Back
Mulund के बोगस कॉल 센टर केस में 5 गिरफ्तार, विदेशी नागरिक धोखा
MKManoj Kulkarni
Nov 13, 2025 02:37:04
Navi Mumbai, Maharashtra
अँकर -- मुलुंड येथे वैधारित्य सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर मुलुंड पोलिसांनी उध्वस्त केलं.. बँकेचे अधिकारी असल्याची बतावणी करुन कर्जाच्या आमिषाने ही टोळी Америка आणि कॅनडा देशातील नागरिकांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत एका मुख्य आरोपीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर राजेश गुप्टा, अभिषेक सूर्यप्रकाश सिग, तन्मयकुमार रजनीश दादसिंग, शैलेश मनोहर शेट्टी आणि रोहन मोहम्मद अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने कर्जाच्या आमिषाने आतापर्यंत अनेक विदेशी नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. अटकेनंतर पाचही आरोपींना मुलुंड. यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.मुलुंडच्या मुलुंड कॉलनीत काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची कर्जाच्या आमिषाने फसवणुक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली होती.
ही माहिती काढताना या पथकाने मंगळवारी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये छापा टाकलाद होता. यावेळी तिथे सागर गुप्ता हा त्याच्या इतर चार सहकाऱ्यांसोबत उपस्थित होता. या फ्लॅटमध्ये त्याने एक बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरु केल्याचे दिसून आले. लेंडीग पाईट या संस्थेचे पदाधिकारी असल्याचे भासवून, त्यांच्याकडील आंतरराष्ट्रीय ई-सिमकार्डचा वापर करुन सागर गुप्तासह इतर चौघेजण अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना कॉल करत होते. तयांना पे डे तत्त्वावर तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून नव्वद, शंभर आणि दिडशे डॉलर रक्कम जमा करण्यास सांगण्यात येत होते. मात्र ही रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर होताच त्यांना कुठलेही कर्ज न देता त्यांची फसवणुक केली जात होती.
या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल, दोन राऊटर, 76 हजाराची कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांना कर्ज मंजुरीचे काही कागदपत्रे सापडले असून या कागदपत्रांवरुन त्यांनी अनेक विदेशी नागरिकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या कर्ज प्रकरणात एकच अॅप्लिकेशन क्रमांक सापडला आहे.
या टोळीचा सागर गुप्ता असून त्याच्याकडे इतर चौघेही कामाला होते. सागरने कॉल सेंटर चालविणयासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवानगी घेतली नव्ती. तो त्याच्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवून कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणुक करत होता. त्यांच्याकडून प्रोसेसिंग फी घेऊन या पैशांचा अपहरण करत होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले जात होते.
107
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 13, 2025 04:17:570
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 13, 2025 04:17:470
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 13, 2025 04:17:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 13, 2025 04:16:550
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 13, 2025 04:16:380
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 13, 2025 04:16:280
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 13, 2025 04:06:360
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 13, 2025 04:06:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 13, 2025 04:05:480
Report
PNPratap Naik1
FollowNov 13, 2025 04:05:290
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 13, 2025 04:03:450
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 13, 2025 03:55:2688
Report
PNPratap Naik1
FollowNov 13, 2025 03:55:0458
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 13, 2025 03:54:5651
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 13, 2025 03:54:2084
Report