Back
Shinde-backed Shiv Sena forms natural alliance; BJP-NCP challenge in Sindhudurg
UPUmesh Parab
Nov 08, 2025 08:04:33
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग उदय सामंत बाईट मुद्दे.....
उदय सामंत ऑन युती
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. काल रत्नागिरी संदर्भात रवींद्र चव्हाण यांच्याशी बैठक झाली रत्नागिरी मध्ये युतीवर निर्णय झालाय. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी ही आमची नैसर्गिक युती आहे त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे असा निर्णय आमचा झाला आहे.
सिंधودुर्ग बाबत नितेश राणे यांनी मैत्रीपूर्व लढत होण्याचे म्हटले आहे तशी आमची सुद्धा तयारी आहे.
ऑन ठाकरे शिंदे शिवसेना एकत्र
भाजपला रोखण्यासाठी सिंधुदुर्गातच काय तर महाराष्ट्रात देखील शिवसेनेकडून प्रयत्न होणार नाही. आम्ही भाजप सोबत मैत्रीचा हात कायमच पुढे केलेला आहे. आपल्याला युती करूनच पुढे जायचे आहे. सावंतवाडी मध्ये सुद्धा आम्ही युतीचा ऑप्शन ओपन ठेवला आहे. युती नाही झाली तर आम्ही लढणार नाही असं होणार नाही. चारही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे असतील आणि धनुष्यबाणावर आम्ही लढू. काल सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत आमची बैठक झाली यामध्ये आम्ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी ठरवली आहे. आम्ही देखील कधीपर्यंत वाट बघायची हा प्रश्न आहे. असं नाही की आमची ताकद नाही तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे 50% पेक्षा आमची ताकद जास्त आहे. तरीदेखील आम्ही सांगतो आहे की आम्हाला संयमाने घ्यायचा आहे. युती करून लढायचे आहे त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली आहे. तशी आम्ही सुद्धा केली आहे मैत्रीपूर्ण लढत झाली तर मैत्रीपूर्ण लढू अन्यथा स्वतंत्र लढू
ऑन मुख्यमंत्री भेट
मी आणि दीपक केसरकर यांनी युती संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांनी कुठेही नकारात्मक भूमिका दाखवली नाही. चव्हाण साहेबांनी सुद्धा युती होण्यासाठी प्रयत्न केला मात्र पालकमंत्री यांचा निर्णय असेल मैत्रीपूर्ण लढायचा त्याचा निर्णय भाजप घेईल आमचा निर्णय आम्ही घेऊ.
ऑन नितेश राणे यांनी बोलताना भान ठेवावं
सिंधुदुर्गाचा इतिहास बघितला तर दीपक भाई किती संयमी आहेत हे सर्वांना माहीत आहे. दीपक भाईनी अनेक वेळा कटूता बाजूला ठेवून राजकारणामध्ये संयमाची भूमिका घेतली आहे आणि अशी व्यक्ती जेव्हा दुखावली जाते त्याच्यामध्ये कुठेतरी तथ्य असू शकतं.
ऑन युती संदर्भात माशी शिंकली
काल माशी कुठे शिंकली ती दीपक भाई नी क्लियर केलं. ज्येष्ठ असणाऱ्या दीपक भाईंच्या व्यक्तिमत्त्वाची कोणी अवहेलना करू नये आणि एवढे आम्ही स्वस्त पण नाही आहोत. दीपक भाई आणि निलेश राणे जो निर्णय जिल्ह्यामध्ये घेतील तो मला संपर्क मंत्री म्हणून मान्य असेल आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही ताकदीने काम करू.
ऑन शिंदे शिवसेनेची भूमिका लवचिक का
आम्ही लोकसभेमध्ये एकत्र आहोत विधानसभेमध्ये एकत्र आहोत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढायचं आणि स्वतः आमदार खासदार होण्यासाठी हा कटूता जी आहे ती भविष्यात आमदारकीला आणि खासदारकीला अशीच राहू शकते म्हणून आमची लवचिक भूमिका नाही नरमाईची भूमिका आहे आणि संयमी आहे. याचा अर्थ आम्ही आम्ही हतबल नाही आहोत आम्ही संयमाने युती करा असं सांगतो आहे. आमच्या भांडणांमध्ये आमचा विरोधक आहे त्याचा कुठे अस्तित्व नाही त्याला परत नवी संजीवनी मिळू नये अशी आमची भूमिका आहे ही नरमाईची नाही तर नम्रतेची भूमिका आहे.
