Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur416005
नागपुर-अमरावती फ्लायओवर का लोकार्पण: Gadkari का LIVE कार्यक्रम
AKAMAR KANE
Sept 12, 2025 14:34:48
kolhapur, Maharashtra
Ngp CM Gadkari program live u ने फीड पाठवले ------- नागपूर शहराला आणि नागपूरकरांना लवकरच आणखी एक नवीन उड्डाणपूल मिळणार आहे... अमरावती महामार्गावर बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ कॅम्पस गेट पर्यंत"चा 2.85 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल आता तयार झाला असून लवकरच. या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले जात आहे.. या पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे नाव देण्यात आलेय. *या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित आहे* . या उड्डाणपुलामुळे नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना तीव्र गतीने लॉ कॉलेज चौक, रवी नगर चौक, भरत नगर चौक आणि फुटाळा तलावाजवळ ची गर्दी टाळून थेट वाडी आणि पुढे अमरावतीचे दिशेने जाणे सोयीस्कर ठरणार आहे.. Gfx In नव्या उड्डाणपुलाची वैशिष्ट्य काय * नवीन उड्डाणपूल 2.85 किलोमीटर लांबीचा, 4 लेन चा. . * राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग डिव्हिजनने हे उड्डाणपूल बांधले आहे. * या उड्डाणपुलासाठी 191 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.. * हा उड्डाणपूल नागपूर अमरावती महामार्ग ट्रॅफिक इम्प्रूमेंट प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आला आहे.. ---- या कार्यक्रमाची live फ्रेम दिलीय
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
UJUmesh Jadhav
Sept 13, 2025 01:15:56
Thane, Maharashtra:मरणानंतरही मरण यातनाच.... शहापूरातील ५ गाव तर ५५ पांड्यामध्ये सन्मानभुमीच नाही... उघड्यावर केले जाते अंत्यसंस्कार... स्मशानभूमी आहेत तर रस्ताच नाही... अनेक स्मशानभूमींची दयनीय अवस्था... ॲंकर... एकीकडे देशभरात आझादी चा ७५ वा अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत भारत देश स्वतंत्रच्या ७८ वर्षे पदार्पण करीत असतानाच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात २३१ महसुली गावे तर ४३५ गा पाडे आहेत. या पैकी ५ गावात तर ५५ पाड्यांमध्ये आज ही स्मशानभूमीच नसल्याने ऊन, वारा व पावसातच उघड्यावरच येथील मृतदेहांवर गावकऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आणि या बाबतचं बातमी करण्यासाठी झी २४ तासची टीम शहापूराती गाव-पाड्यात पोहचली. विवो-१ विशेष म्हणजे गरीबाचा नाथ एकनाथ असे प्रचारात वाक्य वापरून भावनिक आव्हान करणारे एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे ९ वर्ष पालकमंत्री आणि अडीज वर्ष मुख्यमंत्री आणि सद्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असून त्यांनी जिह्याच्या शहर भागातील नागरी विकास झपाट्यानं केला. मात्र त्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही रस्ते, वीज पाणी व आरोग्य ह्या मुलभुत सुविधा येथील नागरीक व गरिब आदिवासीं बांधवांपासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय भाजपचे माजी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील हे दोन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच शहापूर तालुक्यात दरोडा आणि बरोरा ह्या दोन कुटूंब गेली ३० वर्षांपासून आमदार पद आलटून पालटून भूषवत आहेत. असे दिग्गज नेते असूनही गाव-पाड्यात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना व आदिवासी बांधवांना मरणा नंतर ही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे. विवो-२ आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या ७३ किलोमीटर अंतरावर असणारा शहापूर तालुका. मात्र या तालुक्यात अद्यापही अनेक मुलभूत सो़ई-सुविधांपासून हजारो गावकरी वंचित आहेत. खळबळजनक बाब म्हणजे तालुक्यात ११० ग्रामपंचायती तर २३१ महसुली गावे आणि ४३५ पाडे अशी संख्या असून काही गाव, वाड्या,पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नाही, तर काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण रस्ताच नाही तर काही ठिकाणच्या स्मशानभूमींची दुरावस्था झाली आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात प्रेत स्मशानभूमीत घेऊन जातांना गावकऱ्यांना मोठी कसरत करत नाले ओलांडून व चिखल तुडवत पोहचावे लागत आहे. यावेळी प्रेय घेऊन जाणाऱ्या खांदेकरी यांचा पाय घसरला तर