Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501
तुळजापुर प्रचार: मंदिर विकास पर पाटील का आदित्य-उद्धव पर सीधा हमला
DPdnyaneshwar patange
Nov 21, 2025 04:05:38
Dharashiv, Maharashtra
धाराशिव जय भवानी - जय शिवाजी म्हणतात हे, कशाच्या जीवावर आईच नाव घेता? तुळजाभवानीच्या दरबारातून पहिल्या प्रचार सभेत आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचा थेट हल्लाबोल. तुळजाभवानी मंदिराच्या विकासाला सत्तेत असताना एक रुपयाही दिला नाही, साधा प्रस्ताव पाठवला नाही, कशाच्या जीवावर बाता मारता? खासदार, आमदार यांनी एक पाकीटमार तरी पकडून दिला का, राणाजगजीतसिंह पाटील यांचा जाहीर सभेत ड्रग्ज प्रकरणातील टिकेवरून ओमराजे निंबाळकरांवर निशाणा. भाजपची तुळजापुरात जंगी शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली. विनोद गंगणे यांच्या बद्दल खोट नाट बोलले खरं मी तुळजापुराला नाही तर महाराष्ट्राला सांगितलं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने टीकेची झोड, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील नगरपरिषद प्रचारासाठी मैदानात.
144
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 21, 2025 04:49:05
Dhule, Maharashtra:थंडीच्या लाटेचा परिणाम आता फळभाज्यांच्या दरांवर ही दिसू लागला आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाटेचे दर विक्रमी वाढलेले आहेत. वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळे टमाटे दर दुपटीने वाढलेला आहे. आठवड्यापूर्वी 20 किलो टमाट्याचे कॅरेट 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र तेच आता वीस किलोचे कॅरेट 1000 रुपयांपर्यंत विकला जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही कारण की, वाढत्या थंडीमुळे टमाट्याचे उत्पन्न कमी झालेला आहे. त्यामुळेयां दर वाढीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. येणारे काही दिवस थंडीचा परिणाम असाच कायम राहिलास दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
19
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 04:33:58
Amravati, Maharashtra:विरोधकांकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नसल्याने ते घराणेशाहीचा आरोप करतात; आमदार प्रताप अडसूळ यांच्या भगिनी अर्चना रोठे यांची विरोधकांवर टीका. धामणगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार अरुण अडसूळ यांच्या कन्या तसेच भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. यावर अर्चना रोठे यांनी जोरदार टीका केली असून विरोधकांकडे निवडणुकीत कुठलाही मुद्दा नसल्याने ते घराणेशाहीचा आरोप करत असल्याचा अर्चना रोठे यांनी म्हटल आहे. मी वयाच्या 18 व्या वर्षापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी पक्षाचं काम केलं असून पक्षाने आता मला ही जबाबदारी दिली आहे. भारतीय जनता पक्ष हे आमच कुटुंब असून कुटुंबानी दिलेली जबाबदारी मी पार पाडत असल्याचं अर्चना रोठे यांनी सांगितल. याविषयी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना रोठे यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
28
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 04:33:38
Washim, Maharashtra:HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी आता फक्त ९ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पण वाशीम जिल्ह्यातील जवळपास ७० हजार वाहनांधारकांनी अद्यापही HSRP साठी नोंदणी केलेली नाही. बनावट नंबर प्लेट, नंबरमध्ये फेरफार आणि गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ही प्लेट अनिवार्य केली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही प्लेट बसवणं बंधनकारक असून फक्त सरकारी मान्यताप्राप्त कंपनीकडून बसवलेली HSRPच वैध मानली जाणार आहे. इतर ठिकाणची नंबर प्लेट लावल्यास थेट कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करत लवकरात लवकर HSRP बसवण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
67
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 21, 2025 04:05:53
Nashik, Maharashtra:डोंगराळे,मालेगाव.. डोंगराळे गावातील महिला व विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे घोषणाजी करीत त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊन बालिकेला न्याय द्यावा.. गावातील महिलांचा आक्रोश.. आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी करीत केली घोषणाबाजी..मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग... • मंत्री गिरीश महाजन बाईट मुद्दे.. - मुख्यमंत्री महोदयांशी मी यासंदर्भात बोलणार आहे... - फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याची मागणी करणार आहे... - अतिशय निर्दयी ही घटना आहे.. - आरोपीला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे हीच मागणी आहे.. - कायद्याच्या तरतुदीनुसार निश्चितच त्याला फाशीची शिक्षा होईल.. - येणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निश्चितच चर्चा करू - आणि पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.. - कायद्याची तरतुदीप्रमाणे लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन आरोपीला शिक्षा देण्यात येईल.. - आम्ही सगळे पीडित कुटूबियांच्या सोबत आहोत.. - या परिसरात एक पोलिस चौकीची मागणी केली आहे.. - येत्या दोन दिवसात या भागात पोलिस चौकीची निर्मिती होईल... - गावकऱ्यांच्या संतप्त भावना आहे.. - त्याला चौकात सजा झाली पाहिजे.. - पण कायद्याच्या तरतुदी प्रमाणे त्याला शिक्षा मिळेल.. - उज्वल निकम यांच्याशी बोलणे झाले आहे... - त्याला शिक्षा होईल..
