431001
घातक रसायन से भरा तेल टैंकर पलटा, वैजापूर के बोऱ दहेगांव के पास दहशत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:घातक रसायन ऑइल वाहतूक करणारा ट्रक पलटी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव जवळील वळणावर ट्रकचा अपघात पलटी झालेल्या टँकरमधून मोठया प्रमाणात ऑइलची गळती ज्वालनशील आईला असल्यामुळे शेजारील शेतीवस्ती, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण एक तासापासून टँकर जागीच असल्याने नागरिकांचा संताप0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सुनेत्रा पवार ने बारामती के सोमेश्वर साखर कारखाने के निदेशक मंडल से चर्चा की
Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सोमेश्वरच्या संचालक मंडळाची घेतली भेट..... राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती उपस्थिती लावत नूतन संचालक मंडळाशी संवाद साधला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला मिळालेल्या यशानंतर सुनेत्रा पवार यांनी आज नूतन संचालक मंडळाची भेट घेतली आणि कारखान्याच्या पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चाही केली.0
0
Report
वाशीम के काकडदाती इलाके में दिवाली दीपक से कैंटीन में आग, भारी नुकसान
Washim, Maharashtra:वाशीम शहरापासून जवळ असलेल्या काकडदाती परिसरात दिवाळीच्या दिव्यामुळे एका कॅन्टीनला आग लागल्याची घटना रात्री घडली.गजानन गाभणे यांच्या कॅन्टीनला लागलेल्या या आगीत कॅन्टीनमधील साहित्य जळून खाक झालं असून मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.ऐन दिवाळीच्या सणात कॅन्टीन आगीत भस्मसात झाल्याने गजानन गाभणे यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.0
0
Report
कोल्हापुर में सत्ता-टकराव के मद्देनज़र संघर्ष मोर्चा, जिलाधिकारी कार्यालय के बाहर भारी पुलिस बंदोबस्त
Sangli, Maharashtra:कोल्हापूरच्या संघर्ष मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचे तयारी पूर्ण..तगडा पोलीस बंदोबस्त.. गोकुळच्या सत्ता संघर्षातून कोल्हापूर मध्ये आज संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्येच मोर्चा नंतर सभा पार पडणार आहे,सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे,मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.दसरा चौकामधून गोकुळ वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी,अशी हाक देत संघर्ष मोर्चा निघणार आहे,त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे..0
0
Report
Advertisement
ताडोबा-अंधारी अभयारण्य दिवाली की छुट्टियों में हाउसफुल, पर्यटन ने पकड़ी रफ्तार
Chandrapur, Chhattisgarh:चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे हाउसफुल झालाय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कोर आणि बफर क्षेत्रातील सर्व गेटवरील सफारी गाड्यांची बुकिंग हाऊसफुल झाली आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्या, हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरण आणि अतिशय आधुनिक सोयी सुविधांमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे. गेल्या काही वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बुकिंग पासून ते सफारी पर्यंतच्या सर्व गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत आणि त्यामुळे देशभरातील पर्यटकांचा ओढा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे वाढलाय. त्यातही दिवाळीच्या सलग सुट्ट्या या पर्यटकांसाठी ताडोबाची टायगर सफारी अनुभवण्याची मोठी संधी ठरते आणि त्यामुळेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.0
0
Report
दिवाली पर घर लौटे जज की 11 केवी विद्युत धक्का से मौत, गांव शोक
Vasai-Virar, Maharashtra:दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू. दिवाळीची सुट्टी आनंदात गावी आलेल्या न्यायाधीशांवर काळाने घाला घातला आहे. शेतातील उसाच्या मळ्याला लागलेली आग पाहण्यासाठी गेलेल्या न्यायाधीशांचा 11 केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावावर शोककळा पसरली आहे. तुकाराम उर्फ अजित पतंगराव मोटे असं मृत न्यायाधीशांचं नाव असून, ते पालघर जिल्ह्यातील वसई येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायधीश म्हणून कार्यरत होते.0
0
Report
नाशिक के कळवण में होलसेल गोदाम में भीषण आग, करोड़ों का माल जलकर खाक
