Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
बारिश से ऊस पर संकट: कोल्हापुर में रोगी कीड़ों का कहर
PNPratap Naik1
Sept 16, 2025 09:04:34
Kolhapur, Maharashtra
Story:- Kop Us Humani Story Feed:- Live U Anc:- सलग पडणाऱ्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. बहुतांश ऊस पट्ट्यात पावसाचा जोर मोठा असल्याने हा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. यंदाचा गळीत हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना शिवारात आवश्यक असणारा वाफसा मिळालेला नाही. त्यामुळे उसावर तांबेरा, पोका बोंग, मावा करपा या किडीने ऊसाला पोखराला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीला उत्पादन घटन्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात एकूण 3 लाख 91 हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे, त्यापैकी तब्बल 50% म्हणजेच सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचं पीक उभ आहे. यातील 20% हून अधिक ऊस पिकावर तांबेरा, पोका बोंग, मावा किडीचे प्रादुर्भाव दिसून येत आहे. Play Byte:- जालिंदर पांगारे, जिल्हा कृषी अधीक्षक कोल्हापूर
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 03:23:35
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची अंतिम अधिसूचना पुढील आठवडाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने प्रस्तावित भूसंपादनात केलेले बदल आणि सुधारित नकाशानुसार मोजणी पूर्ण झाल्यामुळे आता या प्रक्रियेला गती मिळाली आहे. घावपट्टीची सध्याची लांबी ९,३०० फूट असून ती १२,००० फुटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी दक्षिण बाजूने सुमारे १४७ एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी ५०۰ कोटींपेक्षा अधिक निधी लागणार आहे आणि यासाठी शासनाकडे निधी मंजुरीचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये प्रारंभिक अधिसूचना काढल्यानंतर हरकर्तीवर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, भूसंपादनाच्या जमिनीच्या गट क्रमांकात बदल झाल्यामुळे प्रक्रिया लांबली.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 13, 2025 03:23:14
Beed, Maharashtra:फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची वंजारी घर परिवार वॉट्सअप ग्रुपच्या वतीने सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदत करण्यात आली. या भेटीत ग्रुपच्या सदस्यांनी कुटुंबیاںना मानसिक आधार देत घटनेची माहिती जाणून घेतली आणि आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. राज्यभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त होत असून विविध ठिकाणी आंदोलनंही सुरू आहेत. वंजारी घर परिवाराने या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 13, 2025 03:22:52
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 13, 2025 03:22:13
Nashik, Maharashtra:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या उद्घाटनांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रীরা एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहे... तब्बल साडेपाच हजार कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी ते नाशिक दौऱ्यावर येणार आहे... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य असा रामकालपट तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित असणार आहे... त्यानंतर रामकुंड परिसराची पाहणी करून त्र्यंबक रोड येथे नव्याने जिल्हा परिषदेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे... यानंतर त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी जाहीर सभा ठक्कर मैदान परिसरात पार पडणार अस....
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 13, 2025 03:19:23
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 13, 2025 03:18:58
Nashik, Maharashtra:अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जि.प.ची नवीन पर्यावरणपूरक हरित इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक हरित इमारत संकल्पना वापरून बांधण्यात आलेली असून, निम्म्या विजेची निर्मिती सौरविजेद्वारे होणार असून, सर्व अत्याधुनिक सुविधांची पूर्तता त्यात करण्यात आली आहे. इमारत पर्यावरणपूरक संकल्पनेनुसार हरित इमारतीच्या सर्व बाबींची पूर्तता त्यात करण्यात आली आहे. प्रारंभी तीन मजल्यांची निश्चित इमारत कोरोनापश्चात सहा मजल्यांची करण्याचे निश्चित झाले. वाढीव खर्चासह ८२ कोटींच्या निधीसह ही इमारत उभारण्यात आली आहे. प्राथमिक स्तरावर पहिला मजला हा महिला व बालकल्याण, समाजकल्याण व सर्व शिक्षा अभियानसाठी असणार आहे. पहिल्याच मजल्यावर बँकेसाठी जागा देण्यात आली आहे. तर दुसऱ्या मजल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, सामान्य प्रशासन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन उभारण्यात आले आहे. तिसऱ्या मजल्यावर अध्यक्ष यांचे दालन, आरोग्य विभाग, एनआरएचएम विभाग, लेखा व वित्त विभाग तर इमारतीच्या तळ मजल्यावर दोन मजले स्वतंत्र पार्किंग करण्यात आलीये...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 13, 2025 03:03:56
