Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

पैठण में नाथषष्ठी: पांच लाख भक्तों की भीड़, सूर्योदय के पहले स्नान

NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 01:45:29
Jalna, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर ।नाथषष्ठीसाठी पैठणला 5 लाख भाविक, पहाटेच्या पवित्र स्नानासाठी 2 किमी रांग छत्रपती संभाजीनगर मधील पैठण येथील नाथषष्ठी सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली. 450 पेक्षा जास्त दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. पहाटेच्या पवित्र क्षणी नाथसागरावर नाथषष्ठी सोहळ्याच्या प्रारंभी सकाळी 5 वाजेपासून हजारो भाविकांनी नाथसागरात स्नान केले. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले. 'भानुदास-एकनाथ' च्या जयघोषात अन् टाळ, पखवाज, डफ यांच्या निनादात दिंड्यांतील वारकरी फुगड्या खेळत भाविक भक्तिरसात न्हाल्याच दिसून आलं.दरम्यान नाथ षष्ठी निमित्त तब्बल 5 लाख भाविक पैठणमध्ये दर्शनासाठी दाखल झालेत. त्यामुळे पैठणनगरी दुमदुमून गेलीय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 10, 2026 03:30:37
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 10, 2026 03:02:15
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 03:01:06
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 10, 2026 03:00:51
Nasik, Maharashtra:माहेरून दोन कोटी रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा १५ वर्षांपासून छळ सुरू असल्याप्रकरणी तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली २०११ मध्ये इंदिरानगरमधील एका युवकासोबत विवाह झाला होता. ती सासरी नांदत असताना युवकासोबत तिचा विवाह झाला पती, सासू, सासरे, चुलतसासू, चुलतसासरे, दीर व दोन नणंदा हे सर्व जण घरगुती कारणावरूनकुरापत काढून पीडितेला वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ करीत होते. तिने माहेरून दोन कोटी रुपये आणावेत म्हणून सासरच्या सर्वांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडित विवाहितेला लग्नात मिळालेले स्त्रीधनदेखील सासरच्यांनी ठेवून घेत त्याचा अपहार केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 10, 2026 02:50:30
Kolhapur, Maharashtra:Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अखेर एस आय टी ची स्थापना केली आहे. महेश पिळणकर हे गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता आहेत. ज्या पाटगाव परिसरात पिळणकर यांची दुचाकी सापडली त्याच पाटगाव मधील जंगलात राख आणि शरीराचे काही अवशेष पोलिसांना सापडले होते. कोल्हापूर पोलिसांनी इराक आणि शरीराचे काही अवशेष तपासासाठी पाठवले होते पण त्याचा अहवाल अस्पष्ट आला. तो पुनर् तपासणीसाठी पुणे किंवा मुंबईतील फॉरेन्सिक लॅब कडे पाठवावे आणि त्यााचबरोबर पिळणकर यांच्या शोधासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी पिळणकर यांच्या कुटुंबीयांसह लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश्वर गुप्ता यांनी पिळणकार यांच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 10, 2026 02:46:52
Akola, Maharashtra:शेतकरी बंधूंनो, कापूस विक्री करताना सावधगिरी बाळगा, कारण काही व्यापारी मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कापूस खरेदीदरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकरीांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. मिळाल्या माहितीनुसार, एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले. उदाहरणार्थ, ट्रकमध्ये १०० किलो वजनाची मातीची पिशवी ठेऊन वजन केल्यास काट्यावर १००० किलोची पावती घेतली जाते. त्यानंतर ती মाती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते. त्यामुळे आधीच्या वजनात झालेल्या फरकामुळे व्यापाऱ्याला अधिक कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते. मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला. मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले.या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 10, 2026 02:46:24
