Back
बारामती विकास के आवाज़: अजित पवार प्रचार शुभारम्भ
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:15:43
Baramati, Maharashtra
बारामती नगरपालिका निवडणूक प्रचार शुभारंभ
बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉईंटर बारामती नगरपरिषद प्रचार शुभारंभ
देव दिवाळीच्या शुभम भारतावर आज आपण प्रचाराचा शुभारंभ करत आहोत.
ही निवडणूक वर्षां होत आहे.
मागील काळात पौर्णिमा तावरे यांना निवडून दिलं होतं.
चल आता जवळपास नऊ वर्ष होऊन गेली...
बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला.
सरकार आपले विचारात होतो त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणावर आणायला पण यशस्वी झाले.
चाळीस कोटीचं बारामती करंज उत्पन्न आणि त्यातून आपण कोरोड रुपयाची कामे केली.
अनेकांच्या मुलाखती घेऊन मग 41 लोकांना संधी दिली...
विरोधकांनी काही ना काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला
बारामती करून तुम्ही मला 1991 ला पहिल्यांदा खासदार केले त्यानंतर पवार साहेबांचे आपण नेहमी १९६७ सालापासून त्यांना निवडून देण्याचं काम केलं.
साहेबांनी देखील त्यांच्या काळात त्यांना बारामतीकरणात जेवढे काही भरभरून देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केला
नंतरच्या काळात मी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लागलो.
त्यामध्ये आपण काही निर्णय घेता येतात, एखाद्या नगरसेवकांनी नाही ऐकलं तर मला त्याला व्हिप बजावता येतो.
तुमच्या विकासाच्या करिता आपल्या बारामतीकरांच्या विकासाकरिता हा तुमच्यासमोर बोलणारा अजित पवार कटिबद्ध आहे याची तीळ मात्र शंका मनात बाळगू नका
ही निवडणूक बारामतीच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे
सर्वांची आपल्याला साथ असली तरी आपण गाफिल राहता कामा नये.
काहींनी निनावी पत्र देत म्हणाले तुम्ही जो उमेदवार दिला त्याच्या बॅकग्राऊंड तपासलं नाही, मी सर्वांचे बॅकग्राऊंड तपासली जर कोणाचा राहिला असेल तर मला सांगा तेही दुरुस्त करेल मी कामाचा माणूस आहे बिनकामाचा नाही
बारामतीची निवडणूक म्हटल्यावर मीडिया येणार विरोधक आपल्यावर टीका करणारा प्रत्येकाला अधिकार आहे पण मला त्या गोष्टीला उत्तर द्यायचं नाही
गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलला आहे.
बारामतीच्या शारदा प्रांगणात गोरगरिबा करिता सीबीएससी स्कूल करत आहोत.
पूर्वी साहेबांना व्यापारी भेटायला इच्छुक साहेब सोमेश्वर छत्रपती माळेगावचं पेमेंट काढा त्याशिवाय मार्केटमध्ये ग्राहक नाही पण आज तशी वेळ नाही
शहरात आज अनेक कामे सुरू आहेत.पण काहीजण अफवा उठवतात,पण मी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करत नाही.
काही मंदिर मला बाजूला करावी लागली पण त्याच्यासाठी सुंदर मंदिर बनवत आहोत.
मी अंधश्रद्धा मानत नाही पण श्रद्धाला महत्व देतो
कधीकधी काही मिनिटात काही इंचा पाऊस पडतो लगेच आपले मित्र तेवढीच स्क्रीन दाखवतात बघा बारामतीत किती पाणी बारामती तुंबली तुंबली अरे पण बाकीची शहरात जाऊन बघा
तुमचं बस स्थानक चांगलं केल्या नंतर रेल्वे स्टेशन कोणी एकानेही सांगितले नाही ते चांगले करा पण मी केले का नाही.
मी पण बारामती कर आहे माझं लहानाचं मोठेपण इथे गेले आहे.
अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
प्रशासकीय भवन समोर दहा बारा एकरात गार्डन करत आहोत, त्यासाठी एक पैसा नगरपरिषदेचा घालत नाही. सर्व पैसे बाहेरून आणत आहे.
30 35 एकरात शिवसृष्टी निर्माण करत आहोत.
आपल्या बारामती मधील सिद्धेश्वराच्या मंदिरातील जो नंदी आहे तासा नंदी देशात नाही. बर जगात नाही,देश तरी कशाला जगात नाही च्या मायला देश तरी कशाला.
अनेक गोरगरिबाण करिता घरबांधणीचा कार्यक्रम या टर्मला आम्ही हातात घेणार आहोत.
अजून ही कचरा ची विल्हेवाट लावण्याकरता इंदूरच्या धर्तीवर तीन शहर निवडले आहेत त्यात बारामती आहे
मी शेवटच्या प्रचार सभेला येणार आहे पण पुढील आठ दहा दिवसात अशा काही कंड्या पेटले असत्या सांगायलाच नको म्हणून त्याच्या करता आजच प्रचाराचा शुभारंभ केला
चार जागा स्वीकृतच्या माझ्या हातात आहेत. मी योग्य माणसाला संधी देईल.
सचिन सदाशिवराव सातव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बारामती मध्ये 1 लाख 2 हजार मते आहेत रेकॉर्ड करायचे.
माझ्या पद्धतीने काम नाही झाले तर मग मी बघणार त्याच्यासमोर सांगतो.
