Back
सोलापुर महापालिका चुनाव: हवा किसकी, क्या बदलेगा शहर का भविष्य?
AAABHISHEK ADEPPA
Dec 19, 2025 09:19:35
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिका निवडणुकीत हवा कुणाची ? ( PKG )
अँकर :- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या हालचालींना वेग आलाय आणि त्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचं राजकारण निर्णायक वळणावर उभं आहे. एकीकडे गेल्या काही वर्षांत बदललेली सत्ता-समीकरण तर दुसरीकडे रोजच्या जगण्यात अडकलेले नागरिकांचे प्रश्न…विकास, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणी आणि प्रशासकीय राजवट…या सगळ्याच्या भोवती फिरणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेत हवा कुणाची ? पाहूया हा सविस्तर आढावा…
सोलापूर.. देश स्वतंत्र्य होण्यापूर्वी तीन दिवस स्वतंत्र्य उपभोगणारं हुतात्म्याचं शहर
राज्यात उद्योग नगरी म्हणून ओळख राहिलेले सोलापूर शहर
राज्याच्या राजकारणात एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद देणारं हेच सोलापूर
मात्र मागील काही वर्षात सोलापूरची ओळख बदललीय..
तीन दिवसातून एकदाच येणारं पाणी…
नोकरीसाठी शहर सोडणारा तरुण वर्ग…
खड्ड्यांतून वाट काढणारे रस्ते…
आणि गेली तीन वर्षे लोकनियुक्त प्रतिनिधी नसलेली महानगरपालिका…हे आहे आजचं सोलापूर.
या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेचं राजकारण तापू लागलंय. प्रश्न एकच आहे हवा कुणाची?
सोलापूर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. कापड गिरण्या बंद झाल्या, पण कामगारांचा संघर्ष कायम राहिला. आजही सोलापूर हे कामगार बहुल शहर आहे.सुमारे १२ लाख लोकसंख्या, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रचना असलेलं हे शहर दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानलं जातं. मात्र विकासाच्या या मार्गावर सोलापूर अजूनही पाणी, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांशी झुंज देतोय.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पाणी हीच सोलापूरची सर्वात मोठी समस्या आहे. अनेक भागांत आजही तीन दिवसातून एकदाच पाणी येतं. उद्योगधंद्यांचा अभाव आणि मर्यादित रोजगार संधींमुळे तरुण वर्ग मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत आहे. त्यामुळे सोलापूर हळूहळू वृद्धांचं शहर बनत चालल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
बाईट :
राज सलगर ( नागरिक ) ( निळा, पांढरा कलरफूल शर्ट )
हे प्रश्न सोडवणार कोण? हा सवाल आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
*सोलापूर महापालिका 2017 चे पक्षीय बलाबल*
सोलापूर महानगरपालिकेचं मागील निवडणुकीचं चित्र पाहिलं, तर २०१७ च्या निवडणुकीत एकूण १०२ जागांपैकी भाजपला ४९ जागा मिळाल्या होत्या.
शिवसेनेला २१, काँग्रेसला ११,
एमआयएमला ९, राष्ट्रवादीला ४,
बसपाला ४ तर माकपला १ जागा मिळाली होती.
या संख्याबळाच्या जोरावर भाजपने महापालिकेची सत्ता मिळवली. मात्र त्यानंतर सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय राजवटीत गेली
आणि आज तब्बल तीन वर्षांनंतर पुन्हा निवडणुकीची चर्चा रंगतेय...
Vo : गेल्या काही वर्षांत सोलापूरच्या राजकारणात मोठे बदल झालेत. एकेकाळी काँग्रेस–राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानलं जाणारं हे शहर
आता भाजपचा मजबूत गड बनल्याचं चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्या, मात्र लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शहरातील तिन्ही मतदारसंघ जिंकत वर्चस्व सिद्ध होत. या यशानंतर भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, नव्या चेहऱ्यांची पक्षाकडे गर्दी होत आहे.
भाजप स्वबळावर निवडणुक लढवेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
(( महाविकास आघाडीच्या बैठकीचे vis ))
दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याच्या तयारीत आहे. भाजपविरोधात एकत्र लढण्याची भूमिका जरी घेतली असली तरी महाविकास आघाडीतील पक्षाची अंतर्गत कुरघोडी थांबलेली नाही. त्यामुळे एकत्रित लढा किती प्रभावी ठरणार, हा प्रश्न सध्या उभा आहे.
बाईट :
अविनाश कुलकर्णी ( जेष्ठ पत्रकार ) ( निळा शर्ट, जेष्ठ नागरिक )
या महापालिका निवडणुकीत भाजपकडून विकासाचं चित्र मांडलं जात आहे. उजनी ते सोलापुर दुहेरी पाणी पाईपलाईन, ८९२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, सोलापूर - मुंबई, सोलापूर - गोवा सुरु करण्यात आलेली विमानसेवा, ५० एकरातील आयटी पार्क आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विमानसेवा भाजपकडून हे सल्लं भांडवल म्हणून पुढे केलं जात आहे. सोलापूर महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात या मांडला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आ.विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे हे भाजपाचे üç विद्यमान आमदारांनी महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी जोरदार ताकद लावली. तर नुकताच भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांना शहर आणि दक्षिण तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. याचा मोठा फायदा भाजपाला महापालिका निवडणुकीत होईल. तर दुसरीकडे काँग्रेस मात्र आम्ही स्वबळावर नाही तर महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार असून 60 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकून आणू असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडून आतापासूनच डोअर टू डोअर प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
बाईट : चेतन नरोटे, शहराध्यक्ष, काँग्रेस ( पिवळा पुढारी ड्रेस )
भाजपाने 75 पार जाणारा दिला असून त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने देखील अबकी बार 75 पार चा नारा देण्यात आलाय.. मुलाखती मध्ये भाजपाचे वर्चस्व असलं तरी सोलापूर महापालिकेसाठी बहुरंगी लढत होईल असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलाय....
बाईट -
किरण बनसोडे ( राजकीय विश्लेषक तथा जेष्ठ पत्रकार ) ( हाफ स्वेटर )
सोलापूर महापालिका निवडणूक साठी जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्साह असून आम्ही देखील भारावून गेलो आहोत. लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा भाजपाला मिळाली होती, विधानसभेत देखील शिंदे सेनेला कोणतीही जागा मिळाली नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आम्हालाच मतदान करणार असल्याचं सांगत असल्याची प्रतिक्रिया शिंदेसेना न व्यक्त केली आहे.
बाईट -
अमोल शिंदे ( जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट )
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत फक्त 76 उमेदवार इच्छुक म्हणून नोंदवले गेले आहेत. J्या जागा निवडून येतील त्याच जागा आम्ही लढवू असं देखील पक्षाच्यावतीने ठरवण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोरदार टीका करण्यात आली आहे.
बाईट -
प्रशांत बाबर ( युवक प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ) ( पिंक कलर शर्ट )
पीटीसी :-
मोठ्या प्रतीक्षा नंतर महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसलीय... त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार आहे....
अभिषेक आदेप्पा, सोलापूर प्रतिनिधी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:48:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 19, 2025 10:39:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 19, 2025 10:36:310
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:48:060
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 19, 2025 09:47:150
Report
AKAMAR KANE
FollowDec 19, 2025 09:46:490
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 19, 2025 09:46:400
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 09:21:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 19, 2025 09:05:390
Report
PNPratap Naik1
FollowDec 19, 2025 09:00:480
Report
ABATISH BHOIR
FollowDec 19, 2025 08:47:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 19, 2025 08:47:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 19, 2025 08:47:100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 19, 2025 08:35:010
Report