Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

अर्जुनी–मोरगांव के किसानों का आंदोलन; आठ दिन में मांगें पूरी न हों तो तेज़ प्रदर्शन

PTPRAVIN TANDEKAR
Mar 17, 2026 03:02:20
Bhandara, Maharashtra
अर्जुनी/मोरगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांत तीव्र आंदोलनाचा इशारा. हजारो शेतकऱ्यांचा सहभाग. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ अर्जुनी/मोरगाव व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्तरित्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 04:36:18
Navi Mumbai, Maharashtra:थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर करून नागरिकांना कर भरण्याची संधी दिलेय. मात्र तरी काही मालमत्ताधारकांकडून अजूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येतेय. नवी मुंबई मनपाने थकीत कर वसुलीसाठी आता अटकावणीची मोहीम तीव्र केली असून या मोहिमे अंतर्गत नवी मुंबई मनपा क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर धारकांच्या एकूण 130 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आलेय. सर्व थकीत मालमत्ता धारकांनी ‘अभय योजना’चा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरावा, अन्यथा अशाच प्रकारे अटकावणीची कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 17, 2026 04:32:24
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 04:18:19
Junnar, Pune, Maharashtra:ओतूर परीक्षा केंद्रात वर्गात घुसून कोयत्याने हल्ला. अल्पवयीन परीक्षार्थी जखमी मानाच्या वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली. जुन्या वादातून प्रकार पाच जण ओतूर पोलिसांच्या ताब्यात. पुणे जिल्ह्याच्या ओतूर येथे श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षा केंद्रात धक्कादायक घटना घडलीय.यात एका अल्पवयीन कॉलेज तरूणाने वर्गात घुसून परीक्षेला बसलेल्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून मानेवर केलेला वार हातावर झेलल्यामुळे बालंबाल बचावला; मात्र या झटापटीत त्याच्या हाताला दुखापत झालीय, संबंधित दोघांमध्ये यापूर्वीपासून वाद होता. त्याच जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना वर्गात घुसून हल्ला झाल्याने परीक्षा केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कोयताधारी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या सोबत असलेल्या आणखी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
860
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 17, 2026 04:16:25
Amravati, Maharashtra:स्वच्छता कंत्राटदारावर मनपाची कारवाई; 9.65 लाखांचा ठोठावला दंड, स्वच्छतेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही महापालिकेचा इशारा अमरावती महानगरपालिकेने शहर स्वच्छतेच्या कामात त्रुटी आढळल्याने स्वच्छता कंत्राटदार कोंणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर मोठी कारवाई केली है। करारातील अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कंपनीवर 9 लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला है। महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या पाहणीत स्वच्छतेच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यानंतर मनपा प्रशासनाने हा दंडात्मक निर्णय घेतला। शहर स्वच्छतेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर पुढेही कडक कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले है。
880
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 17, 2026 04:16:10
Satara, Maharashtra:सातारा -कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे समोर आले आहे. पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे एक ते दोन वाजण्याच्या sुमारास ही चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी सुमारे तासभर परिसरात वावरत दुकाने लक्ष्य केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे..चोरट्यांनी उंब्रज येथील ओम मेडिकल, सिद्धनाथ मेडिकल, श्री गजानन मेडिकल, पायोनियर मेडिकल, जी मोबाईल शॉपी आणि रुद्र पान शॉप अशी सहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी उंब्रज येथील एका ज्वेलर्स मालकाचे दिवसाढवळ्या सोने-चांदी असलेली 25 लाखाची बॅग चोरट्यांनी पळवली... मात्र अद्याप चोर पोलिसांच्या हाती लागला नसल्याने उंब्रज पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे.
