Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210
उपमुख्यमंत्री अजीत पवार के निधन के बाद जिल्हा परिषद व पंचायत समिति प्रचार शुरू
SNSWATI NAIK
Feb 01, 2026 11:47:38
Navi Mumbai, Maharashtra
Anchor -: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला ब्रेक लागला होता.आज रविवारी पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका पहायला मिळत आहे. रायगड मधील गव्हाण जिल्हा परिषद आणि वहाळ पंचायत समिती निवडणुक्यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केलेय. वहाळ गावात प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 04:05:11
17
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 16, 2026 04:03:13
Bhandara, Maharashtra:ऐन हंगामात शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक...शेतात उभा असलेला ट्रॅक्टर जळून खाक....6 लाख रुपयांचे नुकसान...कुडेगाव येथील घटना... शेतकऱ्याची कुडेगाव - गवराळा मार्गालगत मालकीची शेती आहे.या शेतात खरीप हंगामानंतर त्यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली होती. सध्या रब्बी पिकांची कापणी करून उन्हाळी धान पिकाच्या लागवडीपूर्वी ते आपल्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी दिवसभर आपल्या 'जॉन डिअर' कंपनीच्या ट्रॅक्टरने शेतीची कामे केली आणि रात्री ट्रॅक्टर शेतातच उभा करून ठेवला होता.मध्यरात्री ट्रॅक्टरला आग लागल्याने त्याचे इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले.शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात येताच पीडित शेतकऱ्याने स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
93
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 03:50:03
Amravati, Maharashtra:दरियापुरात सिलेंडर तपासणी दरम्यान हॉटेल व्यवसायाची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कारवाईदरम्यान गोंधळ, जप्त गॅस सिलेंडर जमावाने पळविले दर्यापूरात महसूल विभागाने हॉटेलवर सर्च मोहीम राबवली असून त्यामध्ये हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे स्पष्ट झाले. यावर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. दर्यापूर शहरातील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून अधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. मात्र कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आणि गोंधळ निर्माण झाला. काहींनी अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची घटना समोर आली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण घेऊन गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
153
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 03:33:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'कृत्रिम कासव आकाराचा धबधबा' आणि 'रेनडान्स'चे लोकार्पण करण्यात आले, तसेच पर्यटकांच्या निवासासाठी प्रस्तावित असलेल्या भव्य 'लेक व्ह्यू रिसॉर्ट'चे भूमिपूजनही करण्यात आले. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर आणि कागलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
147
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:33:03
Nagpur, Maharashtra:Ngp Vikas Thakre live u ने फीड पाठवले नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस नेते - एक महिना झाल्याशिवा, गॅसची बुकिंग होत नाही असा अनुभव आहे. प्रत्येक आस्थापनाजवळ रांगा लागले आहेत. घरगुती गॅसपासनं सामान्य माणूस वंचित आहेत. - जनतेची दिशाभूल कोणीच करत नाही आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला आहे. गॅस आस्थापनेजबळ रांगा लागलेल्या आहेत. गॅसच्या तुटवडा आहे हे आता सिद्ध होत आहे. - ऑन् हॉटेल बंद - विधानसभा अध्यक्षांनी बोलण्याची संधी दिली तर जरूर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील मुद्दा विधानसभेत मांडू. - विधानसभा अध्यक्ष बोलू देतात कोणत्या विषयावर बोलायचे आहे हा त्यांच्या अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष यांना वास्तविकता सांगू आणि संधी मिळाली तर आम्ही गॅस तुटवडा संदर्भातील विषय मांडू. - ऑन् नागपूर स्वीकृत नगरसेवक - काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही. विषय पत्रिकेवर विषय येईल त्यावेळी चर्चा करून हा निर्णय घेऊ. - ऑन् खाजगी (ओएसडी महापौर) - ज्यांनी स्थायी समितीमध्ये, महापौराकडे काम केलं आहे. अनुभवाच्या हेतूने विरोधी पक्षा नेते यांना या संदर्भात विचारा लागेल.