ऑन शहर विकास आघाडीला पाठिंबा
ही शहर विकास आघाडी कोणत्याही पक्षाची नाही सर्व पक्षीयांची होते आहे. असं मी ऐकलं आहे त्यात शिवसेना म्हणून आमचा काही संबंध नाही कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे तिथे शिवसेना पुढाकार घेते आहे आणि युबीटी सोबत जात आहे अशी शक्यता नाही. युбиटी सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र शहर विकास आघाडी कुठल्या पक्षाची नाही. सर्वपक्षीय तिथे निर्णय होत आहे तिथे काय निर्णय होत आहे ते आपण बघूया. निकालानंतर दिसेल शिवसेनेचे अस्तित्व किती बीजेपीचा अस्तित्व किती आहे आणि बाकीच्यांचं किती आहे. कणकवलीच्या त्या सर्व घडामोडींमध्ये संपर्क मंत्री म्हणून माझा काही संबंध नाही एकनाथ शिंदे आणि दीपक भाई यांचा सुद्धा संबंध नाही. इथे स्थानिक लेवलला अशा घडामोडी घडत असतील आमच्या नावाचा उपयोग करत असतील तर आपण कोणाचा तोंड धरू शकतो? नावाचा उपयोग होत असेल तर माझा काहीही पर्याय नाही
ऑन बाळा माने आरोप
कोणाचा प्रश्न विचारताय चार वेळा लोकांनी त्यांना डांबर फासलय. त्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही 2004 आणि 2009 ला त्यांची हीच टेप होती त्यांनी 25 वर्ष हीच टेप वाजवली आहे. उदय सामंत काय आहे हे लोकांना माहित आहे. हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे. त्यामुळे असूया कोणाबद्दल असू नये. त्यांची मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी देखील मोठं व्हावं कदाचित त्याने एमआयडीसीला फसवून कुठे प्लांट लावले असतील तरी मोठ व्हावं मी तिकडे लक्ष देणार नाही. माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केली आहे तरी मी लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्याला किती किंमत द्यायची आणि त्यांना किती मोठं करावं त्यामुळे त्यांना लोक किती किंमत देतात हे निवडणुकीत दिसतय.
ऑन प्रताप सरनाईक
वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईक यांच्यावर काय आरोप केले मला खरोखरच माहित नाही. त्याची मी माहिती घेतो अभ्यास करतो आणि तुमच्याशी बोलतो
ऑन पार्थ पवार यांच्यावर उद्योग खात मेहरबान
फेक नरेटिवला बळी पडण्याचा हा प्रकार आहे. पत्रकारांनी देखील थोडाफार प्रत्येक विभागाचा अभ्यास केला पाहीजे. माझ्या विभागाने 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी 500 रुपये केली हे ऐकून मलाही धक्का बसला. माझ्या सही शिवाय कसं झालं? माझ्या दुसऱ्या दिवशी लक्षात आलं तहसीलदाराने केलेलं हे काम होतं महसूल विभागाचा हा विषय होता उदय सामंत यांचं नाव घेतल्यानंतर काही लोकांना मोठं होता येतं म्हणून कदाचित माझं नाव घेतलं असेल माझ्या खात्याचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही फक्त आयटी पार्क करणार असाल आमच्याकडे इन्सेंटिव्ह मागणार असाल तर त्याला हे हे कागदपत्र लागतात तरच आम्ही तुम्हाला परवानगी देऊ याच्या पलीकडे आमचा काहीही संबंध नाही
ऑन अजित पवार राजीनामा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा राजीनामा मागणं म्हणजे त्यांच्या राजकीय अस्तित्वाला लोक घाबरतात हे सिद्ध झालंय
ऑन पार्थ पवार गुन्हा दाखल का नाही
एग्रीमेंट झालं होतं ते पुराव्यानिशी महाव्यवस्थापकाने दाखवला आहे. त्यामध्ये पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाही पाटील नावाची व्यक्ती आहे त्याचंच नाव होतं
ऑन आडाळी एम आय डी सी
जागेचे दर कमी करून सुद्धा अडाळीची जमीन विकली जात नव्हती म्हणून गोल्फ कोर्स चा विषय आम्ही करणार होतो मात्र सरपंचांशी आणि दीपक केसरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दिली आहे
ऑन नारायण राणे भेट घेणार
कोकणच्या जडणघडणीत नारायण राणेंचा सिहांचा वाटा आहे त्याच्यां सल्ल्याने निर्णय घेतले जातील. आज जर त्यांनी वेळ असेल तर त्यांची भेट घेणार
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:37:160
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 09:37:000
Report
SKShubham Koli
FollowNov 08, 2025 09:35:210
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 09:33:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:33:300
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 08, 2025 09:25:510
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 08, 2025 09:25:290
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 09:04:550
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 08, 2025 09:03:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 08:52:112
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 08:51:501
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 08:32:463
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 08:16:144
Report
SNSWATI NAIK
FollowNov 08, 2025 08:15:371
Report