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवणमध्ये होलसेल किराणा मालाच्या गोदामाला भीषण आग आगीत साडेतीन कोटी रुपयांचा माल जळून खाक गोदामाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान स्थानिक नागरिकांनी पाण्याचे टँकर आणि बाल्टीच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीवर नियंत्रण मिळणे अवघड होते. आगीची माहिती मिळताच कळवण, देवळा आणि सटाणा येथील अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीन बंबांच्या साह्याने 12 फेऱ्या करून जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या आगीत सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला तर गोडाऊनचेही मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
पिंपरी चिंचवड़ में लक्ष्मीपूजन के दौरान 50 आगजनी, 20 घरों में आग लगने से नुकसान; कोई घायल नहीं
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री आगीच्या 50 घटना घडल्या. त्यामध्ये २० ठिकाणी घराला किंवा फ्लॅट ला आग लागल्याचं समोर आले. तर मोकळ्या मैदानात गवत, कचरा आणि झाड यांना आग लागण्याच्या २५ घटना घडल्या..! फ्लेक्स, कंपाऊंड, टॉवर यांना ही आग लागण्याच्या ५ घटना घडल्या..! सुदैवान यात कोणी ही जखमी झाले नाही...! अग्निशमन दलाने तत्काळ उपाय योजना करत सर्वच ठिकाणी आग आटोक्यात आणली...0
0
Report
लातूर में संपत्ति विवाद: पिता ने बेटे की हत्या, शव नाले में फेंका
Latur, Maharashtra:मालमत्तेत वाटेकरी नको म्हणून पोटच्या मुलाचा खून ... मालमत्तेत वाटेकरी नको म्हणून एका पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये समोर आलीय... विशेष म्हणजे, मुलाचा मृतदेह शेतातील नाल्यात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला... अरमान असं या चिमुकल्याचं नाव आहे... या प्रकरणी संशयित पिता युसूफ सय्यद याला पोलिसांनी परभणीतून अटक केलीय... मालमत्तेच्या वादातून एका निष्पाप बालकाचा जीव घेण्यापर्यंत बापाची मजल गेल्याने लातूर जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय...0
0
Report
नांदेड में कपड़ा दुकान में भीषण आग, लाखों के नुकसान की आशंका
Nanded-Waghala, Maharashtra:काल दिवाली लक्ष्मीपुजनाचा उत्साह असताना नांदेड शहरातील कापड दुकानाला भीषण आग लागली. कौठा भागातील वसरनी रोडवर सचिन ड्रेसेस हे कापड दुकान आहे. रात्री अकराच्या सुमरास कापड दुकानाला अचानक आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले पण कापड दुकान असल्याने आग झपाट्याने वाढत गेली. कापड दुकानाला लागूनच दुकानाच्या मागे टिन शेडमध्ये गोडाऊन असल्याने ही आग गोडाऊन पर्यंत गेली. मोठी आग असल्याने कितीही पाणी मारले तरी आग विझत नव्हती. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे पकडे जळून राख झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.0
0
Report
Advertisement
कम बारिश से भूजल घटा, २४७ गांवों में पानी की किल्लत की आशंका; जल संचयन के उपाय तेज
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात कमी पावसामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली असून, ७९ पैकी ७७ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी सरासरी १.११ मीटरने खालावली आहे. त्यामुळे आगामी काळात २४७ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जल संधारणासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना गाळ वाहतुकीसाठी प्रति घनमीटर ३५ रुपये ७५ पैसे अनुदान दिले जाणार आहे. एका एकरासाठी १५ हजार रुपये, तर कमाल अडीच एकर क्षेत्रासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. भूजल पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाकडून या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.0
0
Report
शिंदेसेने के नेता सिद्धाराम म्हेत्रे के बयान पर भाजपा ने दिया कड़ा जवाब
