Back
मालवण में नोटों की बैग मिलने से भाजपा-शिवसेना में घमासान
UPUmesh Parab
Nov 27, 2025 06:22:52
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात भाजपा आणि शिवसेनेत घमासान...
मालवण मध्ये धन शक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार निवडणूक ???
निलेश राणेनी केलेले आरोप सत्य कि असत्य
मालवणमध्ये सापडलेल्या रकमेत रवींद्र चव्हानाचा हात ???
अँकर ---- निवडणूक काळात पैसे वाटपाचे आरोप प्रत्यारोप आपण नेहमीच ऐकतो... ही निवडणूक जन शक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार असे टोले देखील आपण ऐकतो.. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये भाजप पक्षाच्या घरात पैशाची बॅग सापडल्याने खळबळ उडालीय.. आणि ही खळबळ उडवून दिलीय भाजपाच्या मित्र पक्षानेच...
राज्यात सद्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यात सत्तेत एकत्र असणारे भाजपा आणि शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमने सामने लढत आहेत. मैत्री पूर्ण लढत लढत होईल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र मैत्रीपूर्ण लढत न होता दोन्ही पक्ष थेट समोरा समोर आलेत. सर्वात लक्षवेधी निवडणूक ठरतेय ती मालवण नगरपालिकेची निवडणूक.. याच ठिकाणावरून भाजपा आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जातंप्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला होता. तर त्याच वेळी निलेश राणेनी आपल्याला ऑफर दिल्याचा गौप्यस्फ़ोट खोत यांनी केला होता..
Byte --- निलेश राणे / शिल्पा खोत ( रेकॉर्डिंग )
हे प्रकरण शांत होते न होते तोच आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धडक देऊन सर्वांनाच धक्का दिला.. सोशल मीडियाच्या माध्यमातून live करत भाजपा पैसे वाटण्याच्या तयारीत असल्याचा थेट आरोप निलेश राणेनी केला... आणि ह्यात रवींद्र चव्हाण यांच्यावर बोट ठेवलं
Byte ---- निलेश राणे
या प्रकारानंतर भाजपाने हे पैसे केनवडेकर यांच्या व्यवसायातील असल्याचे सांगत हा रडीचा डाव असून भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा प्रत्यारोप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय..
Byte --- प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष भाजपा
निलेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश रानेंच्या पायाखालची वाळू सरकल्याचे सांगत निलेश राणेंचा समाचार घेतला
byte ---- रवींद्र चव्हाण
या सगळ्या प्रकारात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झालेले होते असा आरोप केला.. आणि ज्यांच्या घरात पैसे सापडले ते निलेश रानेचे प्रचार प्रमुख होते असे सांगून आपल्या पराभवाचा वाचपा काढला..
Byte --- वैभव नाईक, माजी आमदार
end -- राज्यात मित्र असणारे दोन्ही राजकीय पक्ष आता वैरी होताना दिसत आहेत... निलेश राणे यांनी सगळा प्रकार live करत भाजपाला दुखवलंय... भाजपा नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय मात्र खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिले असून खरच ती रक्कम व्यवसायाची होती का ??? कि ती रक्कम निवडणुकीत मत खरेदी करण्यासाठी होती ?? हया सगळ्या प्रकारात रवींद्र चव्हानाचा हात आहे का ?? हे लवकरच स्पष्ट होईल
उमेश परब, सिंधुदुर्ग
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 27, 2025 06:52:200
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 06:51:490
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:420
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 27, 2025 06:46:220
Report
JMJAVED MULANI
FollowNov 27, 2025 06:46:040
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 06:40:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 06:36:0340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 06:34:2094
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 27, 2025 06:18:0965
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 06:03:58109
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 06:03:33167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 27, 2025 05:16:38197
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 27, 2025 04:51:53149
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 04:34:50182
Report