच आहे. सर्वांनी नियम पाळावेत, त्यानंतर आम्हीही नियम पाळू. नियम सर्वांसाठी समान आहेत, मग केवळ या मराठी तरुणीवरच बंदी का घातली जाते?असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 04, 2026 13:19:21
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 12:51:14
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची तुमची लायकी नाही, - आमदार गोपीचंद पडळकर यांची सुहास बाबरांवर टीका.. अँकर - शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबरांनी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत केलेल्या विधानावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे.सुहास बाबर आणि त्यांचे स्वर्गीय वडील हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आमदार झालेत,त्यांची जाणीव त्यांना नाही,तसेच मुख्यमंत्र्यांवर बोलण्याची तुमची लायकी नाही आणि सत्तेची आलेली मस्ती जिल्हा परिषद निवडणुकीत जनता काढेल,आणि भाजपा पक्ष चालवायला तुमच्या सात पिढ्या याव्या लागतील,तुम्ही भाजपाच्या नादाला लागू नका,याद राखा,असा गर्भित इशारा पडळकर यांनी सुहास बाबरांना दिलाय. बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Feb 04, 2026 12:16:48
Pune, Maharashtra:Anchor: काल आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील पुणे-मुंबई लेनची वाहतूक तब्बल 20 तासांहून अधिक काळ पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की आडोशी बोगदा ते सोमाटणे दरम्यान सुमारे 50 ते 55 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांची अक्षरशः उपासमार झाली. पाणी, चहा आणि अन्नासाठी वाहनचालकांची धावपळ उडाली होती. अखेर उर्से टोलनाक्याजवळील ‘कार्णीवल’ फूड मॉल वाहनचालकांसाठी एकमेव आधार ठरला. येथे चहा, पाणी व नाश्त्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. परिस्थिती इतकी गंभीर होती की कॅश काऊंटरवर कूपन घेतल्यानंतरही “आम्हालाच आधी खाद्यपदार्थ मिळावा” यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. दीर्घकाळ अडकून पडलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर थकवा, अस्वस्थता आणि नाराजी स्पष्टपणे जाणवत होती.ही घटना केवळ अपघातापुरती मर्यादित न राहता, महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी..
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Feb 04, 2026 11:51:25
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज शिवसेनेला दाबू नका – गुलाबराव पाटील यांचा थेट इशारा.... रेणापूरच्या कामखेड्यात शिवसेना नेत्याचं आक्रमक भाषण, राजकीय वातावरण तापलं.... AC :- लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं आहे. शिवसेनेला दाबू नका… १०० दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही १० दिवस वाघासारखं जगून मरायला आलेलो आहोत, असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांना खुलं आव्हान दिलं. इतकंच नाही तर, “जेल हे मर्दांसाठी असतं. मी वर्षभर जेलमध्ये राहिलो आहे. ३०७, ३०२, ३५१ मला सगळं पाठ आहे. आजही माझ्यासोबत पुढं-मागं पोलीस आणि मधे मी बसलोय, हाच आमचा रूबाब आहे,” अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत विरोधकांना ठणकावून इशारा दिला. या वक्तव्यामुळे लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे. साऊंड बाईट :- मंत्री गुलाबराव पाटील
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 04, 2026 11:47:54