प्रेत ही पडण्याची भीती. तर अनेक गाव पाड्यात उघड्यावरच मृतांवर अंत्यविधी करावा लागत आहे. पावसाळ्यात तर ताडपत्री पकडून अंत्यसंस्कार केल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन कार्यसम्राट लोकप्रतिनिधी करतात काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. विवो-३ शहापूर तालुक्यातील अनेक गाव, आदीवासी वाडया, पाडयांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक ग्रुप ग्रामपंचायतीं हद्दीत मध्ये स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन सरकारी दप्तरी फक्त कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे एकदा गावकऱ्याचा मृत्यू झालाच, तर त्याचे शेवटची अंत्ययात्राही नदी, नाले व ओढ्याच्या प्रवाह असलेल्या पाण्यातुन काढावी लागत असेल तर या सारखे तालुक्यातील गावकऱ्यांच्या वाट्याला आलेले दुसरे दुदैव काय असु शकते ? शहापूर तालुक्यात आज ही अनेक ग्राम पंचायतींच्या हद्दीत स्मशान भुमींचा प्रश्न गंभीर आहे, तर काही ठिकाणी जागेची अडचण तर , काही ठिकाणी निधींची कमतरता, परंतु या गंभीर असणाऱ्या समस्येची ना शासनाला गरज, ना येथील लोकप्रतिधीना. त्यामुळे गावकऱ्यांच्या मुलभुत समस्या सोडवणार कोण? असा सवाल येथील गावकरी करताना दिसत आहे. विवो-४ दरम्यान, तालुक्यात विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे चित्र सध्या रंगवलं जातेय, विकास कामांच्या नावाने बोंबा मारण्याचे काम सगळे नेते मंडळी करतांना दिसत आहे. परंतु तालुक्यात सध्या भेडसावत असणाऱ्या अनेक समस्यापैकी एक समस्या म्हणजे स्मशानभुमी. जवळपास तालुक्यातील २३१ पैकी ५ गावात व‌ ५५ पाड्यांवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना मरणा नंतर ही मरण यातना सहन कराव्या लागत असतील तर दुदैवच म्हणावे लागेल. उमेश जाधव, शहापूर बाईट- ग्रामस्थ वसंत पानसरे, प्रहार संघटना शहापूर तालुका अध्यक्ष नरेश पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती प्रकाश खोडका- श्रमजीवी संघटना सचिव शहापूर
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 01:15:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - महापालिकेच्या हरित संगम उपक्रमाला वृक्ष प्रेमींचा आक्षेप,महापालिका आयुक्तांना देशी झाडाचे रोप भेट देत केले अनोखा आंदोलन. अँकर - सांगली महानगरपालिकेकडून महापालिकेत क्षेत्रात हरित संगम उपक्रम राबवण्यात येणार आहे.3 वर्षात महापालिकेकडून शहरात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत.मात्र या उपक्रमाला वृक्षप्रेमी आणि संस्थांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे.झाडे लावत असताना विदेशी झाडां ऐवजी देशी झाडे लावावे,अशी मागणी करण्यात आली होती.मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या विरोधात वृक्षप्रेमींकडून आता अनोखा आंदोलन हाती घेण्यात आले आहे,देशी झाडांच्या संवर्धन आणि देशी झाडेच लावावी,या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना दररोज एक देशी झाड भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, या अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना देशी झाडाचं रूप भेट देऊन पालिकेने हरित संगम उपक्रमासाठी देशी झाडांनाच प्राधान्य द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 01:15:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:फुटर - सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर,यंदा पण महिलाराज, सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण अँकर - सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाचा आरक्षण जाहीर झाला आहे.ज्यामध्ये पुन्हा एकदा महिला आरक्षण पडले असून सर्वसाधारण महिला गटासाठी हे आरक्षण खुले झाले आहे,गत पंचवार्षिक कार्य काळामध्ये जिल्हा परिषदेचा आरक्षण महिला ओबीसी गटासाठी राखीव होतं,त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी ओबीसी महिला सदस्याला संधी मिळाली होती. किल्ल्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे पुरुष गटासाठी खुले राहील अशी शक्यता व्यक्त केली जात होती,मात्र पुन्हा एकदा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद महिलांसाठी आणि सर्वसाधारण गटासाठी खुले झाला आहे,त्यामुळे जिल्हा परिषद गटातील इच्छुक कारभारांची निराशा झाली आहे.मात्र आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडल्याने खुल्या गटातुन फिल्डिंग सुरू झाली आहे.
