Back
बोर दहेगाव डेम से पानी छोड़ने पर किसान की मौत, प्रशासन पर हत्या का आरोप
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 03:32:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बोर दहेगाव धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आले आणि या प्रशासकीय ढिसाळपणामुळे एका शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. करंजगाव येथील ७४ वर्षीय भानुदास गंगाधर मगर यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या अचानक पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी दुपारी बोर दहेगाव धरणातून ३०० ते ४०० क्युसेक वेगाने अचानक पाणी सोडण्यात आले. नियमानुसार, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन किंवा प्रशासकीय यंत्रणेद्वारे सावध करणे बंधनकारक असते. मात्र, जलसंपदा विभागाने या नियमांना केराची टोपी दाखवली. सायंकाळच्या sुमारास भानुदास मगर आपली बैलगाडी घेऊन नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने मगर यांची बैलगाडी, गाय आणि ते स्वतः पुरात वाहून गेले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर करंजगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जाते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 17, 2026 04:48:58118
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 17, 2026 04:48:40181
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:46:44225
Report
SNSWATI NAIK
FollowMar 17, 2026 04:36:18940
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 04:35:59965
Report
PNPratap Naik1
FollowMar 17, 2026 04:32:24971
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 04:18:19990
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 17, 2026 04:16:251062
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 17, 2026 04:16:10905
Report
KPKAILAS PURI
FollowMar 17, 2026 04:15:27991
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 04:01:21932
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 03:49:47978
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 03:48:101079
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 03:32:091097
Report