Back
इंदापुर के कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे ने विकास निधि व पुल-मार्गो की परियोजनाओं का किया दावा
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:09
Baramati, Maharashtra
इंदापुरातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉईंट अकलूज नाका प्रचार सभा सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान काय करायचं पूर्वीच इंदापूर आणि आजच इंदापूर यामध्ये बदल झाला की नाही ही एकदा तपासून पहा. पूर्वी इंदापूर काय होतं आणि आता इंदापूर काय आहे, आपल्या भागात पूर्वी रस्ते कसे होते काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माजी नगराध्यक्ष अंकिता शहा आणि मी स्वतः एक तालुक्याचा आमदार एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही दोघांनी पण एकमेकांच्या हातामध्ये हात घालून या इंदापूरच्या विकासासाठी जेवढा विकासाचा निधी जास्त आणता येईल तेवढा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे कुणी गैरसमज तुमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतील, कधीकधी वेळ येते कावळा बसतो आणि फांदी मोडते. मी इंदापूर शहरात विकासाचा निधी आणला म्हणजे तुमच्यावरती उपकार केले नाहीत. 2009 ते मजेदार 2024 असू द्या माझ्या इंदापूर शहराने मला मतदान आरोपी आशीर्वाद दिला ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही 2014 सालापासून आमदार केलं मला माहित आहे कुठे पोलिसाची गाडी किंवा बॉडीगार्ड ठेवले नाहीत या शहरासाठी जेवढा काय निधी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधुनो प्रामाणिकपणे केलेला आहे. काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही कशी मदत होईल हे पाहिले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून तुम्हा सर्वांना मदत केलीली आहे. एक रात्रीत शिरसोडीचा पूल मंजूर केला तो करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यालय उघडलं आणि रातोरात मुंबई गाठली तेव्हा हा पूल उपमुख्यमंत्र्या अजित पवारांच्या माध्यमातून मंजूर झाला. यामुळे इंदापूरचे बाजारपेठ पाचपटीने वाढणार आहे, याचा इंदापूर शहरातील व्यापारांना फायदा होणार आहे. शिरसोडी चा पूल मंजूर करून घेण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन मी रातोरात जर ऑफिस उघडलं नसलं कागदपत्र तयार केली नसली तर माझं तोंड सडल परमेश्वर मला शिक्षा देईल यात काहीही खोटं नाही. मागील पाच वर्षात इंदापूर शहरासाठी एकूण साधारणता 867 कोटी मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे. इंदापूर शहर काय होतं इंदापूर शहर तुम्हाला बदललेलं दिसतंय का नाही दिसत नसेल त्यांनी डोळ्यावरचा चष्मा बदला. इंदापूर शहराची ओळख ही वेगळी प्रकारची होती कुठला पाहुणारावळा आज आपल्याकडे आला तरी नावे ठेवायचा. मी जास्त बोलण्यापेक्षा बोललेलं तोलणार आहे. मागील वर्षी 23 तारखेला याच दिवशी याच भागात तुम्ही कशा फटाकडे फोडल्या होत्या तशाच फटाकडे आपल्याला तीन १०० ला फोडायचे आहेत. तुम्ही माझ विधानभवनातलं माझं भाषण ऐका मी सगळ्यांच्या समोर जाऊन भाषण केलं होतं हिंदू मुस्लिम बांधवायचे भांडण लावायची आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आमचा स्वभाव राहिलेला नाही. अद्यापही माझी चार वर्ष आमदारकीचे आहेत शेवटी आमदार मी आहे दोन्ही विभागाचा निधी हा आपल्या भागामध्ये आणू शकतो. हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत हे विधानभवनात ठणकावून सांगणार तुमचा हा आमदार आहे. भरत शहा यांना जर तुम्ही नगराध्यक्ष केलं तर विकासाचा किती निधी मिळेल याचा विचार करा अफवांना बळी पडू नका,फक्त घड्याळाच चिन्ह बघा. माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी खूप योजना तुमच्यासाठी जाहीर केल्या आहेत मी काम करणारा आमदार आहे. मी चमकोगिरी मधला नाही,निवडणुकी पुरता येणारा मी नाही(हर्षवर्धन पाटील यांची ॲक्शन केली). माझं क्रीडा मंत्री पद जाणार आहे याची मला दोन ते तीन दिवस अगोदर चाहूल होती शेवटच्या दिवशी इंदापूर मधील क्रीडा संकुल साठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा त्यांचा आमदार आहे. हात जोडून विनंती करतो, भरत शहा यांसह माझ्या नगरसेवक पदाचे उमेदवारांना निवडून द्या विकास कसा करायचा मी तुम्हाला सांगतो
149
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 17:46:36207
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 23, 2025 17:16:59175
Report
PNPratap Naik1
FollowNov 23, 2025 16:15:11280
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:48:56173
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 23, 2025 15:32:3293
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 15:31:02138
Report
ABATISH BHOIR
FollowNov 23, 2025 13:16:48153
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 23, 2025 13:04:23102
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 23, 2025 13:03:52145
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 23, 2025 13:00:55200
Report
JMJAVED MULANI
FollowNov 23, 2025 12:49:19173
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 23, 2025 12:34:4787
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:22:0195
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 23, 2025 12:21:18100
Report