Back
नागपुर में ओबीसी मोर्चा आज: जीआर रद्द करने की एकमुखी मांग
AKAMAR KANE
Oct 09, 2025 07:17:54
Nagpur, Maharashtra
Nagpur
बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते -
On ओबीसी मोर्चा -
- उद्याचा ओबीसीचा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल, नागपुरात ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने 2 सप्टेंबर चा काळा जीआर आहे तो जीआर रद्द झाला पाहिजे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे
- जीआर काढून सरकार ओबीसींच्या मानेवर सुळी चालवण्याचा काम करत आहे
- लाखोच्या संख्येने या मोर्चात उद्या लोक सहभागी होतेल, उद्या साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसींचे नेते या मोर्चात येणार आहेत
- नेत्यांसोबत सामाजिक संघटना ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पाचारण केलं आहे
- ओबीसींचे तज्ञ,ज्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर अभ्यास आहे त्यांना सुद्धा सकल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी सुविधा आहे
- महायुती आणि फडणवीस सरकार जे म्हणतात की आमचा डीएनए ओबीसी आहे, तो डीएनए कोणाचा आहे हे सिद्ध करणारा उद्याचा मोर्चा असणार
- जीआर रद्द करा हीच आमची प्रमुख मागणी आहे
- नाहीतर गावागावात जाऊन सर्व लोकप्रतिनिधींना ओबीसी समाज जाब विचारेल
- आम्ही कोणालाही पत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका दिली नाही कारण कोणाचं लग्न नाही आणि बारसं नाही
- हा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे इथे कुठल्याही ओबीसीला येण्यास बंधन नाही जो कोणी ओबीसींच्या हिताचं रक्षण करतो त्यांनी स्वतः यावं
- मी काही नेतृत्व करत नाही, मी एक ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ते
- आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी येण्याचा आवाहन केला आहे ही कुठे संघटना पक्ष बंधन नाही
- ज्यांना- ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं
- समाजाला मार्गदर्शन करणारे पाच भाषणे 15 -15 मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल, फार मोठ्या राजकीय नेत्यांचे भाषण व्हावे आणि कुठेतरी आंदोलन बरगळावे अशी आमची इच्छा नाही आम्हाला काही नको आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवं आहे
- काँग्रेसच नाही तर भाजप, राष्ट्रवादी सर्वच पक्षाचे नेते येथील अशी मला अपेक्षा आहे
On योगेश कदम -
- सरकारने आता जागोजागी काउंटर लावले पाहिजे आणि गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे, खुशाल यावं आणि माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावे अशी जाहिरात आणि काउंटर महाराष्ट्रात जागोजागी लावले पाहिजे, म्हणजे गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही
- जनतेला धाक दपट देऊन निवडणुकांमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशी पद्धती महाराष्ट्रात सुरुवात करावी, म्हणजे गुंडांना त्यासाठी योगेश कदम या गृहमंत्र्यांची पर्मनंट नियुक्ती करावी आणि त्यांना एवढेच काम करावे असेच सांगावे
On घायवळ -
- घायवळच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता, हे सत्ता पक्षाच्या भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळा पुण्याचा पालकमंत्री राहिलाय त्याने त्याला विचारलं तर हे सर्व तो कोणामुळे मोठा झाला कशामुळे मोठा झाला कोणी मोठा केलं आणि ज्या काही योजना नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजे
- लाडकी बहीण आणली त्याप्रमाणे लाडका गुंड अशी योजना आणावी आणि महाराष्ट्रात गुंडांचा पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे अशी जाहिरात द्यावी म्हणजे महाराष्ट्रात आनंद राहील
On ओबीसी तरुण आत्महत्या -
- ओबीसी तरुणांमध्ये या जीआरमुळे फार निराशा आली आहे तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाही हे दुर्दैव आहे, कुंभकरणाच्या झोपेसारखा हे सरकार आहे
- महाराष्ट्रात ओबीसी संपावायचा असा दिसतय, 374 जाती संपल्या पाहिजे, ते गुलाम झाले पाहिजे हे आमच्या ताटाखालची मांजर म्हणून जगली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम जरांगे कडून आणि सरकारकडूनही होताना मला दिसत आहे