याच्यानंतर मी बारामती सहकारी बँकेला दुसऱ्याला संधी देणार
बारामती अर्बन बँकेत फार प्रॉब्लेम होते मी आज ते काढत बसत नाही पण सचिनने चांगले बँका चालवली
काही कठोर निर्णय घ्यावे लागले काही नाराज झाले, काहींच्या वसुली करावी लागली्. काही जण म्हणाले आपल्याजवळच्या आहेत तरी त्यांची वसुली अरे अजित पवार असला तरी वसुली करणार
बारामती करांनाकुठेही कमीपणा येणार नाही बारामती करांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द त्याच्या साक्षीनं देतो.
ही बारामती अशीच पाहिजे असेल तर 41 च्या 41 नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील निवडून द्या
ज्यांना उमेदवारी मिळाले नाही त्यांनी नाराज होऊ नका.
देशातील सुंदर हरित आणि स्वच्छ शहर म्हणून बारामतीचा नावलौकिक हवा आहे माझं स्वप्न आहे
यासाठी मला तुमची साथ हवी आहे मी आता काही करू शकत नाही.
यात माझा स्वार्थ काहीही नाही, मी सकाळी सहा वाजल्यापासून उठून फिरतो पाहतो.
इतरांच्या तुलनेत हे एक अग्रेसर शहर म्हणून याची ओळख व्हावी यासाठी माझा प्रयत्न असतो.
मला तुम्ही आठ वेळा वेगवेगळ्या पदावर बसून आहे आमदार केलं आहे
आज देखील मी पंतप्रधानांच्या बरोबरीने बसतो हे कशामुळे शक्य झालं तर बारामतीकरण म्हणू शक्य झालं, चढउतार आले
कधीकधी तुमच्यापुढे ग्रहण प्रश्न निर्माण झाला परंतु त्यातूनही तुम्ही वाट काढली सुप्रियाला निवडून देऊन साहेबांना खुश केलं मला निवडून देऊन मलाही खुश केलं
तुम्ही मला मागे खासदार केलं तेव्हा मी 25 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामे केली .
पालखी मार्ग बाहेरून गेल्याने वाहतूक कोंडीवर परिणाम झाला की नाही
जेवढा ट्राफिक कमी करता येईल तेवढा प्रयत्न करत आहे.
विकास झाला असला तरी मला परिपूर्ण विकास करायचा आहे आणखी काही गोष्टी राहिल्या आहेत, ते करण्यासाठी मला माझ्या घड्याळावरील उमेदवार निवडून द्या
की 1991 पासून तुम्ही माझे पाठीशी उभा राहिला आहात तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिला नाही.
माझ्याकडे बघून माझ्या उमेदवारांना मतदान करा
पूर्वी कॅनोन ने जाताना काय वाटायचं आता कसं वाटतंय गार गार वाटतंय गार गार वाटतय.
आज अजित पवार आहे अजित पवार काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही पण हे पुढे टिकवायचं माझ्या पुढच्यांच्या नंतर घामच निघणार आहे
घड्याळाशिवाय दुसरा कुठल्याही उमेदवाराचा तुम्ही या शहरात विचार करू नका
यंदा मी बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी कोणाचा 그ांचा शत्रू नसतो.
माळेगाव मध्ये पण रंजन तावरे यांना बरोबर घेतल आहे.
चांगलं काम करणार असेल तर माझी काय हरकत आहे.
निवडणुकीत जागृत रहा शहराच्या विकासासाठी बनण्यासाठी वैयक्तिक नाराजी पुढे आणू नका.
विरोधकांना पण कधीही कमजोर समजलं नाही काही विरोधक बाहेरून आले होते तरी देखील त्यांना आपण कमजोर समजले नाही
या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी साथ दिली पाहिजे, माझ्या निवडणुकीला तुम्ही कसं घरणंघर फिरता तसे या निवडणुकीलाही फिरा
पत्रकारांनी खऱ्या बातम्या देत चला.
काय काय जमानाले प्रत्येकाला वर्षाला दहा हजार रुपये देणार आईला म्हटलं नितीश कुमारांना भेटून आले की काय
अशा काही गोष्टी होत आहेत.
1975 कोटी रुपये बारामती नगर परिषदेसाठी या कार्यकाळात आणलेले आहेत.
ही निवडणूक गावकी भावकीची नाही विकासाचे आहे
प्रचार करताना कोणालाही उलट बोलायचं नाही जर कोणी प्रश्न विचारला तर समजून सांगायचं ऐकलं ठीक काही जण तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील, कुठल्याही जाती धर्माला ठेच पोहोचेल भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे वक्तव्य तुमच्या सभेत बोलायचं नाही, पुढची समारोपाची सभा आपण शारदा प्रांगणात घेऊ
मतदारांचा मान सन्मान ठेवा.
जसं विधानसभेला माझ्या खांद्यावर मतांचा बोजा टाकल्यामुळे मी जसं पुन्हा कामाला सुरुवात करतो तसंच या नगर परिषदेच्या निवडणुकीला या सर्व घड्याळाच्या उमेदवारांना एवढं प्रचंड मतांनी विजयी करा
81
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:32:55109
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 16:15:15140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 21, 2025 15:45:36108
Report
बाळ्या मामा म्हात्रे ने आयुक्त से 37 गुंठे उद्यान के लिए डिमार्केशन और अन्य मांगों के लिए मुलाकात की
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:33:39120
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 21, 2025 14:21:16140
Report
SNSWATI NAIK
FollowNov 21, 2025 14:20:54117
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 14:18:08131
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:13:41132
Report
ABATISH BHOIR
FollowNov 21, 2025 14:12:11108
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 14:09:25178
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 21, 2025 14:07:4881
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 21, 2025 14:07:21119
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 21, 2025 14:07:04202
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 21, 2025 13:50:31154
Report