Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

हरित संगम परियोजना पर वृक्ष प्रेमियों का लगातार विरोध, देशी पेड़ ही हों

SMSarfaraj Musa
Sept 13, 2025 01:15:31
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - महापालिकेच्या हरित संगम उपक्रमाला वृक्ष प्रेमींचा आक्षेप,महापालिका आयुक्तांना देशी झाडाचे रोप भेट देत केले अनोखा आंदोलन. अँकर - सांगली महानगरपालिकेकडून महापालिकेत क्षेत्रात हरित संगम उपक्रम राबवण्यात येणार आहे.3 वर्षात महापालिकेकडून शहरात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत.मात्र या उपक्रमाला वृक्षप्रेमी आणि संस्थांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे.झाडे लावत असताना विदेशी झाडां ऐवजी देशी झाडे लावावे,अशी मागणी करण्यात आली होती.मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने पालिकेच्या विरोधात वृक्षप्रेमींकडून आता अनोखा आंदोलन हाती घेण्यात आले आहे,देशी झाडांच्या संवर्धन आणि देशी झाडेच लावावी,या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना दररोज एक देशी झाड भेट देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, या अंतर्गत महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना देशी झाडाचं रूप भेट देऊन पालिकेने हरित संगम उपक्रमासाठी देशी झाडांनाच प्राधान्य द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 13, 2025 08:02:12
Lasalgaon, Maharashtra: अँकर:- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवर विंचूर येथे सकाळच्या सत्रात सव्वा तीनशे वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता सुरुवातीला गोल्टी व खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले यावेळी एका शेतकऱ्याच्या कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव पुकारून बीट रिव्हर्स करत शंभर रुपये केली यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांमुळे दीडशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आल्यानंतरही शेतकऱ्यांचा संताप अनावरण झाल्याने काही काळ नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारात नेत फेर लिलावाचा तोडगा काढून लिलावाला पूर्ववत सुरुवात करण्यात आला बाईट :- अण्णाजी हरिभाऊ आरोटे ( कांदा उत्पादक शेतकरी)
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 13, 2025 07:49:04
Beed, Maharashtra:बीड : कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला वेग; साक्षाळ पिंपरीत कार्यशाळा Anc : बीडमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलं. त्यानुसार उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले होते.आणि याच आदेशानंतर बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे आज विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. अधिकारी थेट गावात जाऊन कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं, त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात याची माहिती देत आहेत. त्यामुळे आता प्रक्रियेला वेग आला आहे.
2
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 13, 2025 07:48:52
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील दगडपारवा लघु प्रकल्प सध्या शंभर टक्के क्षमतेने भरला असून, धरण प्रशासनाने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज धरणाची वक्रद्वार क्रमांक 1 आणि 4 प्रत्येकी 20 सेंटीमीटरने उघडण्यात आली आहे.या निर्णयामुळे प्रति सेकंद 16.56 घनमीटर इतका पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येत आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्ष, दगडपारवा प्रकल्प, अकोला यांनी दिली.तर नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदी पात्र ओलांडू नये, तसेच गावपातळीवर सतर्कता ठेवावी, असा इशारा देण्यात आला आहे.
3
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 07:47:16
Washim, Maharashtra:वाशिम: File:1309ZT_WSM_KAMARAGAON_RURAL_HOSPITAL रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आकस्मिक विभागासमोर अनेक दिवसांपासून पाण्याची डबकी साचलेली आहेत.दररोज परिसरातील तब्बल २५ खेड्यांमधून ३०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेमुळे डेंगू, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. कारंजा- अमरावती महामार्गावर वारंवार अपघात घडत असून, जखमींना तातडीने उपचार मिळणारे हेच एकमेव शासकीय रुग्णालय आहे.तरीसुद्धा परिसरातील स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करून रुग्णालय परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 13, 2025 07:46:12
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1309ZT_CHP_BUS_IN_FLOOD ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात रेल्वे मार्गाच्या अंडरपासमध्ये बस बुडाली, बस बंद पडल्यावर सर्व प्रवासी निघाले होते बाहेर अँकर : रेल्वे मार्गाच्या अंडर पास मध्ये बस बिघडली आणि त्यानंतर आलेल्या पावसाने ही बस पूर्णपणे पाण्याखाली गेली. सुदैवाने प्रवासी आधीच बाहेर पडल्याने अनर्थ टळला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यातील कारवन इथे घडली. प्रवासी घेऊन जाणारी ही बस अंडरपास जवळ येताच नादुरुस्त झाली. त्यानंतर प्रवासी बाहेर पडले, पण बस तिथेच उभी राहिली. काही वेळाने मुसळधार पाऊस आल्याने इथे पाणी साचले आणि त्यात ही बस पूर्णपणे बुडाली. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 13, 2025 07:45:49