708
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 17, 2026 04:15:27
870
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 17, 2026 03:49:47
925
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 03:48:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुर शहर भाजपच्या युवा मोर्चाच्या जम्बो कार्यकारिणीला शहराध्यक्षांनी दिली स्थगिती - सोलापुरात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीला शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली स्थगिती - भाजपा शहर युवा मोर्चाकडून जम्बो कार्यकारणी करण्यात आली होती जाहीर - मात्र शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी अचानकपणे जम्बो कार्यकारिणीला स्थगिती दिल्याने अनेक चर्चांना उधाण - भाजप युवा मोर्चा मध्ये वादग्रस्त नियुक्ती असल्याची चर्चा - कार्यकारिणी सर्वसमावेशक नसल्याचे कारण पुढे करत करण्यात आली कारवाई - भाजपच्या युवा संघटनेत उडाली खळबळ तर नव्या कार्यकारिणीकडे सर्वांचे लक्ष
937
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 17, 2026 03:32:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बोर दहेगाव धरणातून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आले आणि या प्रशासकीय ढिसाळपणामुळे एका शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. करंजगाव येथील ७४ वर्षीय भानुदास गंगाधर मगर यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या अचानक पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी दुपारी बोर दहेगाव धरणातून ३०० ते ४०० क्युसेक वेगाने अचानक पाणी सोडण्यात आले. नियमानुसार, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना दवंडी देऊन किंवा प्रशासकीय यंत्रणेद्वारे सावध करणे बंधनकारक असते. मात्र, जलसंपदा विभागाने या नियमांना केराची टोपी दाखवली. सायंकाळच्या sुमारास भानुदास मगर आपली बैलगाडी घेऊन नदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने मगर यांची बैलगाडी, गाय आणि ते स्वतः पुरात वाहून गेले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर करंजगाव परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जाते.
1053
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 03:32:09
Nashik, Maharashtra:96 महिलांच्या तपासणीनंतर स्त्री बीजप्रकरणी पडताळणी..महापालिकेचे पथक बदलापूरला जाणार अँकर नाशिकात स्त्री बीज तस्करी प्रकरणात मालती आयव्हीएफचे संचालक डॉ. अमोल पाटील यांच्यावरील तपास अधिक शीघ्रगतीने केला जात आहे. 96 महिलांकडून स्त्री बीज घेतल्याच्या तपासणीनंतर महापालिकेचे आरोग्य पथक बदलापूरला जाऊन या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची पडताळणी करणार आहे....या प्रकरणी मनपाच्या आरोग्य विभागाकडून तपासासाठी बदलापूर येथील संबंधित केंद्रातील महिलांची नावे मागवली होती. शहरातील भुजबळ फॉर्मजवळील मालती आयव्हीएफ केंद्रातील नोंदींची तपासणी करताना 96 महिलांकडून स्त्रीबीज घेतल्याची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. नाशिकमधील काही महिला बदलापूर केंद्रातही गेल्या होत्या का, याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेचे पथक बदलापूरला भेट देणार आहे...
1095
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 03:31:25
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बापू पुलाजवळ गोदावरी नदीत आदळला मृत माशांचा खच गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने आजवर कोट्यवधी रुपये खर्च केले, गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी खास गोदावरी संवर्धन कक्ष स्थापन करून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. गोदावरीवरील बापू पुलाजवळील पात्रात पाण्यातील मासे मृतावस्थेत तरंगताना आढळले. यामुळे संवर्धन कक्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सावरकरनगर जवळच्या बापू पुलाजवळ नदीकाठी मृत माशांचा ढीग सापडला. रसायनमिश्रित सांडपाणी थेट गोदावरीत सोडण्यात येते. यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने माशांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
1070
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 17, 2026 03:30:14
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पूर्वी रोज 2 लाख गॅस बुकिंग मात्र आता टंचाईच्या भीतीपोटी दररोज तब्बल 17 लाख गॅसची होतेय बुकिंग - घरगुती गॅस सिलेंडर टंचाईच्या भीतीपोटी नागरिकांकडून पॅनिक बुकिंगला सुरवात - पूर्वी रोज सरासरी 2 लाख गॅसचे होत होते बुकिंग आता मात्र दररोज 17 लाख घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग - टंचाईच्या भीतीपोटी गॅस बुकिंगची संख्या वाढल्याने सर्व्हर मंदावला तर दुसरीकडे गॅस वितरणाचा बोजवारा उडाल्याच चित्र - सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन कक्षाची स्थापना तर नागरिकांना गॅस वितरण बाबत तक्रारी करण्यासाठी हेल्पलाइन नंबरची घोषणा - परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, पुरवठा अधिकारी, महापालिका आयुक्त यांची समिती स्थापन
1089
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 03:21:03
1093
comment0
Report
Advertisement
Back to top