Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001
दानवे से लेकर शिंदे-पवार तक: महाराष्ट्र में राजनीतिक घमासान तेज
VKVISHAL KAROLE
Nov 27, 2025 06:18:09
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
الأراضي: अंबाडास दानवे ऑन समाज कल्याण विभाग वसतिगृह सामाजिक न्याय विभागाला सामाजिक अन्याय विभाग नाव दिले पाहिजे... शिरसाट यांनी भेट दिल्यानंतर आणखी दयनीय परिस्थिती झाली आहे,विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली, मंत्री बोलघेवडे आहे, मंत्री आदेश देऊन अधिकारी विचारात नाही... शशिकांत शिंदे शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र वक्तव्य मला जास्त काही माहीत नाही, पवार साहेब स्पष्ट म्हणाले आहेत की भाजपसोडून कुठल्याही पक्षात जा, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तर मी काही सांगू शकत नाही. आत्ताच्या घडीला भाजप शिंदे एक आहे, भविष्यात काय होईल माहीत नाही मालवण राणे पैसे प्रकरण नितेश राणे मालवण मध्ये गेले, त्यांनी आता नितेश राणे यांना जाब विचारला पाहिजे, एकमेकांची बदनामी करण्यासाठी दोन्ही राणे भाऊ निघाले, त्यामुळे नारायण राणे यांच्यासमोर हे आव्हान असणार आहे... लाडकी बहीण श्रेयवाद सरकार आले लाडकी बहीण मुळे आले असे म्हणणे अयोग्य नाही, ज्याने अंमलबजावणी केली त्याला श्रेय मिळत असते... पंकजा मुंडे यांची योजना असेल... ऑन दादा भुसे भाजपमध्ये गेलेच तर मुख्यमंत्री होतील, कुबड्या शिवाय उभं राहावे लागतील, 2029 मध्ये एकत्र राहणार नाही, भुसे स्वप्नं पाहत आहे ऑन बिबट्या बिबट्या सोडण्यासाठी वन विभाग आहे, वनं आहे.... बिबट्यासाठी मोठ्या प्रमाणात अभयारण्य आहेत... ऑन दानवे काँग्रेस ट्विट उठसूट गद्दार लोक आमच्यावर आरोप करतात, काँग्रेस सोबत गेलो म्हणून सत्ता सोडली म्हणतात, पण त्याच्या पक्षातील बांडगुळ काय करतात पहा ऑन बीड मारहाण असा कुणाला मारहाण करणे ,आणि तक्रार केली म्हणून मारहाण करणे योग्य नाही, सत्ताधारी पक्षाचे असले तरीही... सामान्य माणूस असला तरीही त्याचा संरक्षण करणे पोलीस आणि सरकारची जबाबदारी ऑन बंगला शिरसाट प्रशासनाची प्रक्रिया आहे, मी सोडला आहे... विरोधीपक्ष नेत्याला मिळायला पाहिजे होता, पण आता शिरसाट यांना मिळाला आहे, बंगला मी सोडला आहे... ऑन भाजप केंद्रीय नेते सल्ला भाजप असा सल्ला देणार नाही. शिंदे गटाच्या लोकांना भाजप ओढत आहे. सोयीच्या गोष्टी आहे, जिथे गरज असेल तर वापरा असे दिसते शिरसाट जंजाळ वाद त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ,मी काही बोलणार नाही.. दमानिया राजीनामा मागणी मला असे वाटते दमानिया जास्त अपेक्षा भाजप आणि शहा यांच्याकडे ठेवत आहे. फडणवीस अजित पवार चक्की पासिंग पिसींग म्हणाले होते आता किसिंग केली आहे, अजित पवार राजीनामा मागणी योग्य आहे....