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात धर्मांतराचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे, पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गावात आदिवासी समाजातील एका व्यक्तीस पैशाचे आमिष दाखवून धर्म बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात तब्बल ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Vo 1 : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंधारसावंगी गावात धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी देवानंद चवरे हे एका पायाने अपंग असून दम्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे की, गावातील सोनाजी शिंदे यांनी त्यांना थांबवून एका प्रार्थनेत सहभागी होण्यास सांगितलं. यावेळी शिंदे यांनी धर्मांतरण केल्यास तुमचा रोग बरा होईल त्याच प्रकारे तुम्हा पन्नास हजार ते एक लाख रुपये सुद्धा मिळतील असं आश्वासन दिलं असल्याची तक्रार चवरे यांनी पोलिसात दिलीय.. Byte : देवानंद चवरे, तक्रारकर्ता. Vo 2 : ही माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहोचताच त्यांनी तत्काळ शिंदे यांच्या घरी धाव घेतली. तिथे ३५ ते ४० अनोळखी पुरुष आणि महिला मेणबत्त्या लावून प्रार्थनेत सहभागी होत असल्याचं निदर्शनास आलं.घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक तपासा नंतर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचे गंभीर आरोप समोर लावण्यात आले आहे. Byte : गजानन पडघन, उपविभागीय पोलीस अधिकारी , बाळापुर. Vo 3 : काही महिलांनी आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं की “आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आणि फक्त नातेवाईकाकडे प्रार्थना करण्यासाठी आलो होतो तर कोणावरही धर्म बदलण्यासाठी दबाव टाकलेला नाही.” Byte : शितल गवई, धर्मांतरण करत असल्याचा आरोप असलेल्या महिला. Final Vo : अंधारसावंगीतील हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात असून, धार्मिक सलोखा राखणे ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असल्याचं मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे.पोलिसांकडून सध्या सखोल तपास सुरू असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहे. जयेश जगड, झी मीडिया, अकोला
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 13, 2025 07:45:13
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1309ZT_JALNA_BJP_ANDOLAN(10 FILES) जालना | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री यांचा काँग्रेस पक्षाकडून अपमान जालन्यात भाजपा महिला आघाडी आक्रमक भाजप कार्यालयासमोर काँग्रेसच्या विरोधात जोरदार निदर्शने अँकर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिरा बेन यांचा काँग्रेस पक्षाकडून एका कार्यक्रमांमध्ये अपशब्द वापरून अपमान करण्यात आल्याचा आरोप भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. यामुळे काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल काँग्रेसने जे खालच्या दर्जाचं राजकारण करून अपमान केला आहे, त्याबद्दल संपूर्ण देशाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. दरम्यान आज जालन्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. जालन्यात भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस पक्षाचा निषेध केला आहे.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली बाईट | संगीता गोरंट्याल, माजी नगराध्यक्षा, जालना (चष्मा असलेल्या) बाईट | शुभांगी देशपांडे, भाजपा पदाधिकारी
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 13, 2025 07:30:52
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_MarathaVsOBS Feed on - 2C ----------------------------------- Anchor - आरक्षणावरून मराठा आणि ओबीसीमध्ये सुरु झालेला संघर्ष आता चक्क शाळेच्या प्रांगणात पाहोचलाय. त्याचे कारण म्हणजे सरकारने काढलेल्या जी आर विरोधात याचिका दाखल करणाऱ्या संस्थालचालकाच्या शाळेतून आपल्या मुलांची टी सी काढण्याचा अर्ज 21 पालकांनी दिलाय. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काढलेल्या जी आर विरोधात अखिल भारतीय विरशैव शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धोंडे यांची नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे आश्रम शाळा आहे. या शाळेतून आपल्या मुलांच्या टी सी द्याव्यात असा सामूहिक अर्ज 21 पालकांनी दिलाय. हे सर्व पालक मराठा समाजाचे आहेत. या शाळेत आपल्या मुलांना पाठवणार नसल्याचा निर्णयही या पालकांनी घेतलाय. कोणताही जातभेद न करता धोंडे यांच्या शाळेत मुलांना प्रवेश दिलाय. पण संस्थाचालक धोंडे यांनी मराठा आरक्षणा विरोधी याचिका दाखल केली. त्यामुळे आमच्या मुलांना त्यांच्या शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा या पालकांनी घेतलाय. Byte - Byte - Byte - Byte -------------------------------