140
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 21, 2025 04:01:34
Khed, Maharashtra:पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदेत शिंदे गटाने महिला आरक्षित वार्डात अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली. अतुल देशमुखांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पूर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा, आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत असतानाही अतुल देशमुख यांनी मोठा डावपेच टाकत विचारावर चालणाऱ्या लोक कमी आहेत पण जी विचारावर चालतात ती घडतात असं म्हणत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले.
150
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 21, 2025 04:01:11
96
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 04:00:48
Nagpur, Maharashtra:नागपूर सलील देशमुख राजीनामा देत रात्री मुंबईला गेल आहे.. एकीकडे प्रकृतीचा राजीनामा दिल्याचं कारण पुढे केलं असताना सलील देशमुख तडकाफडकी मुंबईला गेल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहे... सलील देशमुख यांची मध्यंतरी प्रकृती खराब असताना रुग्णालयात अजितदादा पवार यांनी स्वतःहून त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता प्रकृतीचे कारण देत राजीनामा देणारे सलील देशमुख मुंबईला गेलेले सलील देशमुखची नवी वाटचाल चे संकेत देताय सलील देशमुख राजीनामा मागे असल्याची चर्चा काय? सलील देशमुख यांच्या राजीनामा देण्यामागे काटोलचे शेकापचे राहुल देशमुख यांच्या यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे. त्यांना राष्ट्रवादी sp चा पाठिंबा दिल्याने सलील देशमुख खरंतर नाराज असल्याने राजीनामा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सलील देशमुख हे आमदारकीसाठी उमेदवार होते. त्यावेळी शेकापचे राहुल देशमुख यांनी विरोधात आमदारकिसाठी निवडणूक लढवली... चरण सिंग ठाकूर हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. एकाीकडे सलील देशमुख पराभवासाठी शेकापचे राहुल देशमुख हे जबाबदार असताना. त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिल्याने सलील देशमुख यांनी नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या सगळ्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसल्याचे बोलले जात आहे. पण या सगळ्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका मात्र अजूनही स्पष्ट झालेली नाही हे विशेष.
162
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 21, 2025 03:34:39
Akola, Maharashtra:भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रवक्ते फैजान मिर्जा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जयकुमार गोरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी विशेष ऐकले नव्हते. मात्र शरद पवारांवर टीका केली की दिल्लीतील नेते खुश होतात, म्हणूनच गोरे शरद पवारांना निशाणा बनवत असल्यास ते म्हणाले. तर शरद पवारांवर टीका केल्याशिवाय भाजपच्या नेत्यांना प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळेच भाजप नेते वारंवार पवारांवर राजकीय हल्ले करत असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीबाबतही फैयाज खान यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, सलील देशमुख यांनी आजारामुळे तात्पुरता पवित्रा घेतला असून ते भाजपाच्या संपर्कात नाहीत. याउलट, खान यांनी दावा केला की, भाजपचे अनेक आमदारच आपल्या पक्षातून कंटाळले आहेत, त्यामुळे तेच इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. शरद पवार–भाजप वाद अधिक तीव्र होत असताना, गोरे यांच्या टीकेवरून सुरू झालेला हा आरोप–प्रत्यारोपांचा फेरा आता राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापवण्याची चिन्हे आहेत.
141
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 03:18:33
146
comment0
Report
SMSATISH MOHITE
Nov 21, 2025 03:16:50
242
comment0
Report
Advertisement
Back to top