Back
पुसद नगरपालिका चुनाव: एक ही परिवार के भीतर घमासान, विकास योजनाओं पर सवाल
SRSHRIKANT RAUT
Nov 27, 2025 05:16:38
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या पुसद शहराने राज्याला स्वर्गीय वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिलेत. पुसद मध्ये नाईकांची सत्ता असे समीकरण राहिलेले आहे. परंतु गेल्या काही वर्षात कुटुंबीयातच फूट पडली. आणि नाईक विरुद्ध नाईक असा संघर्ष सुरू झाला. या नगरपरिषद निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहीनी नाईक यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी इंद्रनील यांचे सख्खे व चुलत बंधु मैदानात उतरले आहे. त्यांच्या नेतृत्वात मित्रपक्ष भाजपाने निखिल चिद्दरवार यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीनेही आपापला उमेदवार रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक रंगतदार केली आहे.
VO 1 : राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांची राजकीय सुरुवात यवतमाळच्या पुसद नगरपालिकेतून झाली. 1946 ला ते पुसद चे नगराध्यक्ष होते. तेव्हापासून नाईक बंगल्यातून दिलेला उमेदवारचं पुसदचा नगराध्यक्ष होत आला आहे. यापूर्वी माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक ह्या जनतेतून नगराध्यक्ष निवडून आल्या. तर आता त्यांची सुन आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पदर खोचला आहे. दारोदारी जाऊन त्या मतदारांच्या भेटी घेत आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला असला तरी नाईकांची सून असणं हे माझं भाग्य आहे, मीच योग्य आणि सक्षम उमेदवार आहे, कोणत्या नाईकाने कामं केली हे लोकांना माहिती आहे. असं सांगत त्या विकासाची ब्लू प्रिंट मतदारांपुढे ठेवत आहे.
बाईट : मोहिनी नाईक : उमेदवार राकॉ अजित पवार
VO 2 : माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे बंधू निलय नाईक यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काका आणि भावाच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुतीत त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले. भाजपाने त्यांना विधान परिषदेवर देखील घेतले. निलय नाईक भाजपचा झेंडा घेऊन पुन्हा भावसुनेच्या विरोधात प्रचार करीत आहेत. यावेळी इंद्रनील नाईक यांचे सख्खे भाऊ ययाती यांनी देखील भाजपावासी होऊन कुटुंबातील सदस्याविरोधात दंड थोपटले आहे.
पुसद मध्ये शून्य विकास कामे झाली असून, निधीमध्ये देखील प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप
भाजपाचे माजी आमदार निलय नाईक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनी केला आहे. तर एकाच घराण्यात दिलेल्या सत्तेमुळे पुसदचे वाटोळे झाले आहे, अनेक समस्यांनी जनता त्रस्त असून, पुसदसाठीचा विकास निधी जनतेसाठी नसून स्वतःसाठी हवा असल्याचं आरोप महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार मोहम्मद नदीम यांनी केला आहे.
बाईट : निलय नाईक : माजी आमदार
निखिल चिद्दरवार : भाजप उमेदवार
मोहम्मद नदीम : काँग्रेस उमेदवार
VO 3 : प्रत्येक वेळी पुसद ची प्रत्येक निवडणूक ही लक्षवेधी ठरते, मोठा गाजावाजा होतो मात्र विकासाच्या बाबतीत पुसदची अवस्था दयनीय झाली आहे. यंदाही कुटुंबातल्या या राजकीय लढाईत कोण बाजी मारतो आणि खरोखरच विकासाची ब्लू प्रिंट प्रत्यक्षात साकार होते का याकडे पुसदवासियांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 27, 2025 06:03:580
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 27, 2025 06:03:330
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 27, 2025 04:51:53149
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 04:34:50182
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 27, 2025 04:32:26178
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 27, 2025 04:30:11160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 27, 2025 04:18:00113
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 04:17:34110
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 04:16:35145
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 27, 2025 04:06:00163
Report
AKAMAR KANE
FollowNov 27, 2025 03:45:17125
Report
KPKAILAS PURI
FollowNov 27, 2025 03:32:54127
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:32:29198
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 03:31:43150
Report