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 27, 2025 06:40:53
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत राय टाऊन सोसायटीमध्ये डीजे च्या आवाजावरून दोन गटात लाथा बुक्क्यांनी हाणामाण झाली, याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी दोन्ही गटांविरोधात एनसी दाखल केली. पोलीस शिपाई वृषभ भातुकुलकर आणि डिगडोह नगर परिषदेतील भाजप उमेदवार अनिल शर्मा हे वाद झालेल्यांचे नाव आहेत. ऋषभ भातकुलकर यांना मारहाणीची ही घटना व्हायरल झाली. वृषभ भातकुलकर राय टाऊन सोसायटीमध्ये राहतात आणि नागपूर शहर पोलीस दलात शिपाई पदावर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस कार्यक्रम होता; त्यांनी डीजे साउंड सिस्टем लावली होती. त्या दिवशी रात्री दहा वाजताच्या सुमारास अभय दास या गाळेधारक सोसायटीचे सचिव तिथे गेले आणि वृषभला डीजे चा आवाज कमी करून बंद करण्यास सांगितले. त्या दिवशी वृषभने साउंड सिस्टेम बंद केली. सोमवारी या सोसायटीमध्ये मुलीच्या लग्नाअगोदर मेहंदीचा कार्यक्रम होता; तिथे सुद्धा डीजे साउंड लावण्यात आला होता. आवाज जोरात येत असल्याने वृषभने सचिव अभय दास यांना आज रात्री दहा वाजता डीजे चा आवाज बंद करण्यासाठी फोन केला. फोनवरच दोन्हांची बाचाबाची झाली. त्यानंतर तिथे सोसायटीचे अध्यक्ष अनिल शर्माही आले. वृषभ सुद्धा पोहचला; त्याच्यात पुन्हा वाद होऊन लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. या व्हिडिओत वृषभ यांना मारहाण होत असल्याचं दृश्य आहे. शेवटी हा विषय एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेला; तिथे वृषभ भातकुलकर आणि अनिल शर्मा या दोघांनी एकमेकविरोधात दिलेल्या तक्रारी नोंदवल्या.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 27, 2025 06:36:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:साखर कारखान्याविरुद्ध शेतकरी स्वाभिमानी संघटना, शेतकऱ्यांचे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांचा सहभाग पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या उसाला इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर जाहीर करावा, कथित बिल लवकरात लवकर जमा करावे, या मागणीसाठी साखर कारखान्याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुळमेश्वर गूळ कारखाण्यावर आंदोलन सुरू केले आहे. ऊस उत्पादकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे पुकारलेले आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी गुळमेश्वर गूळ कारखाना कारखाना बंद करून या ठिकाणी आंदोलन सुरू केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहे.
40
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 27, 2025 06:34:20
Parbhani, Maharashtra:स्टोरी - गुलाल कुणाचा अँकर - परभणीच्या पाथरी नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांच्या हातातील सत्ता खेचून आणण्यासाठी पाथरी येथील भाजपचे शिलेदार सरसावले होते, यावेळी तीन प्रमुख पक्षानी पथरीत तीन मुस्लिम उमेदवार दिल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊन हिंदू मतांच्या बळावर भाजपला गुलाल उधळता येईल असे स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटते, पण उमेदवारी अर्ज दाखल करे पर्यंत भाजपा जिल्हाध्यक्षांनी भाजपच्या इच्छूकांना ताटकळत ठेवत एबी फॉर्म दिलेच नसल्याने इच्छूकांनी दाखल केलेले अर्ज बाद झालेत. भाजपा जिल्हाध्यक्षानी तडजोड केल्याचा आरोप करीत भाजपच्या राज्य परिषदेवर असलेल्या प्रा. शिवराज नाईक यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला,पण नगरसेवक पदासाठी इच्छूक असलेल्या 17 इच्छूकांचे अर्ज एबी फॉर्म नसल्याने बाद झाले,यामुळे संतप्त झालेल्या भाजपा पदाधिकार्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी तडजोड केल्याचा आरोप करीत त्यांची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे करीत अपक्ष उमेदवार प्रा. शिवराज नाईक यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार सुरू केलाय.यामुळे भाजपमधील नवे जुने असा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. बाईट- पी डी पाटील- माजी जिल्हाध्यक्ष,भाजप बाईट- संतराम दहे- भाजप शहराध्यक्ष,पाथरी व्हीओ- भाजप मध्ये वाद निर्माण झाले असले तरी शिवसेना शिंदे गट मात्र बाबाजाणी दुर्राणी यांच्याकडील सत्तेला सुरुंग लावन्यासाठीच भाजप शिवसेना अशी पाथरी नगर परिषदेत युती झाल्याचा दावा करतेय... बाईट- सईद खान- जिल्हाध्यक्ष,शिवसेना शिंदे गट व्हीओ- भाजपच्या पाथरी येथील पदाधिकाऱ्यांना या युतीबद्दल काहीच माहिती नसल्याचे जरी पदाधिकारी सांगत असले तरी भाजपच्या जिल्हाध्यक्षाने हे सगळे आरोप फेटाळतं, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याच आदेशाने आम्ही सर्वांनी पाथरी नगर परिषद न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. बाईट- सुरेश भुमरे- जिल्हाध्यक्ष,भाजप,परभणी व्हीओ- भाजप पाथरीमध्ये एक ही जागा लढवीत नाहीये,ही अशी कशी युती आहे,असा सवाल पाथरी येथील भाजपचे संतप्त स्थानिक पदाधिकारी विचारीत आहेत,शिवाय भाजपच्या पक्ष निरीक्षकाने या घटना क्रमाचा अहवाल पक्षाकडे पाठवल्याची माहिती आहे,त्यामुळे भाजप मधील निष्ठावंत विरुद्ध उपरे हा वाद कुठे जाऊन पोहोचतो हे बघणे या निवडणुकीच्या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे... गजानन देशमुख,झी मीडिया परभणी