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 13, 2025 07:23:34
Washim, Maharashtra:वाशिम: File:1309ZT_WSM_STUDENTS_WRITING_BOARD रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम ॲंकर: डिजिटल युगात टॅब, स्मार्टबोर्ड, प्रोजेक्टर यांच्या चकाकीत पाटी-लेखनीसारखी पारंपरिक साधने जवळपास अदृश्य झाली आहेत.मात्र वाशीम जिल्ह्यातील अनसिंग येथील जिजामाता विद्यालयाने परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मेळ साधत एक वेगळा प्रयोग राबविला आहे. गणित शिक्षक ललित भुरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावीच्या ८० विद्यार्थ्यांना पाटी व लेखनी वाटप करण्यात आले असून गणितासह इतर विषयांचा सराव वर्गातच करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. व्हिओ: विद्यार्थ्यांची लेखनगती वाढवणे, चुका कमी करणे, पर्यावरणपूरक साधनांचा वापर वाढवणे, दप्तरातील ओझे हलके करणे आणि कागदाच्या अनावश्यक खर्चाला आळा घालणे हे या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती शिक्षक ललित भुरे यांनी दिली. बाईट:ललित भुरे, शिक्षक व्हिओ: पाटीवर सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांना गणितातील गुंतागुंतीची समीकरणे अनेकदा सोडवता येतात.एखादे उदाहरण चुकल्यास तात्काळ दुरुस्ती करता येते. त्यामुळे वर्षभरात लागणाऱ्या ‘रफ’ वहीची गरजच उरत नाही. कागदावर लिहताना झालेली चूक कागद वाया घालवते, पण पाटीवर पुन्हा पुन्हा सराव करता येतो. पर्यावरणालाही या माध्यमातून हातभार लागतो, शिवाय सततच्या सरावामुळे हस्ताक्षर सुधारल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बाईट: जय नागुलकर, विद्यार्थी बाईट: वैष्णवी शृंगारे, विद्यार्थीनी बाईट : आदित्य काळदाते,विद्यार्थी बाईट :श्रद्धा ईंगळे, विद्यार्थीनी एन्ड व्हिओ: त्रिमितीय आकृत्या, विज्ञानातील तक्ते-आकृती, गुणसूत्रे, भूगोलातील नकाशे यांचा अचूक सराव करण्यासाठी पाटी लेखन प्रभावी ठरत आहे. अभ्यास अधिक रंजक झाला आहे, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थीहित आणि पर्यावरणपूरक ता यांचा संगम घडवणाऱ्या या प्रयोगाचे वाशीम जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे.
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 13, 2025 07:19:00
Kalyan, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळता व्हिडीओ काँग्रेस ने व्हायरल केल्यानंतर भाजप आक्रमक कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीचे आंदोलन ... "माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान "काँग्रेस ने पुन्हा अस कृत्य केलं तर माफ करणार नाही - भाजप चा इशारा Anchor :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईशी मिळता जुळत्या एआय व्हिडिओवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. बिहार कॉंग्रेसच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर भाजपाने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेत निषेध नोंदवला आहे .कल्याण मध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीने काटेमानवली येथे काँग्रेसचा निषेध नोंदवला.यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचा फलक घेत "माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान " शरम करो शरम करो काँग्रेस पार्टी शरम करो ,महिला के सन्मान मे भाजप मैदान मे अशा जोरदार घोषणाबाजी केली . byte :- रेखा चौधरी भाजप महिला जिल्हाध्यक्ष byte..सुलभा गायकवाड आमदार
1
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 13, 2025 07:04:31
3
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 13, 2025 07:03:36
Manchar, Maharashtra:Feed 2C Slug: Manchar Darga Jamavbandi File:01 Rep: Hemant Chapude(Manchar) मंचर/पुणे Slug - मंचर दर्गा परिसरात जमावबंदी आदेश लागू Anc - पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे दर्ग्याखाली सापडलेले भुयार व दर्ग्याच्या बांधकामासंदर्भात उद्भवलेला वाद अजूनही पूर्णतः शांत झालेला दिसत नाही. काल पोलिस प्रशासन व महसूल विभागाने हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाच्या घेतलेल्या बैठकीत दर्ग्याचा कोसळलेल्या भागाला तात्पुरता आधार देण्यास परवानगी देण्यात आली होती तर इतर काम थांबविण्याचे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात मुस्लिम संघटनांनी दर्ग्याला आधार देण्यासाठी पक्के बांधकाम सुरू केले, असा आरोप हिंदू संघटनांनी केला. त्यामुळे काल उशिरा पुन्हा तणाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी व प्रशासनाने ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली होती. सध्या दर्ग्याला आधार देण्याचे काम थांबवले असून परिसरात अद्याप तणावपूर्ण शांततेचे वातावरण असले तरी दर्गा परिसरात व मंचर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर खबरदारी म्हणून पोलिसांनी कलम १४४ लागू करून दर्गा परिसरात जमावबंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू संघटना आज न्यायालयात जाऊन या बांधकामावर स्थगिती (स्टे) घेण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
2
comment0
Report
Advertisement
Back to top