Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
प्रबोधनकार ठाकरे की पुण्यतिथि पर दादर में पुतला फूलों से सजाया गया; अमित ठाकरे उपस्थित
MKManoj Kulkarni
Nov 20, 2025 03:30:14
Navi Mumbai, Maharashtra
आज प्रबोधनकार ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या प्रबोधनकार ठाकरे चौकात असलेल्या पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले आहे. तर ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते करणार प्रबोधनकार यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे.यावेळी अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मनोज कुळकर्णी
118
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:32:03
Navi Mumbai, Maharashtra:खारघर टेकडी पर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांच्या निदर्शनास बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। वनविभागाकडून ठोस उपाययोजना करुन बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खारघर डोंगरावर विभागाकडून रोप लागवड करण्यात आली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून झाडे मोठी झाल्यामुळे घनदाट जंगलाचे जाळे पसरले आहे। विशेष म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर, Navi Mumbai, रोहिजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे। कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या, कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करीत असावे अशी चर्चा परिसरात सुरु आहे। चार महिन्यापूर्वी चाफेवाडी कडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पान थळ जागी सिसिटीव्ही तसेच पायाचे ठसे शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती; परंतु काही निदर्शनास आले नाही. त्यानंतर पुन्हा मंगळवार 18 रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता चाफेवाडी पाडा लगत ग्रामस्थांच्या बिबट्या निदर्शनास आल्यामुळे फणसवाडी आणि चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबटयांना बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 20, 2025 04:30:56
Satara, Maharashtra:सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या वाघीण STR T-04 म्हणजेच तारा हिला नियंत्रित पिंजऱ्यातील (Soft Release Enclosure) अनुकूलन पूर्ण केल्यानंतर आज नैसर्गिक जंगलात यशस्वीरीत्या मुक्त करण्यात आले. 18 नोव्हेंबरपासून एनक्लोजरचा दरवाजा उघडा ठेवूनही दोन दिवस तारा ही आतच थांबली होती. अखेर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता वाघीण डौलदारपणे बाहेर पडली आणि जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झाली. वाघीणीच्या अनुकूलन काळात तिचे वर्तन, शिकार प्रवृत्ती, हालचाल आणि आरोग्य यांचे वन्यजीव तज्ज्ञ आणि WII पथकाने नियमित निरीक्षण केले. तिला पूर्णतः तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. वाघीणीच्या मानेवर रेडिओ कॉलर बसविण्यात आला असून Satellite Telemetry आणि VHF Tracking द्वारे तिच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 04:20:07
105
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 20, 2025 04:18:48
Niphad, Maharashtra:बिबट्याच्या दहशतीमुळे शाळातील पटसंख्या झाली कमी... पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांनी सुरू केला ' एक काठी स्वसंरक्षणासाठी' उपक्रम..... अँकर IN: निफाड तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आल्या असताना, देवगाव येथील एका शाळेने अनोखा उपाय शोधत विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी तयार केलेला हा स्पेशल रिपोर्ट… व्हॉइस-ओव्हर (V/O): नाशिकच्या निफाड तालुक्यात गेल्या महिनाभरात बिबट्याने तब्बल पाच वेळा मानवांवर हल्ले केले. तर पंधरा ते वीस पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यांमुळे पहाटे ते रात्रीपर्यंत नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या दहशतीचा परिणाम थेट शिक्षणावर दिसू लागला. अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे शाळांच्या उपस्थितीत मोठी घट झाली होती. पालक मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत नव्हते. अशातच देवगाव येथील शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला — ‘एक काठी स्वसंरक्षणासाठी’. विद्यार्थ्यांना शाळेत येताना हातात काठी देण्यात येते, तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे साधे तंत्र शिकवले जात आहे. बाईट:शिक्षक V/O (Visuals: काठी घेऊन जाणारे विद्यार्थी) या उपक्रमाचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पुन्हा वाढ झाली आहे. V/O (Visuals: पिंजरा, बिबट्या पकडतानाचे फुटेज/फोटो) काही दिवसांपूर्वी याच शाळेच्या आवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले होते. तर दोन दिवसांपूर्वी एका शिक्षकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. बाईट: स्थानिक नागरिक बाईट :- विद्यार्थी व विद्यार्थिनी, अँकर OUT: एकीकडे बिबट्याचे वाढते हल्ले… आणि दुसरीकडे गावकऱ्यांची व शिक्षकांची धैर्याने केलेली तोंड देण्याची तयारी. देवगाव शाळेचा ‘एक काठी’ उपक्रम हा तात्पुरता उपाय असला तरी, सुरक्षिततेसाठी पावले उचळण्याचा तो एक प्रयत्न आहे. निफाड सह राज्यातील बिबट्यांची संख्या आणि दहशत कधी नियंत्रणात येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
69
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 20, 2025 04:17:27
88
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 20, 2025 04:16:58
Shirdi, Maharashtra:पक्ष विरोधी कारवाई केल्याने पक्षातून हकालपट्टी... उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून निष्ठावान सैनिकांची हकालपट्टी... पक्षाने हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू.... पत्रकार परिषदेत शिवसैनिक ढसाढसा रडले... राहाता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे , माजी नगरसेवक सागर लुटे , उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी... नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार... तर लुटे आणि सौ.होले नगरसेवक पदाचे उमेदवार... महाविकास आघाडीत सामिल न होता पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने कारवाई... एबी फॉर्म चोरल्याचा अनिल देसई यांचा पदाधिका-यांवर आरोप... राहाता - शिर्डी ठाकरे सेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप... ही ठाकरे सेना नाही तर KT सेना ( कोल्हे - थोरात सेना ) पठारे यांचा घणाघाची आरोप... गेल्या 30 वर्षापुंर राजेंद्र पठारे हे निष्ठावान शिवसैनिक.... जिल्हा उपप्रमुखासह अनेक पदे भुषवलीत.. विखे समर्थकांनी माझे घर जाळले , आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या मात्र पक्ष सोडला नाही... निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य... जिल्हयातील ठाकरे सेना संपवण्याचा थोरातांचा डाव... राजेंद्र पठारे यांची थोरातांवर घणाघाती टिका... bite - राजेंद्र पठारे , माजी उपनगराध्यक्ष
84
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:15:53
113
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 04:01:56
Ratnagiri, Maharashtra:ही निवडणूक कार्यकर्त्यांची ती ताकतीने लढणे गरजेचे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला पाहिजे या निवडणुकीमध्ये नाती आड यायला लागले...पण तुमचे आणि आमचे नातं महायुतीचं आहे... नात्यात अडकून राहिलो तर गडबड राजेश सावंत पार्टीचा भाग नाही राजेश सावंत यांचे स्टेटस बघणे सोडा भाजपने तुम्हाला काय दिले हे राजेश सावंत यांनी विसरता कामा नये... शिवाय त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी हे विसरता कामा नये महायुती विरोधात कुणी अर्ज भरला असेल तर ते मागे घ्या विरोधातला एखादा उमेदवार विजयी झाला तर काय होऊ शकते याचा विचार देखील झाला पाहिजे.. आपले उमेदवार जिंकले पाहिजेत
172
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 20, 2025 04:01:24
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांचा भाजपा प्रवेश रखडला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी संदीप नाईक यांना मोठी ऑफर दिलेय. नवी मुंबई महापालिके बाबत संदीप नाईकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उभे करण्यासंदर्भात पुढाकार घेतला तर मी त्यांचे स्वागत करेन अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलेय. शिंदे यांच्या वक्ताव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालेली पहायला मिळत असून संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा सक्रिय होतात का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.
117
comment0
Report
Advertisement
Back to top