Junnar, Pune, Maharashtra:युद्धाचा फटका साखर उद्योगाला ही बसला असून आखाती देशातील साखर निर्णात ठप्प झाल्याने साखरेचे बाजारभाव किलोमागे चार ते पाच रुपयांनी गडगडलेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी ही घटली असून साखरेला उठाव नाही तर दुसरीकडे यावर्षी साखर कारखान्यांना ऊस गाळपा साठी कमी प्रमाणात आल्याने साखरेचे गाळप ही कमी झालंय तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे,सततच्या पावसामुळे ऊसाचं वजन घटल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय साखर कारखान्यांना ही रिकवरी हि कमी प्रमाणात मिळाल्याने साखरेचं आर्थिक गणितचं कोलमडलं असून साखर उद्योग संकटात आल्याचं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी म्हटलंय याच संदर्भात त्यांच्या शी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 10, 2026 02:15:41
Bhandara, Maharashtra:१४२ जणांचे वेतन अडचणीत.... १८१ पैकी ३९ कर्मचाऱ्यांचे दिव्यांग पडताळणी अहवाल भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी अद्याप १४२ जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल शिक्षण विभागाकडे अद्याप प्राप्त झालेले नाही. ८ मार्चपर्यंत केवळ ३९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी ३० दिवसांत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन काढण्यात येणार नाही, असे पत्र २४ फेब्रुवारी २०२६ रोजी काढले होते. त्यामुळे मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास १४२ कर्मचाऱ्यांचे वेतन अडचणीत येण्याची शक्यता आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील, तसेच राज्यातील सर्व विभागांतील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित विभाग प्रमुखांनी पत्र काढून त्यांच्या अधिनस्थ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची शल्य चिकित्सकांकडून पडताळणी करून अहवाल सादर करण्यास कळविले होते. परंतु, अद्यापही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 10, 2026 02:03:12
Jalna, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर | बायोमायनिंगसाठी 67 कोटी खर्च, 58 कोटींचा नवा डीपीआर 13 लाख मेट्रिक टनाचा अंदाज चुकला; चुकीच्या मोजमापाची जबाबदारी कुणावर? मनपाचे मौन? महापालिकेवर 58 कोटींचा अतिरिक्त बोजा अँकर। छत्रपती संभाजीनगर मधील नारेगाव डेपोवरील बायोमायनिंग प्रकल्पातील अंदाज चुकला आहे. डेपोतील कचऱ्याचे प्रमाण 13 लाख मेट्रिक टन असल्याचे गृहीत धरून महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत तब्बल 67 कोटी रुपये खर्च केले. मात्र, प्रत्यक्षात डेपोमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उर्वरित कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुन्हा 58 कोटी रुपयांचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. चिकलठाणा आणि पडेगाव येथील साठ्यावरही प्रक्रिया प्रस्तावित आहे. कचऱ्याचे मोजमाप चुकीचे ठरल्यामुळे सरकारी तिजोरीवर आता अतिरिक्त 58 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तरीही या चुकीसाठी सल्लागार संस्था किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे संपूर्ण बायोमायनिंग प्रकल्पाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नारेगाव डेपोवरील बायोमायनिंग प्रकल्प हा शहरातील कचरा समस्येवर मोठा उपाय मानला जात होता. मात्र सुरुवातीचे सर्वेक्षणच चुकीचे ठरल्याने संपूर्ण प्रकल्पाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 10, 2026 02:02:52
Chendhare, Maharashtra:स्‍लग – रायगड जिल्‍हा परीषद सत्‍तासमीकरणाच्‍या जोरदार हालचाली .........भाजप आनंदोत्‍सवाच्‍या तयारीत, शिवसेनेत अस्‍वस्‍थता ..........शिवसेनेला डावलून भाजप – राष्‍ट्रवादी कॉंग्रेस सत्‍तेत बसणार ? ......... सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना सत्तेपासून दूर ? ....... अँकर – रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 12 मार्च रोजी निवडणूक होतेय. जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने महायुतीसाठी व्यापक प्रयत्न सुरू केले आहेत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शिवसेनेला दूर ठेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरूच ठेवल्या आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अलिबागमध्ये आनंदोत्सवाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे सर्वाधिक जागा जिंकूनही सत्‍तेपासून दूर रहावे लागणार असल्‍याने, शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता आहे. आपलाच अध्‍यक्ष बसणार याची भाजपला खात्री झाली असून त्‍यांच्‍याकडून आनंदोत्‍सवाची तयारी सुरू झाली आहे. अध्‍यक्ष पदाची निवड झाल्‍यानंतर लगेचच अलिबागमध्‍ये प्रमुख नेत्‍यांच्या उपस्थितीत विजयी मेळावा घेतला जाणार आहे. बाईट – अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस भाजप बाईट – भरत गोगावले, मंत्री
0
comment0
Report
Advertisement
Back to top