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 17:46:18
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात आज विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडलीय. हिंगोली आणि वसमत तालुक्यात धुवाँधार पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आलाय, काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झालीय. वसमत ते काकबन या शिवारात पाणी नाल्याच्या पुलावरून वाहात असल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. तर गुंडा शिवारातील ओढ्याच्या पुरातून 60 वर्षीय गयाबाई आंबादास सारोळे आणि 55 वर्षीय सखुबाई विश्वनाथ भालेराव ह्या महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात, इतर महिलांसोबत त्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास मोठा पाऊस येत असल्यामुळे त्यांच्यासह इतर महिला शेतातून घराकडे निघाल्या होत्या. यावेळी गुंडा शिवारातील ओढ्यावर पुराचे पाणी आले. या पाण्यातून त्या घराकडे येत असताना गयाबाई व सखुबाई ह्या दोघींना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यांचा गावकऱ्यांचा वतीने शोध घेण्यात आला मात्र त्यांचा शोध लागला नाहीये,अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झालाय,त्यामुळे उद्या सकाळी प्रशासनाच्या वतीने शोधकार्य करण्यात येणार आहे....
14
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 12, 2025 16:31:51
Kalyan, Maharashtra:नागरिकांनो सावधान ऑन लाईन गुंतवणूक धोक्याची!! कल्याण मधील ज्यू पीडियाचा प्रताप ऑन लाईन "टास्क" देत पैशांचे आमिष दाखवत गुंतवणूकदाराना कोट्यवधींचा गंडा बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल,पोलीस तपास सुरू Anc..कल्याण मध्ये एका कथेत कंपनीने ऑनलाइन टाच देत पैशांचे आमिश दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे .इतकेच नव्हे तर फसवणूक करणाऱ्या कथित कंपनीच्या सी ई ओ ना पोलीस ठाण्यात आणलं असता सदर महिला देखील अरेरावीची भाषा करत असल्याचे दिसून आले या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 700 ते 800 नागरिकांना गंडा घातला आहे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात मनसे कार्यालयात धाव घेत नागरिकांनी याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.या प्रकारामुळे आता फसवणूक करणारे " ठग " शक्कल लढवत असल्याचे समोर आले आहे. vo..कल्याण मध्ये ज्यू पीडिया नावाने एक कथित कंपनीने आपलं कार्यालय थाटले .या कंपनीच्या माध्यमातून भामट्यांनी ऑन लाईन टास्क मध्ये गुंतवणूक करा त्या मोबदल्यात लाखो रुपये कमवा अशी शक्कल लढवली. गरजवंतांना हेरून या कंपनीचे कथित एजंट त्यांना आकर्षक विविध ऑन लाईन टास्क देत या टास्क मध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंचा फायदा होईल ,नऊ लेव्हल पूर्ण केल्यानंतर लाखोंचा फायदा होईल असे आमिष दाखवत होते .या कंपनिची सी ई ओ सुषमा पालकर नावाची महिला होती तर कंपनीच्या गृप वर लिली आणि जॅक नावाचे इसम होते .कंपनीने प्रत्येक गुंतवणूकदाराचे वॉलेट तयार केले. या वॉलेट मध्ये गुंतवणूकदाराना गुंतवणूक केलेले पैसे आणि टास्क पूर्ण केल्यानंतर मिळालेला मोबदला दिसत होता .मात्र अनेक महिने उलटून गेले हे पैसे काढण्यासाठी गुंतवणूकदारांनी विचारणा केली असता कंपनीकडून त्यांना उडवा उडवीची उत्तरं देत टाळाटाळ केली जात होती . अखेर गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आले .त्यांनी थेट कथित सी ई ओ सुषमा पालकर याना गाठले मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली ..अखेर या फसवणूक झालेल्या या गुंतवणूकदारांनी थेट कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली .या पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे . byte... फसवणूक करणारे नागरिक byte..प्रणय साठम मनसे वाहतूक जिल्हा अध्यक्ष
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 16:31:21
Gadchiroli, Maharashtra:Feed slug :--- 1209ZT_GAD_WATER_REASON ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या ताटीगुडम गावातील खाजगी विहीरीतून गरम पाणी आल्याचा व्हिडीओ झाला होता वायरल, जिल्हा प्रशासनाने तज्ञांकडून करविले प्रत्यक्ष परीक्षण, तळाशी असलेल्या खडकामुळे झालेल्या रासायनिक अभिक्रियेचा हा तापमान बदल असल्याचा काढला निष्कर्ष      अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या ताटीगुडम ग्रामपंचायत अंतर्गत कमलापूर येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली होती. याबाबतचा व्हिडीओ वायरल झाला होता. जि. प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याबाबत अभ्यास करत ही बाब चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचे स्पष्ट केले आहे. कमलापूर येथील सत्यन्ना मलय्या कटकु यांच्या विहीरीतले पाणी गरम झाले. विहिरीतून वाफा देखील  येत असल्याची माहिती मिळाली होती. पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली. विहीर सुमारे 20 वर्षे जुनी असून सहा महिन्यांपूर्वी या विहीरीचा उपसा करण्यात आला होता. विहीरीचे पाणी, जवळील सार्वजनिक हातपंप व इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या निष्कर्षात गरम पाणी असलेल्या विहीरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल 923 मि.ग्रॅ./लिटर असल्याचे आढळले. गाळ काढल्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी विहीरीतील पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