Nagpur, Maharashtra:नागपूर - गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ आणि बिबटे आहे. आठ वाघ आणि सहा बिबट्यांच्या स्थलांतराचा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) वन विभागाकडून पाठविण्यात आलेला प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.. - मात्र अद्यापही त्याला हिरवा कंदील न दिल्याने दोन्ही वन्यप्राण्यांचे स्थलांतरण रखडले आहे.. - एकीकडे वन्यप्राणी आणि मानव संघर्ष वाढला आहे... दुसरीकडे हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत आहे... बिबट आणि वाघ यांना केंद्रात आणले जाते... - गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात सध्या २४ वाघ आणि ३० बिबटे आहेत. प्राणी संग्रहालयाची क्षमता १० आणि २० वाघ आणि बिबट ठेवण्याची आहे. - यात इतर राज्यातून सुद्धा केंद्रीय वाघ आणि।बिबट्याची मागणी प्रलंबित आहे.. - गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूरसह महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानले जाते. मात्र क्षमतेपेक्षा जास्त संख्या असल्यानं प्राण्यांची योग्य पुनर्वसन प्रक्रिया वेळेत पार पडणे अत्यावश्यक आहे.
91
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 03:03:39
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात दाखल याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनासह छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काय प्रयत्न केले यासंबंधीची विचारणा करण्यात आली. या काळात किती अपघात झाले यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यशासनाला नोटीस बजावताना दिले. नेवासा ते अहिल्यानगर प्रवासासाठी ३ ते ४ तास वेळ लागत असल्याने वाहनधारकांसह बसने प्रवास करणाऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
39
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 13, 2025 03:03:08
Nashik, Maharashtra:मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर, महापालिकेकडून रात्री खड्डे बुजवण्याचे काम सुरू... नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न प्रलंबित असून आता आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजना साठी नाशिक दौऱ्यावर येणार आहे...आता महानगरपालिकेला रात्रीची जाग आली आहे... ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या रस्त्यावरील खड्डे हे रात्रीच्या वेळेस बुजवण्याचं काम महापालिकेकडून केले जाताय.... नाशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती मात्र मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने आता प्रशासनाला जाग आल्याच चित्र बघायला मिळतंय.... स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांनी खड्ड्यांसंदर्भात अनेक वेळा मोठे आंदोलन देखील उभे केले आणि वारंवार महापालिकेकडे खड्ड्यांचा प्रश्न मांडला... मात्र तरी देखील याचा काही तोडगा निघाला नाही... पण मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर येणार असून आता महापालिकेला जाग आली असून रात्रीच्या वेळेस खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेकडून केले जाताय....
75
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 13, 2025 03:02:51
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नगरपरिषद नगरपंचायतीसाठी 2 दिवसात फक्त 5 नामनिर्देशन पत्र, नगराध्यक्ष पदासाठी तर एकही अर्ज नाही मागील काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका येताच इच्छुक मोठ्या संख्येने समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जात होती; मात्र प्रत्यक्षात नामनिर्देशक पत्र भरण्याची दोन दिवस उलटून गेले तरीसुद्धा उत्साह पाहायला मिळत नसून आतापर्यंत फक्त कन्नड, पैठण या दोन नगर परिषदेसाठी 2 अर्ज दाखल झालेत तर वैजापूर नगर परिषदेसाठी 3 अर्ज असे एकूण 5 अर्ज दाखल झाले आहेत. हे पाचही अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी अजून पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे युती आघाडीचे समीकरण बघूनच इच्छुक समोर येतील अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.
71
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 13, 2025 02:48:20
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ; दहा शेळ्यांचा बळी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले आता मानवी वस्त्यांबरोबरच पशुधनावरही वाढले आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वाघाळे परिसरातील शेतकरी बाळासाहेब थोरात यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात घडलेल्या घटनेत बिबट्याने तब्बल दहा शेळ्यांचा प्राणघात केला. या घटनेमुळे थोरात यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्रामीण भागात अशा घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी वन विभागाच्या अधिकारी वर्गाला घेराव घालत बिबट्याला आता ठार मरावं नाहीतर पुन्हा एकदा पिंपरखेड घटनेला सामोरे जावे लागेल अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली.
39
comment0
Report
Advertisement
Back to top