Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

गोदावरी नदी के पानी का घोटाला: भोंदू अशोक खरात ने पानी अपने संस्थान में मोड़ा

KJKunal Jamdade
Mar 23, 2026 05:33:28
Shirdi, Maharashtra
दारणा धरणातून गोदावरी नदीत सोडले जाणारे पाणी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना भोंदू अशोक खरातने हे पाणी स्वतःच्या संस्थानाकडे वळवून घेतल्याचं समोर आलंय.. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा शासन निर्णय झाला होता.. मिरगाव येथे शिवनिका संस्थानच्या लागत गोदावरी नदीच्या कालव्यावर बंधारा बांधण्यात आलाय.. त्यामाध्यमातून बिगरसिंचनाच्या नावाखाली हे पाणी स्वतःच्या संस्थाकडे वळवून परिसरात आमराई आणि शेती फुलवली आहे.. त्यामुळे भोंदू खरातने केवळ शासनाचीच नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांचे पाणी पळवून त्यांची देखील फसवणूक केली आहे. दरम्यान अशोक खरात चे कार्यकारणाने बाहेर आल्यानंतर जलसंपदा विभागाने बंधाऱ्याकडे येणाऱ्या पाणीदेखील थांबवलं आहे.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 23, 2026 07:05:57
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हापरिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यमयी घटनेनंतर या निवडी वेळी ज्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे यांचे अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते बापू शिंदे आज स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात स्वतःचा जवाब देण्यासाठी हजर झाले आहेत. बापू शिंदे यांच्या मुलाने हा गुन्हा दाखल केला होता. कोणत्याही प्रकारे माझे अपहरण झालेले नाही असा जवाब त्यांनी सातारा पोलिसांना दिला है. याच बापू शिंदेच्या अपहरण प्रकरणात निवडणुकीच्या दिवशी सातारा पोलिसांनी राष्ट्रवादी च्या अनिल देसाई आणि संदीप मांडवे या दोन सदस्यांना ताब्यात घेतले होते. पण बापू शिंदे यांनी माझे अपहरण झालेले नसल्याचा जवाब दिल्याने मग पोलिसांनी निवडणुकीच्या दिवशी केलेली कारवाई चुकीची असल्याचे समोर येत आहे. बापू शिंदे यांच्या सोबत त्यांच्या राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील हे देखील उपस्थित आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 07:04:24
Khed, Maharashtra:हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या बलिदान दिनानिमित्त आज राजगुरुनगर येथील त्यांच्या जन्मस्थळावर ध्वजारोहण करून स्मरण करण्यात आले. देशभरातून राजगुरु प्रेमी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने राजगुरु वाड्यावर दाखल होत असून, परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला आहे.हुतात्मा राजगुरु स्मारक समितीच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सायंकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी संपूर्ण शहरातून मशाल मिरवणूक काढून हुतात्मा राजगुरु यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 05:47:14
1052
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 23, 2026 05:33:53
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरण कामासाठी यंदा सहाव्यांदा प्रयत्न होणार आहेत. मनपा यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविणार आहे. वर्षानुवर्षे गाळ साचून उथळ झालेल्या आणि शहराला 9 किमी वळसा घालणाऱ्या इरई नदीने गेली अनेक वर्षे शहरात मोठा महापूर आणला आहे. सोबतच कोळसा खाणीतिल ओवरबर्डन माती, वीज केंद्राची राख यामुळे नदीची खोली कमी झाली. अशा वेळेस नदीच्या खोलीकरणाची गरज प्रकर्षाने जाणवली होती. याआधी एकूण 5 वेळा, मनपा, राज्य शासन, पाटबंधारे विभाग यांच्या पुढाकाराने हा अयशस्वी प्रयत्न झाले आहेत आणि यात मोठा निधी वाया गेलाय. मात्र अपेक्षित परिणाम साधण्यात हे प्रयत्न कमी पडले आहेत. या सर्व प्रयत्नांवर टीका करत नदी बचाव कार्यकर्त्यांनी दर्जाहीन कामात जनतेचा पैसा वाया घालविण्यापेक्षा नाम अथवा पाणी फाउंडेशनद्वारे काम करवून घेण्याची मागणी केली आहे.
