Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

ओतूर के परीक्षा केंद्र में नाबालिग ने कक्षा में घुसकर कोयता से हमला, घायल छात्र

HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 04:18:19
Junnar, Pune, Maharashtra
ओतूर परीक्षा केंद्रात वर्गात घुसून कोयत्याने हल्ला. अल्पवयीन परीक्षार्थी जखमी मानाच्या वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली. जुन्या वादातून प्रकार पाच जण ओतूर पोलिसांच्या ताब्यात. पुणे जिल्ह्याच्या ओतूर येथे श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षा केंद्रात धक्कादायक घटना घडलीय.यात एका अल्पवयीन कॉलेज तरूणाने वर्गात घुसून परीक्षेला बसलेल्या दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून मानेवर केलेला वार हातावर झेलल्यामुळे बालंबाल बचावला; मात्र या झटापटीत त्याच्या हाताला दुखापत झालीय, संबंधित दोघांमध्ये यापूर्वीपासून वाद होता. त्याच जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षा सुरू असताना वर्गात घुसून हल्ला झाल्याने परीक्षा केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कोयताधारी अल्पवयीन आरोपीसह त्याच्या सोबत असलेल्या आणखी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 05:17:02
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात आर्थिक अपहार, कर्तव्यात कसूर, मुख्यालयी अनुपस्थिती आणि कामकाजातील अनियमितता यांसारख्या तक्रारींवरून चालू २०२५-२६ आर्थिक वर्षात ३२ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर खातेचौकशी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून थेट निधी मिळतो.मात्र निधी अपहार व अन्य अनियमिततेच्या तक्रारींमुळे आयुक्त व जिल्हा परिषद स्तरावर चौकशी केली जात आहे.आयुक्त स्तरावर २२ अहवाल प्राप्त झाले असून,त्यापैकी ३ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, तर १९ प्रकरणांवर पुढील कारवाई प्रस्तावित आहे.या कारवाईमुळे चुकीचे काम करणाऱ्यांना कडक इशारा मिळाला असून प्रशासनाने गैरप्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचा संदेश दिला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 17, 2026 05:15:18
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. वढू बुद्रुक येथे जमीनाच्या वादातून सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांकडून आई ला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय, सावत्र मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये जमीन वाटपावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी वृद्ध आईला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आई गंभीर जखमी झाली असल्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नात्यांना काळीमा फासणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 17, 2026 05:07:22
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ शहरात केंद्र व राज्य सरकारच्या अमृत पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये या योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात उतरून शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगन्लावार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. सन २०१९ पर्यंत अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या योजनेचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून अनेक अपघात देखील घडत आहेत. लाखो लिटर पाण्याचा देखील अपव्यय होत आहे. पाच ते सहा दिवसात लोकांना पाणी मिळत आहे. जीवन प्राधिकरणाने या समस्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय उपगन्लावार यांनी दिला आहे.
819
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 17, 2026 04:48:58
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाने कारवाईची मोहीम सुरू आहे. पुरवठा विभागाने मालेगाव शहरातील हॉटेल्सवर धाड टाकून तपासणी केली.मालेगाव शहरात पुरवठा विभागाच्या वतीने एकूण १४ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.या तपासणीदरम्यान दोन हॉटेल्समध्ये घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आले.त्यामुळे संबंधित हॉटेल्समधून दोन घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले.ही कारवाई मालेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या पथकाने केली असून,अशा प्रकारचा अवैध वापर करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
898
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 04:46:44
1032
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 17, 2026 04:36:18
Navi Mumbai, Maharashtra:थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने ‘अभय योजना’ जाहीर करून नागरिकांना कर भरण्याची संधी दिलेय. मात्र तरी काही मालमत्ताधारकांकडून अजूनही मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येतेय. नवी मुंबई मनपाने थकीत कर वसुलीसाठी आता अटकावणीची मोहीम तीव्र केली असून या मोहिमे अंतर्गत नवी मुंबई मनपा क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर धारकांच्या एकूण 130 मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आलेय. सर्व थकीत मालमत्ता धारकांनी ‘अभय योजना’चा लाभ घेऊन लवकरात लवकर कर भरावा, अन्यथा अशाच प्रकारे अटकावणीची कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनाकडून देण्यात आलाय.
1021
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 17, 2026 04:32:24
1046
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 17, 2026 04:16:25
Amravati, Maharashtra:स्वच्छता कंत्राटदारावर मनपाची कारवाई; 9.65 लाखांचा ठोठावला दंड, स्वच्छतेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही महापालिकेचा इशारा अमरावती महानगरपालिकेने शहर स्वच्छतेच्या कामात त्रुटी आढळल्याने स्वच्छता कंत्राटदार कोंणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर मोठी कारवाई केली है। करारातील अटींचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कंपनीवर 9 लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला है। महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या पाहणीत स्वच्छतेच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या। त्यानंतर मनपा प्रशासनाने हा दंडात्मक निर्णय घेतला। शहर स्वच्छतेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर पुढेही कडक कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले है。
1069
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 17, 2026 04:16:10
Satara, Maharashtra:सातारा -कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असल्याचे समोर आले आहे. पाटण तिकाटणे परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे एक ते दोन वाजण्याच्या sुमारास ही चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी सुमारे तासभर परिसरात वावरत दुकाने लक्ष्य केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे..चोरट्यांनी उंब्रज येथील ओम मेडिकल, सिद्धनाथ मेडिकल, श्री गजानन मेडिकल, पायोनियर मेडिकल, जी मोबाईल शॉपी आणि रुद्र पान शॉप अशी सहा दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी उंब्रज येथील एका ज्वेलर्स मालकाचे दिवसाढवळ्या सोने-चांदी असलेली 25 लाखाची बॅग चोरट्यांनी पळवली... मात्र अद्याप चोर पोलिसांच्या हाती लागला नसल्याने उंब्रज पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे.
1051
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 17, 2026 04:15:27
1015
comment0
Report
Advertisement
Back to top