Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar414001

अण्णा हजारे ने नाशिक के वृक्षतोड़ के विरोध में कहा—कुंभमेळे के लिए पेड़ बचाओ

LBLAILESH BARGAJE
Dec 10, 2025 10:39:13
Pune, Maharashtra
नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे साधुसंतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे या वृक्षतोडाला आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत... फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. समाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा नुकताच निधन झाला आहे. या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी जीवनात कुठल्याही फळाची अपेक्षा केली नाही निष्कलंक काम करणार ह हीच खरी पूजा असते अशा शब्दात अण्णा हजारेंनी बाबा आढाव यांना नाश्रद्धांजली वाहिली. बाबा आडव्यांनी आयुष्यभर जनतेची पूजा केली असं अण्णा हजारेंनी म्हटल आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 02:02:13
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | महापालिकेची पाणीपट्टी वसुली धIMM गतीने,थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई करण्याचे निर्देश अँकर | महापालिकेची पाणीपट्टी वसुली धिम्म गतीने सुरू असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने लाइनमनना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीचे 150 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असताना केवळ 18 कोटींची वसुली झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली असून थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जे नागरिक पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ करतील त्यांच्या नळ कनेक्शनवर थेट कार वापर करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. 30 जानेवारी 2026 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची स्थिती अत्यंत असल्याचे समोर आले.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 10, 2026 02:00:26
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 10, 2026 01:45:44
Niphad, Maharashtra:नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या या मार्गावर एकेरी रस्तावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक कोंडीची झाली आहे गेल्या तीन ते चार तासांपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दोन किलोमीटरहुन अधिक लांब वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विंचूर येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असल्याने कांदा आणि धान्याच्या वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच आज लग्नसराईचा हंगाम असल्याने प्रवासी आणि खासगी वाहनांचीही मोठी गर्दी झाली आहे या सर्व कारणांमुळे नाशिककडे तसेच येवला आणि लासलगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोंडी फोडण्याचे काम सुरू आहे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून राहावे लागत असल्याने नियोजित स्थळी जाण्यासाठी वेळ लागत आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 01:45:29
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ।नाथषष्ठीसाठी पैठणला 5 लाख भाविक, पहाटेच्या पवित्र स्नानासाठी 2 किमी रांग छत्रपती संभाजीनगर मधील पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली. 450 पेक्षा जास्त दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. पहाटेच्या पवित्र क्षणी नाथसागरावर नाथषष्ठी सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 5 वाजेपासून हजारो भाविकांनी नाथसागरात स्नान केले. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले. 'भानुदास-एकनाथ' च्या जयघोषात अन् टाळ, पखवाज, डफ यांच्या निनादात दिंड्यांतील वारकरी फुगड्या खेळत भाविक भक्तिरसात न्हाल्याच दिसून आलं.दरम्यान नाथ षष्ठी निमित्त तब्बल 5 लाख भाविक पैठणमध्ये दर्शनासाठी दाखल झालेत. त्यामुळे पैठणनगरी दुमदुमून गेलीय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 10, 2026 01:01:16
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:संगली पं पंचायत समिती सभापती निवडणुकीतून अपहरण नाट्याचा प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्याचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. निवडीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेना शिंदे गटाचे बुधगाव गणातून निवडून आलेले पांडुरंग इंगळेंचे त्यांच्या शेतातून अपहरण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. मिरज पंचायती समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले असून सभापती निवडीत महायुती सोबत जाण्याची भूमिका घेतली आहे, मात्र विरोधकांकडून प्रभावाच्या भीतीने हे आपण करण्यात आल्याचा आरोपदेखील शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे मिरज पंचायत समिती सभापती निवडणूक मध्ये महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 09, 2026 15:16:32
Buldhana, Maharashtra:स्टोरी - धक्कादायक.. शिक्षक पत्नीच्या खुनाची पतीनेच दिली सुपारी.. पत्नीवर तीन वेळा विषप्रयोग, अखेर दुचाकीला धडक देऊन पाठविले यमसदनी.. Anchor - एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे.. किरकोळ अपघात वाटणारी घटना प्रत्यक्षात १ लाख रुपयांची सुपारी देऊन घडवल्येत असलेला कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे... जळगाव जामोद पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.. विवो -1 मागील २ मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील कवठळ गावाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा गाडीने शाळेवर जाणाऱ्या शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती.. या अपघातात वृषाली यांचा जागीच मृत्यू झाला.. सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र जळगाव जामोद पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि सत्य समोर आले.. