Back
नाशिक के विंचूर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, शादी सीजन और सड़क निर्माण के चलते
SKSudarshan Khillare
Mar 10, 2026 01:45:44
Niphad, Maharashtra
नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर येथे आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सध्या या मार्गावर एकेरी रस्तावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूक कोंडीची झाली आहे गेल्या तीन ते चार तासांपासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दोन किलोमीटरहुन अधिक लांब वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विंचूर येथे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असल्याने कांदा आणि धान्याच्या वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच आज लग्नसराईचा हंगाम असल्याने प्रवासी आणि खासगी वाहनांचीही मोठी गर्दी झाली आहे या सर्व कारणांमुळे नाशिककडे तसेच येवला आणि लासलगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोंडी फोडण्याचे काम सुरू आहे वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना बराच वेळ रस्त्यावरच अडकून राहावे लागत असल्याने नियोजित स्थळी जाण्यासाठी वेळ लागत आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 03:30:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 10, 2026 03:30:370
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 10, 2026 03:18:100
Report
KPKAILAS PURI
FollowMar 10, 2026 03:16:260
Report
MAMILIND ANDE
FollowMar 10, 2026 03:02:150
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 03:01:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 10, 2026 03:00:510
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 02:50:300
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 10, 2026 02:47:060
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 10, 2026 02:46:520
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 10, 2026 02:46:240
Report
PNPratap Naik1
FollowMar 10, 2026 02:45:180
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 10, 2026 02:15:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 10, 2026 02:03:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 10, 2026 02:02:520
Report