Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

बारामती में चार घंटे की बिजली कटौती, समय बदलने की मांग युगेंद्र पवार ने की

JMJAVED MULANI
Mar 25, 2026 08:01:30
Rui, Maharashtra
बारामतीत दररोज चार तास भारनियमन.... भारनियमनाची वेळ बदलण्याची युगेंद्र पवारांची मागणी.... महावितारणच्या अधिकाऱ्यांना दिलं युगेंद्र पवारांनी निवेदन
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 09:22:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:विविध प्रलंबित मागण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन. आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यासाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामध्ये अशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला सहभागी झाल्या होत्या. थकीत मानधन त्वरित देण्यात यावा व मानधन वेळेत जमा करावं, शासनाच्या विविध आरोग्य योजना अंमलबजावणीचे मानधन देखील तातडीने देण्यात यावे, मात्रा ॲप व्यवस्थित चालू राहण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करावी,म्हणून मानधन वाढीची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 25, 2026 09:22:36
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी झुंबड, अफवांनी नागरिकांमध्ये घबराट अंबरनाथ-बदलापूरमध्ये पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा अंबरनाथ तालुक्यात काही पेट्रोल पंप बंद अंबरनाथ तालुक्यात सध्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहायला मिळत आहे राज्यभर पसरलेल्या अफवा आणि इंधन कंपन्यांनी क्रेडिट लिमिट बंद करून तात्काळ पैसे भरण्याची अट लागू केल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या नव्या नियमामुळे अनेक पेट्रोल पंपचालक आर्थिक अडचणीत सापडले असून त्याचा थेट परिणाम इंधनपुरवठ्यावर झाला आहे. परिणामी अंबरनाथ आणि विशेषता: बदलापूर येथे पेट्रोल साठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसत आहे. बदलापूर मध्ये परिस्थिती आणखी तनापुर्ण झाली असून पुढील चार दिवस पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा आणि प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याचेही समोर आलं आहे. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरज नसताना पेट्रोल साठवू नये अस आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असलं तरी पेट्रोलचा संभाव्य तुटवडा आणि दरवाढीच्या चर्चांमुळे नागरिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत असल्याने शहरात एक प्रकारे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 25, 2026 09:17:44
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 25, 2026 09:06:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये पेट्रोल टंचाई सदृश्य स्थिती,अनेक पंप बंद तर सुरू असलेल्या पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा.. अँकर - सांगली जिल्ह्यामध्ये कालपासून पेट्रोल संपणार अशी अफवा पसरल्याने पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर वाहनधारकांची एकच झुंबड उडली आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर दूचाकी व चार चाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.आज सांगली शहरात देखील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून तर अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या मध्ये आणखीनच अफवा पसरत आहे.प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं सांगण्यात येतंय पण प्रत्यक्षात मात्र आता शहरातल्या सूरु असलेल्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकाची झुंबड उडाले असून काही पेट्रोल पंपावर केवळ दोनशे रुपयांचे पेट्रोल दुचाकी धारकांना देण्यात येत आहे.
903
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 25, 2026 08:50:08
989
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 25, 2026 08:34:18
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना रात्रभर एजन्सी कार्यालयासमोर अंथरून पांघरून घेऊन थांबावे लागत असल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे. गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टीम लागू करावी तसेच बुकिंगनंतर ८ दिवसाच्या आत ग्राहकाला सिलंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एजन्सी चालकांना दिल्या होत्या मात्र त्याची कुठलीही अंमलबजावणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून येत आहे. सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे शासन प्रशासन सांगत असले तरी, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे तीव्र पडसाद ग्रामीण भागात उमटताना दिसत आहेत. सिलेंडर मिळविण्यासाठी नागरिकांना गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोरच अंथरूण-पांघरूण घेऊन रात्र काढावी लागत आहे. चिचगाव, धनज, माणिकवाडा, चिखली कान्होबा, वटफळी, जवळगाव यांसह अन्य गावांतील ग्रामस्थांनी शहरापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनसमोरच मुक्काम ठोकला आहे. अनेकजण आपल्या सोबत जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी तसेच अंथरूण-पांघरूण घेऊन येत असून, रात्रभर गोडाऊनसमोर थांबून आहेत.
1057
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 25, 2026 08:34:04
1024
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 25, 2026 08:03:59
976
comment0
Report
Advertisement
Back to top