94
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 27, 2025 06:22:52
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात भाजपा आणि शिवसेनेत घमासान... मालवण मध्ये धन शक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार निवडणूक ??? निलेश राणेनी केलेले आरोप सत्य कि असत्य मालवणमध्ये सापडलेल्या रकमेत रवींद्र चव्हानाचा हात ??? अँकर ---- निवडणूक काळात पैसे वाटपाचे आरोप प्रत्यारोप आपण नेहमीच ऐकतो... ही निवडणूक जन शक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार असे टोले देखील आपण ऐकतो.. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये भाजप पक्षाच्या घरात पैशाची बॅग सापडल्याने खळबळ उडालीय.. आणि ही खळबळ उडवून दिलीय भाजपाच्या मित्र पक्षानेच... राज्यात सद्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. राज्यात सत्तेत एकत्र असणारे भाजपा आणि शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमने सामने लढत आहेत. मैत्री पूर्ण लढत लढत होईल असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र मैत्रीपूर्ण लढत न होता दोन्ही पक्ष थेट समोरा समोर आलेत. सर्वात लक्षवेधी निवडणूक ठरतेय ती मालवण नगरपालिकेची निवडणूक.. याच ठिकाणावरून भाजपा आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय. भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जातंप्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला होता. तर त्याच वेळी निलेश राणेनी आपल्याला ऑफर दिल्याचा गौप्यस्फ़ोट खोत यांनी केला होता.. Byte --- निलेश राणे / शिल्पा खोत ( रेकॉर्डिंग ) हे प्रकरण शांत होते न होते तोच आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धडक देऊन सर्वांनाच धक्का दिला.. सोशल मीडियाच्या माध्यमातून live करत भाजपा पैसे वाटण्याच्या तयारीत असल्याचा थेट आरोप निलेश राणेनी केला... आणि ह्यात रवींद्र चव्हाण यांच्यावर बोट ठेवलं Byte ---- निलेश राणे या प्रकारानंतर भाजपाने हे पैसे केनवडेकर यांच्या व्यवसायातील असल्याचे सांगत हा रडीचा डाव असून भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा प्रत्यारोप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय.. Byte --- प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष भाजपा निलेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निलेश रानेंच्या पायाखालची वाळू सरकल्याचे सांगत निलेश राणेंचा समाचार घेतला byte ---- रवींद्र चव्हाण या सगळ्या प्रकारात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उडी घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झालेले होते असा आरोप केला.. आणि ज्यांच्या घरात पैसे सापडले ते निलेश रानेचे प्रचार प्रमुख होते असे सांगून आपल्या पराभवाचा वाचपा काढला.. Byte --- वैभव नाईक, माजी आमदार end -- राज्यात मित्र असणारे दोन्ही राजकीय पक्ष आता वैरी होताना दिसत आहेत... निलेश राणे यांनी सगळा प्रकार live करत भाजपाला दुखवलंय... भाजपा नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देऊन आपली भूमिका स्पष्ट केलीय मात्र खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिले असून खरच ती रक्कम व्यवसायाची होती का ??? कि ती रक्कम निवडणुकीत मत खरेदी करण्यासाठी होती ?? हया सगळ्या प्रकारात रवींद्र चव्हानाचा हात आहे का ?? हे लवकरच स्पष्ट होईल उमेश परब, सिंधुदुर्ग
20
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 27, 2025 06:03:58
Ambernath, Maharashtra:बदलापूर ते कर्जत तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गासाठी 1324 कोटींचा निधी मंजूर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती बदलापूर कर्जतकर प्रवाशांचा प्रवास सुकर होणार बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जत या भागातून लाखो प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करत असतात. अपुऱ्या लोकलमुळे प्रवासी वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून रेल्वे मंत्रालयाने बदलापूर ते कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गीकेसाठी 1324 कोटींचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे, यामुळे लोकलच्या संख्येत वाढ होऊन प्रवासी वाहतुकीवरचा ताण कमी होईल असा विश्वास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केलाय.
