Back
इंदापुर में दत्तात्रय भरणे का प्रचार भाषण जारी, शहर के विकास के वादे
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:36
Baramati, Maharashtra
इंदापूरचा खडकपुरा येथून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात
इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर खडकपुरा प्रचार सभा
ही निवडणूक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे
2014 साली तुम्ही मला आमदार केले
गेली 11 वर्ष या इंदापूर शहरात विकासाचा निधी कसा जास्त आणता येईल यासाठी मी प्रयत्न केला.
येणाऱ्या माणसाची कामे हेलपाटे न मारता मार्गी लावली.
2014 पूर्वी इंदापूर शहर काय होतं आज ते बदलले की नाही जर इंदापूर शहर बदलले असले तरच तुम्ही घड्याळाला मतदान करा
भविष्यात खूप काही इंदापूर मध्ये करायचं आहे.
कोरोना काळात कशी मदत करता येईल यासाठी मी आणि नगराध्यक्ष अंकिता शहा आम्ही प्रामाणिकपणे केला.
भविष्यात बारामती शहरात ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक केबल टाकली आहे त्याप्रमाणे इंदापूर शहरात टाकली जाईल हा शब्द देतो
इथे सर्व व्यापारी पेठ आहे पाठीमागे अजितदादा एका उद्घाटनासाठी इथे आले होते त्यावेळी व्यापारी वर्गाने अजित दादांना शिरसोडीचा पूल मंजूर करावा अशी मागणी केली. या गणपतीची शपथ घेऊन सांगतो रात्रीच ऑफिस उघडून तुमच्या पुलाचा प्रस्ताव तयार करून वातावरणात मुंबईला नेऊन मंजूर करणार आहात तुमचा आमदार आहे. यात जर माझं काही खोट असेल तर हा गणपती मला शिक्षा करेल
इथली बाजारपेठ वाढणार आहे.पाच पटीने. व्यवसाय पाच पटीने वाढणार आहे.
इंदापूरचा चेहरा मोहरा एका शिरसोडीच्या पुलामुळे बदलणार आहे
शिरसोडीचा पूल होणार नाही असे म्हणणारे इथले कोण नेते आहेत ते तुमच्यासमोर आहेत, पूलाच्या कामाला कोण आडवे आले होते तो पूल होणार नाही अस कोण म्हटलं होतं हे आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या. लाडक्या बहिणींनी जर डोक्यात घेतलं चांगल्या चांगल्यांचं काम होतं
इंदापूरच्या बाह्य वळणावर मालोजीराजेंचे जे शिल्प होते त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याची तूट फूट झाली आपण नव्याने शिल्प करणार आहोत.
व्यापारी बांधवांना मनापासून विनंती करायची आहे तुम्ही सर्व व्यापारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात असे समजून काम करायचं. एका पुलाच्या निर्णयामुळे इंदापूर बदलणार आहे
व्यापारी संकुलासाठी आपण 10 ते 12 कोटी रूपये आपण मंजूर केले आहेत.
मला कोणावर टीका करायची नाही टीका करून कोणाला मत मागायचं नाही, मी आणि अंकिता शहा यांनी इंदापूर शहराज्य विकासाचे काम केले आहे त्या जोरावर तुम्हाला मत मागत आहे
पूर्वी इंदापूर शहर काय होतं आता काय बदललं याचा तुम्ही विचार करा मी निवडणुकीपुरता बोलत नाही. मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे.
वीरश्री मालोजीरாஜे भोसले यांच्या गढीचे काम आपण हाती घेतल आहे,ते लवकरच पूर्ण होईल.
हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत.
आज सकाळी मला खासदार रामदास आठवले यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शविलेला आहे
या शहराने मला 2009 पासून 2024 पर्यंत मतदान रुपी मला जे आघाडी दिली मी आयुष्यभर विसरू शकत नाही
शहरात एक स्वतंत्र एसी हॉल करायचा आहे तो प्रस्ताव दिला आहे.
शहरात अनेक शासकीय विभागाच्या नवीन इमारती पूर्ण केल्या आहे.
महिला बचत गटाची एका स्वतंत्र इमारत माझ्या लाडक्या बहिणींसाठी केली जाईल हा शब्द लाडक्या बहिणींना देतो
उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी 56 कोटी रूपयाचे क्रीडा संकुल मंजूर केले आहेत.
मला विरोधकांवर टीका करायची नाही, ही सर्व मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे एकत्र आले आहेत वेगवेगळे सांगण्याची गरज नाही
आज तारिक 23 आहे मागच्या वर्षीची 23 तारीख तुम्हाला आठवते का ? 23 तारखेला खडकपुरा परिसरात सर्व गुलालाने भरलेला होता. आज बरोबर एक वर्ष झाल. मुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती. 23 तारखेला आपला विजय झाला होता. तोच गुलाल तीन डिसेंबरला खडकपूडा येथे असाच पडला पाहिजे
आम्ही फुकट घेणारे नाही,आम्ही वर्गणी मागणारे नाही आणि दोघे दादागिरी करणारे नाही ( दत्तात्रय भरणे यांचा विरोधकांना टोला)
शहा कुटुंबीयांनी इंदापूर शहराला दिलेल्या योगदानाची उतराई करण्याची वेळ आली आहे.
इंडापूरकर खूप भाग्यवान आहात भरत शेठ सारखा उमेदवार तुम्हाला उमेदवार मिळाला आहे, जो 5 वर्षे तुमची निस्वार्थपणे सेवा करेल मदत करेल
स्वर्गीय शंकररावजी पाटील यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही कारण त्यांनी कधी खोटी आश्वासन या तालुक्याला दिली नाहीत
निवडणुकीच्या काळात दोन समाजात धर्मात भांडणे लावायची काही लोकांची सवय असते
हे इंदापूर शहर आपल्याला भयमुक्त करायचे आहे.
इंदापूर शहरातील जनता मतदार खूप हुशार आहे त्याला खूप कळत,उद्या आपल्याला कोण मदत करेल,कोण आपल्याला विकासाचा निधी देईल.
207
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 17:46:09149
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 17:16:59175
Report
PNPratap Naik1
FollowNov 23, 2025 16:15:11280
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:48:56173
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:32:3293
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 15:31:02138
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 13:16:48153
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 13:04:23102
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 13:03:52145
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 13:00:55200
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 12:49:19173
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:4787
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:21:18100
Report