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास केला असता तपासादरम्यान संशयाची सुई पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा (एमएच २८ बीबी ५७५३) गाडीकडे वळाली.. ही गाडी मनीष सुर्यवंशी , राहणार शेगाव याची असल्याचे समजताच त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता मनीषने या थरारक कटाची कबुली दिली आहे.. मनीषने दिलेल्या कबुली जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक महिलेचे पतीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनेकदा कौटुंबिक वाद व्हायचे आणि कौटुंबिक शाळेची तक्रार सदर महिलेने यापूर्वी पोलिसांना दिलेली होती हा राग डोक्यात धरून...मुख्य सूत्रधार मृत वृषाली यांचा पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार , राहणार पातुर्डा यांनी मिळून हा कट रचला असल्याचे माहिती मिळाली तर मृतक वृषाली यांना अन्नातून विष देऊ मारण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला होता, मात्र तो यशस्वी झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे.. आरोपींनी मनीष सुर्यवंशी याला वृषाली यांना गाडीने उडवण्यासाठी १ लाख रुपयांची सुपारी दिली होती.. ठरल्याप्रमाणे २ मार्चच्या सकाळी मनीषने वृषाली यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि मागून कट मारून त्यांना खाली पाडले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.. या गुन्ह्यात वाहन चालक मनीष सुर्यवंशी, मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६१(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तिघांनाही अटक करून न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.. बाईट - श्लोकानंद लोढा, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक वियो -2 - मृतक वृषाली गावंडे पिंपळगाव काळे येथील शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.. दरम्यान त्यांचा अपघात नसून खून झाल्याच्या घटनेने सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या घरातील शिक्षक पत्नीचा खून करणाऱ्या पतीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.. मयूर निकम झी 24 तास बुलढाणा
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Mar 09, 2026 14:49:06
Buldhana, Maharashtra:धक्कादायक: अपघाताचा बनाव रचून शिक्षिकेचा खून; पतीच निघाला मास्टरमाइंड अँकर- बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ गावाजवळ २ मार्च रोजी झालेल्या शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूला आता एक थरारक वळण मिळाले आहे. जो आधी रस्ते अपघात वाटत होता, तो प्रत्यक्षात पतीकडूनच रचलेला एक सुनियोजित कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे येथील शाळेत शिक्षिका होत्या. २ मार्च रोजी कवठळ गावाजवळ एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली होती, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला असता, हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की, वृषाली यांचे पती प्रकाश गावंडे यांनीच आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी साथीदार मंगेश चुलकार याच्या मदतीने कट रचला होता. त्यांनी आरोपी वाहन चालक मनीष सुर्यवंशी याला १ लाख रुपयांची सुपारी देऊन गाडीने धडक देण्यास सांगितले होते. विशेष म्हणजे, या अपघातापूर्वीही वृषाली यांना तीन वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पती प्रकाश गावंडे, मंगेश चुलकार आणि चालक मनीष सुर्यवंशी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या हत्येमागील नेमके मुख्य कारण काय होते, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
0
comment0
Report
SKShubham Koli
Mar 09, 2026 14:01:12
Thane, Maharashtra:गुरुवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवार दिनांक 12/03/2026 रोजी सकाळी 9.00 ते शुक्रवार दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, नागरिकांनी सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 09, 2026 13:18:50
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात कचरा टाकण्याचा वाद विकोपाला सफाई कामगाराची चाकू मारून केली हत्या पतीची हत्या तर पत्नीने केली आत्महत्या आरोपीला पोलिसांनी केली अटक Anchor घरातील कचरा इकडे तिकडे टाकू नकोस असे सांगितल्यावर कचरा टाकणारा आणि सफाई कर्मचारी यांच्यात नेहमी वाद होत होता. सोमवारी देखील हाच प्रकार घडला. नेहमी रागाने का बघतोस ? का वाद घालतोस? यावरुन कचरा टाकणाऱ्या दुर्गेश गुप्ता नावाचा व्यक्तीने कंत्राटी सफाई कामगार महादू जगताप याची धारदार शस्त्राने हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. उल्हासनगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी दुर्गेश गुप्ता याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे सफाई कामगार महादू याच्या हत्येची माहिती मिळताच महादूची पत्नी पूर्वी जगताप हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगताप यांना दोन मुले आहेत. वडिलांची हत्या आणि आईची आत्महत्येमुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. कचरा टाकणाच्या वादातून दोघांचा जीव गेल्याने जगपात कुटुंब उद्धवस्त झाले आहे. Byte सचिन काळे पोलीस उपयुक्त उल्हासनगर परिमंडळ 4 चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 09, 2026 13:01:39
Akola, Maharashtra:अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेण्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत काही तासांतच आरोपीच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर उर्फ फुलसिंग सोलंकी (वय ३०, रा. शाहूपूर, जिल्हा बुरहानपूर, मध्यप्रदेश) हा अकोल्यातील केळकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज सकाळी चारच्या सुमारास हॉस्पिटलमधून दीड वर्षाच्या मुलीला कोणालाही न सांगता सोबत घेऊन निघून गेला. यादव मुलीच्या आईने रामदासपेठ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अकोट रोड परिसरातून त्याला ताब्यात घेत चिमुकलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले,पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top