Solapur, Maharashtra:सोलापूर - शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप देखील आक्रमक, भविष्यात नेत्याचा बाप काढण्याचा भाजपचा इशारा - आ. रोहित पवार हे अक्कलकोट मध्ये दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना शिंदेसेनेचे नेते तथा माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त विधान - शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही जनतेच्या टॅक्स च्या माध्यमातून मिळते, कोणी त्याच्या बापाच्या घरचे देत नाही असे म्हणत मोदींवर केली होती टीका - शिवसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजप आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून चोख प्रतिउत्तर - यापुढे सिद्धाराम म्हेत्रे यांनी असे वक्तव्य केल्यास तुझा बाप, तुझ्या नेत्याचा, तुझ्या पिलावळ या सगळ्यांचा बाप काढण्याचा आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा इशारा इशारा - शिंदेसेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी आ. रोहित पवार यांच्या सभेला उपस्थिती लावत ही टीका केल्याने अनेक चर्चा उधाण - महायुती मधीलच मित्रपक्षाच्या महत्वाच्या नेत्याने मोदींबद्दल असे विधान केल्याने सर्वत्र नाराजीचा सूर बाईट - सिद्धाराम म्हेत्रे ( शिंदेसेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री ) बाईट - सचिन कल्याणशेट्टी ( भाजप, आमदार )0
0
Report
वाशिम में जलसंकट के कारण करड़ई की खेती 153% बढ़ी
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यात येणाऱ्या करडई पिकाला पसंती दिली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल १५३.३८ टक्के क्षेत्रावर करडईची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८१७.१८ हेक्टर क्षेत्रावर करडईचा पेरा अपेक्षित असताना प्रत्यक्षात १ हजार २५३.४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. घटता जलसाठा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, जास्त पाणी लागणाऱ्या गहू आणि हरभरा पिकांऐवजी शेतकरी करडईला पसंती देत असल्याचं चित्र आहे.0
0
Report
Advertisement
जेजुरी गड़ पर सोमवती अमावस्या यात्रा, पालखी का कर्हा स्नान और आतिशबाजी
Rui, Maharashtra:जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्था यात्रा..... पहाटे पाच वाजता मंदिर गडकोटातून कऱ्हा स्नानासाठी पालखीचे प्रस्थान..... जेजुरी गडावर फटाक्यांची आतिषबाजी आणि मुक्त भंडार खोबऱ्याची उधळण.... सोमवती यंत्र निमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी...... दुपारी 12 पूर्वी उत्सव मूर्तिंना घातलं जाणार कऱ्हा स्नान..... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा पार पडत आहे. सोमवती अमावस्या निमित्ताने जेजुरी गडावर पहाटे पाच वाजता श्री खंडोबा मंदिर गडकोटातून श्री खंडेरायाच्या पालखीचं कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी आणि भंडार खोबऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. दुपारी बारा वाजण्यापूर्वी उत्सव मूर्तिंना कऱ्हा नदीपात्रात स्नान घातलं जाईल. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत पालखी सोहळा पुन्हा मंदिरात दाखल होईल. सोमवती अमावस्या निमित्त मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर दाखल झालेत श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी कडून भाविकांच्या दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.0
0
Report
आहिल्यानगर में गन्ना मूल्य को लेकर किसानों ने 4000 रुपए प्रति टन की मांग का आंदोलAnnouncement शुरू
Shirdi, Maharashtra:Anc -सांगली आणि कोल्हापूरनंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यातही ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटण्याची चिन्हं आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 4 हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शिंदे गटाचे शेतकरी नेते रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बेमुदत रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी आंदोलकांची भूमिका आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात ऊस दराच्या मुद्द्यावरून शेतकरी विरुद्ध साखर कारखानदार असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आता या आंदोलनाला प्रशासन आणि साखर कारखानदार काय प्रतिसाद देतात , हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
विरार वेस्ट के HDIL सोसाइटी में भीषण आग, दमकल ने नियंत्रण पाया, लाखों का नुकसान
Vasai-Virar, Maharashtra:विरार पश्चिमेतील HDIL सोसायटीमध्ये एका घराला लागलेल्या भीषण आगीवर अखेर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. फटाक्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने रौद्ररूप धारण करत वरच्या मजल्यापर्यंत भडका घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं, तरी घरातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.0
0
Report
Advertisement