- आमचे तरुण आत्महत्या करत असतील तर हा जीआर रद्द करावा आणि मी तरुणांना आवाहन करतो आम्ही लढतो आहेत तुमच्या हक्कासाठी तुम्ही आत्महत्या करू नका आणि त्या मार्गाने जाऊ नका अशी माझी विनंती महाराष्ट्रातील ओबीसी तरुणांना आहे
On सामाजिक न्याय निधी लाडकी बहीण -
- आदिवासी आणि सामाजिक न्याय विभाग असे दोनच विभाग दिसतात निधी वळवण्यासाठी
- दलित शोषित माणसांचा निधी वळवला तर कोणी आवाज उठवू शकत नाही, यांच्यात लढण्याची किंवा आवाज उठवण्याची क्षमता नाही, हे बोंबाबोंब करू शकत नाही, त्यामुळे सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल यांना खड्ड्यात घाला आणि यांचा निधी लाडक्या बहिणीला द्या, हे धोरणच या सरकारने आखलं आहे
- मी दलित आदिवासी बांधवांना आवाहन करतो की या निर्णयाविरुद्ध संविधानिक असलेल्या निधी जो लोकसंख्येच्या प्रमाणातच दिला पाहिजे पण तो दिला जातो बजेटमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र दुसरीकडे वळूवून खर्च केला जातो, याविरुद्ध सुद्धा एक मोठा संघर्ष आम्हाला करावा लागेल
On धर्मरावबाबा आत्राम -
- शेवट हे सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे, यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी कमिशन खोरीसाठी यांची निर्मिती झाली आहे
- त्यामुळे खनिज निधीवरून आजी-माजी मंत्री सामोरे येत असेल तर या दोघांमध्ये कुठेतरी टक्केवारीवरून बिघडला आहे, त्या खनिज निधीतून 20-20 टक्के वसूल करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे
- काम वाटून घेतल्या जात आहेत ते सह पालकमंत्री आहेत त्यांचा जिल्ह्याची काही संबंध नाही तरी पण जाऊन माझा वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी वाट्यांमध्ये घाटा झाला, यांना जनतेशी काही देणंघेणं नाही
On मोर्चा -
- जेवढे जनता येईल त्यांच्या दृष्टीने आम्ही विचार केला होता प्रशासनाने संविधान चौक दिला आहे
On एटीएस पुणे कारवाई -
- कारवाई होऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे आवश्यक आहे
On दि बा पाटील विमानतळ -
- भारतातील सर्वात मोठा विमानतळ बघून आणि त्याची व्याप्ती बघून अमेरिकेच्या किंवा लंडनच्या हित्रो एअरपोर्ट एवढा मोठा विमानतळ होत आहे, त्यामुळे मोदी साहेबांना वाटलं असेल की त्यांचं नाव या विमानतळाला मिळावा असं त्यांच्या डोक्यात आलं असेल म्हणून त्यांनी कदाचित नावाची घोषणा केली नसेल
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 09, 2025 12:37:070
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 09, 2025 12:23:323
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 09, 2025 12:18:110
Report
KPKAILAS PURI
FollowOct 09, 2025 12:00:500
Report
AKAMAR KANE
FollowOct 09, 2025 11:53:230
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 09, 2025 11:51:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 09, 2025 11:46:480
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 09, 2025 11:34:460
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 09, 2025 11:04:440
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 09, 2025 10:42:540
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 10:27:510
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 09, 2025 10:27:120
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 09, 2025 10:24:330
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:49:05Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घातक रसायन ऑइल वाहतूक करणारा ट्रक पलटी
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव जवळील वळणावर ट्रकचा अपघात
पलटी झालेल्या टँकरमधून मोठया प्रमाणात ऑइलची गळती
ज्वालनशील आईला असल्यामुळे शेजारील शेतीवस्ती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
एक तासापासून टँकर जागीच असल्याने नागरिकांचा संताप
4
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 09, 2025 09:45:540
Report