14
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 12, 2025 14:48:35
Yavatmal, Maharashtra:AVB मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ मध्ये येत आहेत ते धार्मिक कार्यक्रमासाठी येत असले तरी येथील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडला असल्याने त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अति पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतात पूर्णतः चिखल झाला असून, पिकं उध्वस्त झाली आहेत. आश्वासन देऊन महायुतीने कर्जमाफी केली नाही, प्रशासनही शेतकऱ्यांना साथ देत नाही. शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली. बाईट : चंद्रकांत खैरे
14
comment0
Report
KPKAILAS PURI
Sept 12, 2025 14:33:59
Pimpri-Chinchwad, Maharashtra:नरहरी झिरवाळ ऑन बंजारा समाज आरक्षण.... pimpri zirvalh kailas puri Pune 12-9-25 feed by 2c Avb * न्यायदेवता हे संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा हस्तक्षेप करता येत नाही...... * सामाजिक हेवे आणि एकमेकांविषयीचा गैरसमज तो तसा खूपच वाईट तो तसा शासन म्हणून शासनाचा अधीन नाही काही झाले तरी त्याला संविधानाचा आधार आहे ...... * म्हणून बंजारा समाजाबाबतचे काय सांगितले जाते महाराष्ट्र भारत आपणही का गप्प बसायचं मला आदिवासी म्हणून सांगितलं जातं तेव्हा मी तेच सांगतो.... * आता संविधानाने आपल्याला जी सूची ठरवून दिले आहे त्याच्यात बंजारा समाजाचा संबंध नाही त्यात आपल्याला घाबरायचं कारण आहे परंतु जसजशी वेळ येईल तसं आपण त्याला आपण कायदेशीर उत्तर देऊ.....
14
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 12, 2025 14:15:15
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1209ZT_CHP_ROAD_CLOSE ( single file sent on 2C)  टायटल:-- सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद, शेगाव येथील दुकान चाळीत शिरले पाणी      अँकर:-- गेले चार दिवस चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे . सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक मार्ग बंद झालेत. शेगाव येथील दुकान चाळीत पाणी शिरले असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच तालुक्यातील चारगाव धरण ओवरफ्लो झाले असून निमढेला तलाव ओसंडून वाहत असल्याने अडचणीत भर पडली आहे. पाणी निघण्यासाठी मार्ग नसल्याने पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
14
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 12, 2025 13:46:53
Parbhani, Maharashtra:अँकर- हिंगोली जिल्ह्यात आज जोरदार मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर परिस्थिती निर्माण झालीय, कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे असणाऱ्या खटकाळीच्या ओढ्यावर कमी उंचीचा पूल असल्यामुळे पाणी पुलाच्या वरून वाहत आहे. यामुळे सोडेगाव सावंगी कडे जाणाऱ्या नागरिकांचा कळमनुरीशी संपर्क तुटलाय. या ओढ्यावर नवीन उंचीचा पूल उभारावा अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. खटकाळी ओढ्यावर पूरस्थिती : अपूर्ण पुलामुळे गावकऱ्यांमध्ये संताप सोडेगाव प्रतिनिधी : गावाजवळील खटकाळी ओढ्यावर आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ओढ्यावरच्या पुलावर पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.साधारण पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीच या ठिकाणी योग्य पुलाचे काम करावे अशी मागणी केली होती. परंतु संबंधित रस्त्याच्या ठेकेदाराला व काही स्थानिक नेत्यांच्या हितसंबंधामुळे अपुरा पूल मंजूर करून दिला गेला. त्यामुळे सोडेगाव-सावंगी रस्ता पूर्ण करण्यात आला असला तरी गावातील सुमारे अर्धा किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण आहे. आजच्या पुरस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की भविष्यात जर अशा प्रकारच्या पुरामुळे जीवित किंवा आर्थिक हानी झाली, तर त्याची थेट जबाबदारी ठेकेदार आणि कामाला संमती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व नेत्यांवर राहील. गावकऱ्यांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने ओढ्यावर सक्षम व सुरक्षित असा नवा पूल तातडीने उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.
14
comment0
Report
Advertisement
Back to top