1089
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 23, 2026 05:20:21
Nagpur, Maharashtra:नागपूर प्रकाश आंबेडकर, वंचित. - दत्ता मेघे यांच्याशी 1980 ल सबंध आला, सामान्य माणसाला संधी मिळाल्यावर सोनं करून साधेपणाने कसे राहू शकतात असे ते वाक्तित्व होते... - त्यांनी अनेक क्षेत्रात काम केले, त्याना आदरांजली वाहतो... ON मोर्चा - खोमेनीचा मृत्यू झाला, अनेक देशाचा प्रमुखांनी श्रद्धांजली वल्ली, मुजरा मोदीांनी श्रद्धाजली देण्यासाठी चार दिवस लावले... ते अमेरिकेचे गुलाम झाले, गुलाम प्रधानमंत्री देशाला गुलामगिरीत नेते आहे, करार झाला त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे राज्य करतील. - नरेंद्र मोदी हे प्रचारक राहिले आहे, rss जे शिक्षा देते आताच मोदींचे चरित्र बसते का, नाही बसत असेलनतर हटवावे... लोकांचा जो निष्कर्ष काढायचा आहे ते काढतील.. - आम्ही मोर्चा काढणार, पोलिसांना जे काम करायचे ते करतील, पोलिसांचा नाकर्तेपणा काही नवीन नाही, आम्ही संघटन म्हणून ठरवलं, कुठपर्यंत जाऊ देते ते बघू... On cm वक्तव्य - मुख्यमंत्री यांनी EPSTINE फाईलचा पुरावा वाचला नसेल तर ते त्यांच्या पदाला शोभणारे नाही, जी वेळ आली आहे, पदाससाठी लोटांगण घालू नये.. - भाजप फेलिव्हर झाली, त्यांनी पंतप्रधानां बनले, त्यांनी आता सांगावे, - करार झाले आहे त्यावर शंका आहे, epstine आणि त्याचा साथीदार यांनी जे कृत्य केले, त्यात पंतप्रधान अडकले आहे का? शी शंका असल्याने आम्ही त्यावर जाब विचारणार, - मोहन भागवत दिल्लीला गेले माहिती नाही, आम्ही निवेदन सोबत चर्चा करणार होते, ते चर्चा करत नसेल तर RSS चे व्यभिचाराला समर्थन आहे असे आम्ही मानू, ON परवानगी - पोलिसांनी अटक केली तर चांगली बाबा आहे, पोलिसांचे नेहमीच वाक्य आहे, पोलिसानी राजीनामा द्यावा, अजून दुसरं लोक येतील, - आम्ही देशाला वाचवायला निघालो आहे, देशाला गुलाम करण्याचे करार झाले, राफेल पडले याची माहिती नाही, पाकिस्तानचा बाजूला राफेल पडला तर तो वैमानिक कुठे आहे, फ्रान्स सोर्स कोड देत नाही, तुम्ही त्यांच्याशी करार करता, व्हिजव वाढवता येते तो सोर्स कोड देत नाही, पायलट हुशार आहे कर्तबगार आहे ,पण रडारला सोर्स पाहिजे, 300 किलोमीटर वरचा तो भारताकडे नाही असा आरोप केला... - भाजप हे rss चा भाग आहे, त्यामुळे संघाने भूमिका स्पष्ट करावी, की त्याना व्यभिचार पंतप्रधान पाहिजे, की चरित्रवान पाहिजे... - ट्रम्प दोन फाईल वचपा काढण्यासाठी फाईल बाहेर काढणार आहे... -- त्यांच्याकडे पुरावे नसतील तर आज मी भाषणात सांगणार आहे
1022
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 23, 2026 05:00:19
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या भोसे येथील ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या चालकाने दूध व्यवसाय करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. पंढरपूर तालुक्यातील भोसे ऍग्रो प्रोड्यु़सर कंपनीने 2018 साली दूध व्यवसायाच्या नावाखाली प्रत्येक सभासदांना एक लाख 40 हजार रुपयांचे कर्ज स्थानिक बँकेतून मंजूर करण्यात आले. परंतु ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या बचत गट चालवणाऱ्या प्रमुख व्यक्तीने बहुतांश पैसे शेतकऱ्यांना न देता स्वतःच हडप केल्याची आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. बँकेकडून शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरण्याची नोटीस आल्यानंतर आपल्या नावावर कर्ज असल्याचं समोर आलं. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं सिबिल खराब झाला असून त्यांना नवीन कर्ज मिळणे सुद्धा अवघड झालं आहे. सध्या बचत गट बंद पडला आहे. दूध डेअरी सुद्धा बंद आहे. ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीचा प्रमुख फसवणुक झालेल्यांना कोणतीही दाद देत नाही. यामध्ये जवळपास 248 शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झालेली आहे.यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय आहे. याप्रकरणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी करकंब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. परंतु अद्याप कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही.
