Back
भारी बाढ़ का खतरा: खडकपूर्णा प्रकल्प से विसर्ग बढ़ा, गावों में सतर्कता जरूरी
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 06:17:07
Buldhana, Maharashtra
खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Anchor : बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्प १००% भरला आहे. धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने, प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकपूर्णा धरणाची पाणी पातळी ५२०.५० मीटर असून, सध्या प्रकल्पाचा एकूण उपयुक्त साठा ९३.४०४ द.ल.घ.मी. इतका आहे. आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. आज ४२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण ७४९ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची आवक लक्षात घेता, प्रकल्पाचे १९ वक्रद्वारे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. यापैकी ६ वक्रद्वारे नव्याने उघडण्यात आले.
सध्या ४६८५४.९६ घनफूट प्रतिसेकंद (cusecs) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही गुरेढोरे सोडू नयेत, मुलांना नदीपासून दूर ठेवावे आणि कोणीही मासेमारी किंवा वाहतुकीसाठी नदीपात्राचा वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने, विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 08:17:550
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 08:17:270
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 08:08:020
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 16, 2025 08:07:470
Report
UPUmesh Parab
FollowSept 16, 2025 08:07:170
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 08:06:040
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 08:05:100
Report
KJKunal Jamdade
FollowSept 16, 2025 08:04:490
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 07:50:430
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 07:49:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 07:49:300
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 16, 2025 07:47:170
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 07:46:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 16, 2025 07:45:410
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 16, 2025 07:45:140
Report