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर नाव न घेता टीका दिलीप सोपल 6 वेळा निवडून आले मात्र यावेळेला गाडी चुकली नाहीतर ते मंत्रिमंडळात असते दिलीप सोपल हे अजात शत्रू आहेत. आमदार कसा असावा तरी सोपल साहेबांसारखा असावा. अनुभवी आणि कलाकार माणूस आहे. अतिशय मोठी दुर्घटना महाराष्ट्राने पाहिली. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तोच कार्यकर्ता आम्हाला निवडून देतात. मी शिवसेनेचा प्रमुख असलो तरी कार्यकर्त्यामागे उभा राहणारा कार्यकर्ता आहे. सोपल साहेब मनापासून दोस्ती करतात आणि निभावतात देखील. 1971 साली रोजगार हमीसाठी तत्कालीन आमदार निंबाळकर यांनी इथे आंदोलन केले. त्यानंतर रोजगार हमीबाबत कायदा झाला आणि तो केंद्राने स्विकारला. आज मी इथे आलोय. वैराग तालुका कारावा ही मागणी आहे. मी मंत्रिमंडळात आहे त्यामुळे ती मागणी नक्की पूर्ण करेन. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला 45 हजार कोटी खर्च येतो मात्र आम्ही ती सुरूच ठेवणार. कोणी माई का आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिलेय त्याचे काय? असा प्रश्न विचारतात. मात्र ते देखील आम्ही देणार. मुख्यमंत्री सोबत आमची एक बैठक झालीय. सोपल साहेब इतके वर्षे काम केलेय. समाजसेवा करताय तुम्ही संघर्ष पाहिलाय. वैराग अप्पर तहसील कार्यालय, जवळगाव धरणात पाणी सोडणे आणि बार्शी उपसा सिंचन योजनेला निधी मिळावा या मागण्या आहेत. मी सुद्धा सरकारमध्ये आहे काळजी करू नका. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीका. काही लोकं म्हणतात निधी कुठून आणणार. अरे हा एकनाथ शिंदे पण सरकार मध्ये मी आहे. विकासाकामे करताना दुजाभाव करत नाही. सर्वाधिक सह्या करण्याचे रेकॉर्ड असणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नगरपंचायत मी दत्तक घेतो. आत्ता सांगा कोणती नगरपंचायत पाहिजे. ते खाते माझ्याकडे आहे. नगरपंचायतीला आचारसंहिता नाही. वैराग नगरपंचायतीसाठी तुम्ही 34 कोटी रुपयांचे निवेदन दिले. त्यातील पहिला टप्पा उद्याच देतो. नो चर्चा डायरेक्ट रिझल्ट... बघतो करतो, ठेवतो असलं काही नाही. दिलीप सोपल 7 वेळा निवडून आले. आता आठव्या वेळी देखील येतील मागील वेळी चूक झाली आता नाही होणार आम्ही सोपलांचा मान मरातब ठेवणार. SOUND BYTE : एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 04, 2026 11:07:39
Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांचाही भाजप नेतृत्वावर हल्लाबोल ...... रायगडच्या भाजपमध्ये आंधळे , बहिरे, मुक्यांचं राजकारण ....... रवींद्र पाटील यांचे घराणे संपवण्याचा विडा भाजप वाल्यांनी उचलला ...... आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला संशय ....... राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन शिवसेनेला बाजूला ठेवले ........ रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद सर्वश्रुत असतानाच आता शिवसेना आणि भाजप मधील दरीही वाढत चालली आहे. मंत्री भरत गोगावले यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असतानाच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी जिल्ह्यातील भाजप नेतृत्वावर तोफ डागली आहे. रायगडच्या भाजपमध्ये आंधळे, बहिरे आणि मुक्यांचं राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन आलेल्या नेत्यांनी शिवसेनाला बाजूला ठेवल्याचा आरोप आमदार दळवी यांनी भाजप नेते सतीश धारप यांचं नाव न घेता केलाय. आपण एकत्र येऊन असा प्रस्ताव मी आमदार रवींद्र पाटील यांच्या समोर ठेवला होता. पण भाजप मधील काही लोकांनी रवींद्र पाटील यांच्या घराण्याला संपवण्याचा विडा उचलला असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केलाय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 04, 2026 11:03:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग अँकर - आमच्यासारखे 242 आमदार आहेत,म्हणून मुख्यमंत्री आहेत,असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे सांगलीच्या खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी केलंय,तसेच मुख्यमंत्र्यांना विचारा,सुहास बाबर कोण आहेत,असं चॅलेंज आमदार बाबर यांनी विरोधकांना दिलंय.सांगली जिल्हा परिषद निवडणुकी निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केलं आहे.तसेच आपण काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा चालवतो,असं देखील आमदार बाबर यांनी सांगितले.विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले आहे. साऊंड बाईट - सुहास बाबर - आमदार- शिवसेना शिंदे - विटा-खानापूर
0
comment0
Report
Advertisement
Back to top