1073
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 23, 2026 04:51:39
Nagpur, Maharashtra:नागपूर - हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (on दत्ता मेघे ) दत्ता मेघे विदर्भाचे नव्हे महाराष्ट्रच नेतृत्व होत.. त्याच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य दोन्ही सभागृहात त्या नेतृत्व होत.. शिक्षणासाठी संस्थाचा जाळ त्यांनी रोवल.. त्यांचा बराच काळ काँग्रेसमध्ये गेला... त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली.. (On वंचित -काँग्रेस मोर्चा..) संघ आणि काँग्रेसचे मतभेद हा वेगळा भाग आहे.. त्यांच्यावर टीका करत असलो तरी अपेक्षा व्यक्त करणे राजकारणाचा भाग आहे.. मागे जातीय दंगली झाल्या तेव्हा रेशिमबाग मध्ये मोर्चा नेण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.. संघाला शंभर वर्ष पूर्ण होत असताना संघ नोंदणी करण्यासाठी मागणी केली.. यावेळी आम्ही शांततेने आमचा संवाद पोहचवला यावेळी देखील तोच प्रयत्न असणार.. एपस्टीन फाईल सारखीया गंभीर प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर आहे.. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी आमची मोर्चातून मागणी.. (On मोर्चा परवानगी नाकारली ) केंद्र आणि राज्यात गृहखात सत्य मांडताना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो... मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणे मांडतोय.. कोणताही हिंसाचार आम्ही करणार नाही.. तरीही परवानगी नाकारली तरी आमचा मोर्चा निघणार.. देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे.. खरात प्रकरण होऊ कसे दिलेत.. मागील पाच वर्षाच्या काळात आपण गृहमंत्री होता.. त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का ? मुख्यमंत्री यांचा अहंकार प्रत्येक शब्दातून टपकतो.. कोणत्याही माणसाकडे ज्ञान नाही माझ्याकडेच आहे असा अहंकार त्यांच्या वाक्यातून दिसून येतो... अधिवेशन सुरू असल्याने अनेक नेते तिथे गेले.. सर्वाच या मोर्चाला पाठिंबा आहे.. वंचितने आणि आमची तीच भूमिका असल्याने संयुक्त मोर्चा काढत आहोत... यामध्ये राजकीय रूप द्यायचे नाही आणि कोण मोठा हे दाखवायचं नाही... मूळ एपस्टीन फाईल वरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल उघडण्याचा त्यांच कांगावा असावा... एपस्टीन फाईल आली तेव्हा विकृत माणूस किळसवाणा प्रकार करत होता.. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुंग गिळून गप्प होत.. रुपाली चाकणकर यांचा राजीनाम्या मध्ये व्ययक्तिक कारणासाठी राजीनामा दिला असा उल्लेख होता.. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा खालच्या अधिकाऱ्याच लॉबिंग खरात आणि नेते कोणाशी संबंध याची चौकशी व्हावी.. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचला है.. अनेक तरुण अस्वस्थ आहेत.. सभ्यतेच्या बुरखा मोदी आणि त्यांच्या सहकार्याचा लवकर फाटणार.. आपली इंधनाची सुरक्षितता एपस्टीन फाईल मुळे अडकली आहे. देशाचे पंतप्रधान या दबावामुळे काम करत आहेत.. इंधन पुरवठा खंडित झाल्याचं कुठेही बोलताना दिसून येत नाही... एपस्टीन फाईल मध्ये बरच काही आहे.. आगे आगे देखो क्या होता है.. देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला.. आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातली आहे...
945
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 23, 2026 04:51:11
1045
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 23, 2026 04:47:49
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... लातूर विभागातून एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असतानाही प्रवाशांना मात्र आजही खटारा बसेसचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे... तब्बल ८० बसेस स्क्रॅपमध्ये गेल्यानंतर नव्या बसेस देण्याऐवजी जुन्याच बसेसवर बोळवण केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे... यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून ई-बसेस प्रकल्प रखडलेला असून चार्जिंग स्टेशनअभावी ही सेवा सुरु होऊ शकलेली नसल्याचं सांगण्यात येत आहे... विशेष म्हणजे, धाराशिव, बीड, हिंगोली आणि परभणीपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या लातूर विभागाला सोयी-सुविधांच्या बाबतीत नेहमीच दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप आता प्रवासी करत आहेत...
997
comment0
Report
Advertisement
Back to top