101
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 27, 2025 06:03:33
165
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 27, 2025 05:16:38
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद शहराने राज्याला स्वर्गीय वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिलेत. पुसद मध्ये नाईकांची सत्ता असे समीकरण राहिलेले आहे. परंतु गेल्या काही वर्षात कुटुंबीयातच फूट पडली. आणि नाईक विरुद्ध नाईक असा संघर्ष सुरू झाला. या नगरपरिषद निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहीनी नाईक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी इंद्रनील यांचे सख्खे व चुलत बंधु मैदानात उतरले आहे. त्यांच्या नेतृत्वात मित्रपक्ष भाजपाने निखिल चिद्दरवार यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीनेही आपापला उमेदवार रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक रंगतदार केली आहे. VO 1 : राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांची राजकीय सुरुवात यवतमाळच्या पुसद नगरपालिकेतून झाली. 1946 ला ते पुसद चे नगराध्यक्ष होते. तेव्हापासून नाईक बंगल्यातून दिलेला उमेदवारचं पुसदचा नगराध्यक्ष होत आला आहे. यापूर्वी माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक ह्या जनतेतून नगराध्यक्ष निवडून आल्या. तर आता त्यांची सुन आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पदर खोचला आहे. दारोदारी जाऊन त्या मतदारांच्या भेटी घेत आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला असला तरी नाईकांची सून असणं हे माझं भाग्य आहे, मीच योग्य आणि सक्षम उमेदवार आहे, कोणत्या नाईकाने कामं केली हे लोकांना माहिती आहे. असं सांगत त्या विकासाची ब्लू प्रिंट मतदारांपुढे ठेवत आहे. बाईट : मोहिनी नाईक : उमेदवार राकॉ अजित पवार VO 2 : माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे बंधू निलय नाईक यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काका आणि भावाच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुतीत त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर देखील घेतले. निलय नाईक भाजपचा झेंडा घेऊन पुन्हा भावसुनेच्या विरोधात प्रचार करीत आहेत. यावेळी इंद्रनील नाईक यांचे सख्खे भाऊ ययाती यांनी देखील भाजपावासी होऊन कुटुंबातील सदस्याविरोधात दंड थोपटले आहे. पुसद मध्ये शून्य विकास कामे झाली असून, निधीमध्ये देखील प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार निलय नाईक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनी केला आहे. तर एकाच घराण्यात दिलेल्या सत्तेमुळे पुसदचे वाटोळे झाले आहे, अनेक समस्यांनी जनता त्रस्त असून, पुसदसाठीचा विकास निधी जनतेसाठी नसून स्वतःसाठी हवा असल्याचं आरोप महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार मोहम्मद नदीम यांनी केला आहे. बाईट : निलय नाईक : माजी आमदार निखिल चिद्दरवार : भाजप उमेदवार मोहम्मद नदीम : काँग्रेस उमेदवार VO 3 : प्रत्येक वेळी पुसद ची प्रत्येक निवडणूक ही लक्षवेधी ठरते, मोठा गाजावाजा होतो मात्र विकासाच्या बाबतीत पुसदची अवस्था दयनीय झाली आहे. यंदाही कुटुंबातल्या या राजकीय लढाईत कोण बाजी मारतो आणि खरोखरच विकासाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात साकार होते का याकडे पुसदवासियांचे लक्ष लागले आहे.
