Back
प्रवीण दरेकर ने अबू आझमी-राज ठाकरे पर तीखा हमला; ईवीएम‑मतदाता सूची पर नया बयान
AAABHISHEK ADEPPA
Oct 31, 2025 08:17:30
Solapur, Maharashtra
SOLAPUR BREAKING : आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे - प्रवीण दरेकर LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/17E6dtW2Ae/ ))) - भाजप नेते प्रवीण दरेकर यांची अबू आझमी, राज ठाकरे,  वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका- राज ठाकरे यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावे, नाहीतर आपण दोष देत हरत राहताल- ईव्हीएम आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्याचं आयुष्य फुकट जाईल.- आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे- ऑन मुंबई गृह प्रकल्प :- हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक शहरात लागू होऊ शकतो. जशा प्रकारे मुंबईला लागू झालेला जीआर महाराष्ट्रासाठी लागू करून घेणार आहोत.- त्यामुळे रहिवाशीनी जर प्रकल्प केला तर बिल्डर जो नफा कमवणार आता ते कमवू शकतील. मुंबई जिल्हा बँकेकडून आम्ही पैसे देऊन अठरा प्रकल्प उभे केले. सरकारने मान्यता देत हे प्राधिकरण स्थापन झालेला आहे.- ऑन् कर्जमाफी आश्वासन :- सरकारची भूमिका ही शेतकऱ्याच्या सातत्याने बाजूने राहिलेली आहे. आम्हाला कर्जमाफी द्यायची होती पण त्यासाठी नियोजन आवश्यक होते. जून अखेरपर्यंत कर्जमाफी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कोणतेही राजकारण आणू नये. सरकार, विरोधी पक्ष आणि आंदोलकांनी एकत्र येऊन क्रांतिकारक निर्णय घेतला.- ऑन राज ठाकरे इव्हीएम :- मला वाटतं राजकारणामध्ये खरे राजकारण केलं पाहिजे, रडीचा डाव कोणी खेळता कामा नये. मला सांगा लोगशाहीमध्ये (लोकसभा) हे ईव्हीएम नव्हतं का, याच मतदार याद्या होत्या. लोकसभेला जिंकलो की, लोकशाही जिंकली. ज्या ठिकाणी हारतो, त्या ठिकाणी याद्या सदोष आहेत असे सांगायचं. राज ठाकरे यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावे, नाहीतर आपण दोष देत हरत राहताल- ईव्हीएम आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्याचं आयुष्य फुकट जाईल.- ऑन गड किल्ले :- गड किल्ल्या बाबत राज ठाकरे यांना जेवढी काळजी आहे. त्याबाबत राज्य सरकार तेवढेच संवेदनशील आहे.- ऑन अबू आझमी :- असे ठणकावऊन सांगणाऱ्याचं थोबाड फोडलं पाहिजे.- आपल्या देशात राहून जर वंदेमातरम न म्हणण्याची हिंमत येत असेल तर मला वाटतं अश्या प्रवृत्ती आणि अवलादी ठेचून काढल्या पाहिजे- राष्ट्रगीत, देशभक्ती गीत असेल सर्व जातीधर्माच्या समूहातील लोकांनी म्हणायला पाहिजे. यातून राजकारण करता कामा नये यातून जातीय तेढ निर्माण होता कामा नये.- ऑन उद्धव ठाकरे नोटीस :- मला याबाबत काही कल्पना नाही. त्यात तपासून पहिल्यानंतर योग्य भाष्य करता येईल- ऑन विजय वाडेट्टीवार :- त्यांना वाटलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दाद देणार नाही. पण त्यांच्या भ्रमनिरास झाला आहे. शेतकऱ्यांप्रती वडेट्टीवार यांना पुतना मावशीचे किती प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे.- विरोधकांना वाटलं की सरकार याकडे लक्ष देणार नाही. पण त्यांच्या दुर्दैवाने सरकारने निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या गुन्हेाबाबत ते प्रश्न उपस्थित करत आहेत. पण मराठा आंदोलकांवरील गुन्हे ज्या पद्धतीने माघारी घेतले तसेच होईल.- शेतकऱ्यांवर विनाकारण गुन्हे दाखल झाले असतील तर त्या गुन्ह्यांचे वर्गीकरण करून सरकार निर्णय घेईल.- ऑन रोहित आर्या एनकाउंटर :- रोहित आर्या याची बिल थकलेत की नाही हे माहीत नाही. पण त्याबद्दल केसरकरांनी भाष्य केले आहे. मात्र अशा पद्धतीने मुलांना वेठीस धरणार असतील आणि आतंकवाद माजवणार असतील तर पोलिसांनी केलेली कृती योग्य आहे.- राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हेगारीने डोकं वर काढता कामा नये. मुंबई पोलिसांना त्याबद्दल धन्यवाद देईन. आरोपीने 16 17 मुलांना वेठीस धरून स्टुडिओला आग लावून देऊ असे सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी केलेली कृती योग्यच आहे.- कंत्राटदारांच्या बिलांची परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे. मला त्याबद्दल कल्पना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे द्यायचे होते ती टॉप प्रायोरिटी होती. जे ठेकेदार आहेत ज्यांनी काम केले आहेत त्यांना सरकार टप्प्याटप्प्याने पैसे नक्की देईल.- ऑन एनकाउंटर प्रकरणी ऍड. नितीन सातपुते कोर्टात जाणार :- मला वाटतं अशा प्रकारच्या अवलादी समाजात आहेत. जर त्याच्यावरती स्वतःची मुलं असती तर असे भाष्य केले असते का?- मुलांना वेठीस धरून कोणी त्यांच भविष्य वेठीस धरत असतील तर आपली हीच भूमिका असती का?- समाजात अशा प्रवृत्ती आहेत की जे विपरीत गोष्ट निर्माण करायची त्याला चौकशीच्या भोवऱ्यात उभं करायचं हे दुर्दैवी आहे.- ऑन उद्धव ठाकरे ताफा सायरन :- सायरन कोणी लावावे याला काहीतरी नियमावली आहे. अशा पद्धतीने प्रोटोकॉलचा भंग झाला असेल तर ते दुर्दैवी आहे.- माजी मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या ताब्यात असं होणं म्हणजे त्यांच्यासोबतच्या यंत्रणेचा ढिसाळपणा आहे.- ऑन फलटण प्रकरण रमेश पाटील इशारा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार म्हणून याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. जे दोषी असतील ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांना सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केले. परंतु या भूमिकेच्या आड कोणत्या नेत्याला तुम्ही टार्गेट करणार असाल तर तेही योग्य नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं. नग्न आंदोलन करू अशा पद्धतीची बिभीत्स पद्धतीने मागणी करणे योग्य नाही. तसेच निंबाळकर यांच्या समर्थकांनी सुद्धा चामडी काढू अशा धमक्या देणे योग्य नाही. मला वाटतं नेते संयमी आहेत मात्र त्यांच्या फॉलोवर्सनी सुद्धा संयम बाळगणं गरजेचं आहे. Byte : प्रवीण दरेकर (भाजप नेते)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 31, 2025 14:16:480
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 31, 2025 14:04:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 31, 2025 13:03:420
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 31, 2025 12:47:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 31, 2025 12:47:060
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 31, 2025 12:37:420
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:35:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:20:270
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 31, 2025 12:18:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:15:370
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:15:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 31, 2025 12:12:140
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 31, 2025 12:12:010
Report
PNPratap Naik1
FollowOct 31, 2025 12:09:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 31, 2025 12:00:26Akola, Maharashtra:पिक विमा च्या नावाने सुरू असलेली शेतकऱ्यांची आर्थिक थट्टा..
विलास ताठोड, राज्य कार्यकारिणी , सदस्य शेतकरी संघटना
अविनाश पाटील ,  जिल्हाध्यक्ष , शेतकरी संघटना
0
Report