107
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 03:31:29
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात सात बहिणी डोंगर परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात पाच पर्यटक जखमी, स्वॅब संस्थेच्या स्वयंसेवकांनी राबविले मिशन रेस्क्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातल्या सात बहिणी डोंगरावर मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल पाच पर्यटक जखमी झाले. हे लोक लहान मुलाचा नवस फेडण्यासाठी आले होते. मात्र दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने सर्व सैरावैरा पळू लागले. हा दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित पोचणे कठिण होत होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात सर्व जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोचले. जखमीना उपचारार्थ गोविंदपूर आणि तळोधी येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. पर्यटकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
148
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:31:02
Nagpur, Maharashtra:Ngp Ngp Patole live u ने फीड पाठवले नागपूर बाईट - नाना पटोले, कॉंग्रेस नेते. - देवेंद्र फडणवीस यांनी त्यात त्यांनी सांगितले कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध नाही. घरगुती गॅस उपलब्ध करून देऊ शकतो.. - *कमर्शियल गॅस देऊ शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ गॅसचा तुटवडा आहे...हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं, सरकारच आता हे गॅसवर आलेली आहे.* - कोरोना काळात राहुल गांधी यांनी सर्व सीमा सील करा अस सांगितले होते...नाहीतर जीव जाईल.. पण नरेंद्र मोदी यांच्या हेडकपणामुळे कोरोना व्यवस्था झाली नाही. त्यामुळे अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले , हे पाप भाजपचे होते. - तुटवडा नाही असं सांगत मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहे - राज्यात उद्योग हॉटेल्स का? बंद झाले. विधानसभेत विचारणार आहे..वास्तविकता सरकारने मांडावी त्या पद्धतीचे अस्वस्थ कराव कोरोनातही खोटे बोलले.. ते करू नये. On राहुरी, बारामती बिनविरोध निवडणूक - अजून निर्णय झालेल्या नाही.. कालच निवडणुका जाहीर झालेल्या आहे... त्यावर बसून निर्णय घेऊ.
191
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 16, 2026 03:20:08
Nagpur, Maharashtra:विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - राहुरी आणि बारामती येथील पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात का याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, सत्ताधारी किंवा इतर पक्षांकडून अद्याप या संदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. - मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकांना बिनविरोध व्हाव्यात असे आवाहन केले होते. आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. बिनविरोध झाल्यास ते योग्यच ठरेल, पण याबद्दल आधी चर्चा होणे गरजेचे आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी आम्ही बिनविरोधचा विचार केला होता, मात्र सत्ताधाऱ्यांनी उमेदवार उभे केले होते, त्यामुळे त्यांची भूमिका तपासून पाहू, - ‘नमो शेतकरी स्वाभिमानी योजना’साठी राज्य सरकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी योजनांचा निधी वापरणार केला. सरकारकडून समाजकल्याण आणि आदिवासी विभागासाठी मोठे बजेट दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी समाजकल्याण विभागाचा केवळ सुमारे ४५ टक्के निधी खर्च झाला, तर आदिवासी विभागात केवळ सुमारे ३८ टक्के निधी खर्च करण्यात आला. - सरकार बजेट फुगवून दाखवत असून नंतर तो निधी इतर योजनांकडे वळवला जातो, यामुळे ज्या घटकांसाठी निधी मंजूर केला जातो त्यांनाच त्याचा लाभ मिळत नाही - धर्मांतरासंदर्भातील कायद्याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, दोन समाजांमध्ये तणाव निर्माण करून मतांची राजकारण करण्यासाठी असे कायदे आणले जात आहे. यासाठी काही विषारी मंत्री पोसले जात आहे. ( नितेश राणे यांच्यावर टीका ) त्यांनी घेतली झाली शपथ याचा अर्थ तरी त्यांना कळतो का?
120
comment0
Report
Advertisement
Back to top