Back
धाराशिव में अतिवृष्टि सहायता पर राजनीति गर्म, निंबाळकर और पाटील के बीच तीखी तकरार
DPdnyaneshwar patange
Dec 07, 2025 13:01:03
Dharashiv, Maharashtra
अतिवृष्टीच्या मदतीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यात वाद पेटला. चुकीची माहिती पसरवू नका, माहिती घेऊन बोला. भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना सल्ला. धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत प्रस्तावावरून राजकारण तापलं आहे… खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जोरदार शब्दयुद्ध रंगलं आहे. केंद्र सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत केली— राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच पाठवला नाही .असा प्रश्न खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. यावरूनच भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पलटवार करत खासदार ओमराजेंना ‘अर्धवट माहिती पसरवू नका’ असा तीखा टोला लगावला आहे. आमदार पाटील म्हणतात— राज्यातील शेतकऱ्यांना मदत करताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, राज्य सरकारने SDRF, NDRF च्या पलीकडे जाऊन मदत केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला होता… आणि त्यापैकी १४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधातील प्रतिनिधींनी अर्ध्या माहितीच्या आधारावर विधान करू नये. प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यातील सविस्तर माहिती घेऊनच बोलावं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 17:47:55208
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 17:00:55260
Report
KPKAILAS PURI
FollowDec 07, 2025 16:31:58187
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:25242
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:13194
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:16:03168
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:51213
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:40133
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:30135
Report
UPUmesh Parab
FollowDec 07, 2025 16:15:18253
Report
KJKunal Jamdade
FollowDec 07, 2025 14:31:37183
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 13:45:26138
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 12:30:5594
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 12:19:38170
Report