Back
शहापुर के 5 गांव, 55 पाड़े: स्मशानभूमि नहीं, मौत की चुनौती
UJUmesh Jadhav
Sept 13, 2025 01:15:56
Thane, Maharashtra
मरणानंतरही मरण यातनाच....
शहापूरातील ५ गाव तर ५५ पांड्यामध्ये सन्मानभुमीच नाही...
उघड्यावर केले जाते अंत्यसंस्कार...
स्मशानभूमी आहेत तर रस्ताच नाही...
अनेक स्मशानभूमींची दयनीय अवस्था...
ॲंकर...
एकीकडे देशभरात आझादी चा ७५ वा अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत भारत देश स्वतंत्रच्या ७८ वर्षे पदार्पण करीत असतानाच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात २३१ महसुली गावे तर ४३५ गा
पाडे आहेत. या पैकी ५ गावात तर ५५ पाड्यांमध्ये आज ही स्मशानभूमीच नसल्याने ऊन, वारा व पावसातच उघड्यावरच येथील मृतदेहांवर गावकऱ्यांना अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आणि या बाबतचं बातमी करण्यासाठी झी २४ तासची टीम शहापूराती गाव-पाड्यात पोहचली.
विवो-१
विशेष म्हणजे गरीबाचा नाथ एकनाथ असे प्रचारात वाक्य वापरून भावनिक आव्हान करणारे एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे ९ वर्ष पालकमंत्री आणि अडीज वर्ष मुख्यमंत्री आणि सद्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असून त्यांनी जिह्याच्या शहर भागातील नागरी विकास झपाट्यानं केला. मात्र त्यांच्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही रस्ते, वीज पाणी व आरोग्य ह्या मुलभुत सुविधा येथील नागरीक व गरिब आदिवासीं बांधवांपासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय भाजपचे माजी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील हे दोन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच शहापूर तालुक्यात दरोडा आणि बरोरा ह्या दोन कुटूंब गेली ३० वर्षांपासून आमदार पद आलटून पालटून भूषवत आहेत. असे दिग्गज नेते असूनही गाव-पाड्यात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना व आदिवासी बांधवांना मरणा नंतर ही मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.
विवो-२
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून अवघ्या ७३ किलोमीटर अंतरावर असणारा शहापूर तालुका. मात्र या तालुक्यात अद्यापही अनेक मुलभूत सो़ई-सुविधांपासून हजारो गावकरी वंचित आहेत. खळबळजनक बाब म्हणजे तालुक्यात ११० ग्रामपंचायती तर २३१ महसुली गावे आणि ४३५ पाडे अशी संख्या असून काही गाव, वाड्या,पाड्यांमध्ये स्मशानभूमीच नाही, तर काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण रस्ताच नाही तर काही ठिकाणच्या स्मशानभूमींची दुरावस्था झाली आहे. रस्ते नसल्याने पावसाळ्यात प्रेत स्मशानभूमीत घेऊन जातांना गावकऱ्यांना मोठी कसरत करत नाले ओलांडून व चिखल तुडवत पोहचावे लागत आहे. यावेळी प्रेय घेऊन जाणाऱ्या खांदेकरी यांचा पाय घसरला तर प्रेत ही पडण्याची भीती. तर अनेक गाव पाड्यात उघड्यावरच मृतांवर अंत्यविधी करावा लागत आहे. पावसाळ्यात तर ताडपत्री पकडून अंत्यसंस्कार केल्याची घटना यंदाच्या पावसाळ्यात घडली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन कार्यसम्राट लोकप्रतिनिधी करतात काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
विवो-३
शहापूर तालुक्यातील अनेक गाव, आदीवासी वाडया, पाडयांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक ग्रुप ग्रामपंचायतीं हद्दीत मध्ये स्मशानभूमी उभारण्याचे नियोजन सरकारी दप्तरी फक्त कागदावरच असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे एकदा गावकऱ्याचा मृत्यू झालाच, तर त्याचे शेवटची अंत्ययात्राही नदी, नाले व ओढ्याच्या प्रवाह असलेल्या पाण्यातुन काढावी लागत असेल तर या सारखे तालुक्यातील गावकऱ्यांच्या वाट्याला आलेले दुसरे दुदैव काय असु शकते ? शहापूर तालुक्यात आज ही अनेक ग्राम पंचायतींच्या हद्दीत स्मशान भुमींचा प्रश्न गंभीर आहे, तर काही ठिकाणी जागेची अडचण तर , काही ठिकाणी निधींची कमतरता, परंतु या गंभीर असणाऱ्या समस्येची ना शासनाला गरज, ना येथील लोकप्रतिधीना. त्यामुळे गावकऱ्यांच्या मुलभुत समस्या सोडवणार कोण? असा सवाल येथील गावकरी करताना दिसत आहे.
विवो-४
दरम्यान, तालुक्यात विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च होत असल्याचे चित्र सध्या रंगवलं जातेय, विकास कामांच्या नावाने बोंबा मारण्याचे काम सगळे नेते मंडळी करतांना दिसत आहे. परंतु तालुक्यात सध्या भेडसावत असणाऱ्या अनेक समस्यापैकी एक समस्या म्हणजे स्मशानभुमी. जवळपास तालुक्यातील २३१ पैकी ५ गावात व ५५ पाड्यांवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना मरणा नंतर ही मरण यातना सहन कराव्या लागत असतील तर दुदैवच म्हणावे लागेल.
उमेश जाधव, शहापूर
बाईट- ग्रामस्थ
वसंत पानसरे, प्रहार संघटना शहापूर तालुका अध्यक्ष
नरेश पाटील, विस्तार अधिकारी, पंचायत समिती
प्रकाश खोडका- श्रमजीवी संघटना सचिव शहापूर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 08:21:530
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 08:18:410
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 08:17:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 13, 2025 08:02:120
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:49:042
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:48:523
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:47:165
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 07:46:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 13, 2025 07:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 07:45:130
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 07:30:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 13, 2025 07:24:212
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 07:23:344
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 13, 2025 07:20:413
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 13, 2025 07:20:000
Report