197
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 27, 2025 04:51:53
Satara, Maharashtra:सातारा - भारतीय जनता पक्षाबरोबर महायुती करण्याचा प्रयत्न आम्ही केला होता. पण तसा प्रतिसाद भाजपकडून आला नाही त्यामुळे थोडा उशीर झाला. याचा आम्ही अनुभव घेऊन या पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीला शिवसेना पूर्ण ताकतीने निवडणुका लढवण्यासाठी ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. सातारा नगरपालिकेत महायुती होईल म्हणून आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला नव्हता. मात्र आम्ही आता ठरवलं आहे आमचे शिवसेनेचे उमेदवार सातारा नगरपालिकेसाठी उभे आहेत.. मात्र आम्हाला शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांनी नगराध्यक्ष पदाचे मतदान कोणाला करावे याचा निर्णय दोन दिवसात वरिष्ठांची चर्चा करून आम्ही घेऊ असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला दिला आहे.
149
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 04:34:50
182
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 27, 2025 04:32:26
Bhandara, Maharashtra:परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ.... मित्र पक्षावर परिणय फुके करता आरोप.... नरेंद्र भोंडेकर यांची टीका.... भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस वर टीका करत नाही. भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण कामे करत असताना टप्पा टप्प्याची पैसे येतात. भ्रष्टाचार कसा झाला. तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली आल्याच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे.. एकीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित दादा, शिंदे साहेब टीका करत नाही पण या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली जाते....
178
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 27, 2025 04:30:11
Nashik, Maharashtra:अँकर आजपर्यंत सासू सासऱ्यांच्या टोमण्यांनी सुनेने मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रकार आपण नेहमीच ऐकतो मात्र खुद्द आईवडिलांच्या टोमण्यांनी व्यथित होऊन दोन मुलांसह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय. चांदवड तालुक्यातील काजी सांगवी दिग्वद परिसरात हा प्रकार घडलाये. लग्न झाल्यापासून त्यांच्या आई आणि वडील सातत्याने दौलत हिरे यांची घरात अवहेलना करत असत. बायकोचा बैल, माजला आहे, बायको आल्यापासून ऐकत नाही असे टोमणे मारत त्याला घरात येणे मुश्किल करून ठेवले होते. एका बाजूला ग्रामपंचायतीतील कामाचा ताण आणि घरी टोमणे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या यांनी आपल्या दोन मुलांसह प्रज्ञा दौलत हिरे व प्रांजल दौलत हिरे यांच्यासह विहिरीमध्ये उडी घेत आपले जीवन संपवले आहे या मृतांचे मृतदेह विहिरी मधून काढून चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यांची पत्नी सोनाली हिरे हीने सासू मीना हिरे आणि सासरे रामभाऊ हिरे यांच्याविरोधात चांदवड पोलीसात तक्रार दाखल केलीय. टोमण्यातून कौटुंबीक वाद आणि त्यातून झालेली आत्महत्या हा सर्वत्र चर्चाचा विषय ठरला आहे. पोलिस याबाबत अधिक तपास करत असून पत्नीची भूमिका सुद्धा तपासली जात आहे.
160
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 27, 2025 04:18:00
113
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 04:17:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील बार्शीमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू - सोलापुरातील बार्शीमध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू - बार्शी तालुक्यातील शेळगावातील दुर्दैवी घटना - शिवराज शेरखाने असे मृत 4 वर्षीय चिमुकल्याचे नाव - विहिरीतून मोटार काढण्याचे काम सुरु असताना घडली घटना - यावेळी शिवराज खेळता खेळता ट्रॅक्टर मध्ये चढला आणि त्याने चुकून गिअर टाकल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला - शिवराजचे वडील संदिप यांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले - उडी मारून घटनेची माहिती मिळताच गावातील युवकांनी विहिरीत उड्या मारून शिवराजला शोधण्याचा प्रयत्न केला - दरम्यान अग्निशमन दल स्थानिक पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेत शिवराजचा शोध घेण्याचा प्रयत्न केला - मात्र विहिरीत असलेल्या काळामध्ये ट्रॅक्टर अडकल्याने शिवराजला शोधण्यात तब्बल 12 तास गेले - अखेर विहिरीतील सर्व पाणी बाहेर काढल्यानंतर शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला
110
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 27, 2025 04:16:35
Pandharpur, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावलेल्या आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिंदे शिवसेना यांची कुर्डूवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूक पूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते. नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या आघाड्या झालेल्या आहेत. कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी चक्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कुर्डूवाडी येथे काल रात्री सभा घेतली कुर्डूवाडी मध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय कदाचित भविष्यातल्या राजकारणाची नांदी ठरू शकते असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे
145
comment0
Report
Advertisement
Back to top