Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर बारहवीं पेपर लीक केस में संचालक संदीप सरटकर गिरफ्तार
AKAMAR KANE
Mar 05, 2026 05:17:13
Nagpur, Maharashtra
नागपुरात झालेल्या १२ वी च्या पेपरफुटी प्रकरणात आधीच अटक असलेला संदीप सरटकर हाच सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे.. - संदीप सरटकर एका शिक्षण संस्थेचा संचालक असून तो आणखी एका अन्य शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत ही आहे.. त्याचाच फायदा घेत त्याने बारावीचे पेपर फोडल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.. - त्याच मालिकेत पोलिसांनी काल सरटकर शाळेत सीसीटीव्ही फुटेज तसेच डीव्हीआर जप्त केल्याची माहिती आहे... - त्यानेच पुढे खासगी शिकवणी संचालकाला पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे ही पोलيسांच्या हाती लागल्याची माहिती.. - सरटकरला पोलिसांकडून गेल्या शुक्रवारीच अटक झाली होती.. त्याने मोबाईलमधील डाटा डिलीट केला होता, मात्र सायबर तज्जणांची मदत घेऊन सध्या तपास सुरू आहे.. - त्याने आणखी काही जणांना पेपर पुरवले का? या अनुषंगाने त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ही सुरू आहे.. - १८ फेब्रुवारीला नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना पेपर फुटीचा प्रकार उघड झाला होता..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Mar 05, 2026 06:49:19
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून आधीच बसेसवर विविध प्रकारचे कर लावले जातात. यात भरीस भर म्हणून ई चलनाद्वारे अन्यायी व जुल्मी अशा प्रकारची दंड आकारणी केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथून प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत बससह मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.. 1) ई चलनाद्वारे आकारणेत आलेले आतापर्यंतचे सर्व दंड तात्काळ रदद् करणेत यावेत व नव्याने नियमावली तयार करावी. 2) जागोजागी फोटो काढून दंड आकारणे ताबडतोब बंद करावे. 3) 50 % आगाऊ दंड भरणेची सक्ती तात्काळ रदद् करावी. 4 ) दंड वसुलीचा महसुल केंद्रीत दृष्टीकोन तात्कálne थांबवावा. 5) रोड टॅक्स व टोल अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करणेत यावी. GRF Out Play Byte:- 1) सतीशचंद्र कांबळे, वाहनधारक 2) प्रदीप राठोड , वाहनधारक 3 अशोक शिंदे, वाहनधारक
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 06:47:50
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 05, 2026 06:47:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमच्या नगरसेवकांनी हातगाड्या उचलण्याच्या कारवाईला विरोध करून अडथळा निर्माण केला होता. त्यावरून १० नगरसेवक आणि ४ नातेवाइकांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, उपलब्ध पुराव्यावरून या नगरसेवकांविरोधात मनपा अधिनियम १० नुसार सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असून त्याबाबतच्या नोटिस काढण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता खुद्द मनपा आयुक्तांनी यावर भाष्य करत, कायदेशीर नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती स्वतः आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 05, 2026 06:45:48
Kalyan, Maharashtra:टिटवाळ्यात होळीचा राडा! ‘दारू पिऊन येऊ नका’ म्हटल्याचा बदला; सेक्रेटरी कुटुंबाला बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद,टिटवाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल टिटवळ्यातील नेप्च्यून स्वराज सोसायटी येथे ही घटना घडली. काही महिन्यांपूर्वी सोसायटीचे सेक्रेटरी सुरेश उपाध्याय यांनी काही तरुणांना दारू पिऊन सोसायटीत येऊ नका, अशी समज दिली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. या वादानंतर संकेत जाधव याने उपाध्याय यांच्या गाडीची काच फोडल्याची घटना घडली होती. होळीच्या दिवशी जुन्या वादाचा राग काढत संकेत जाधव, सुशांत जाधव आणि राहूल पाटील या तिघांनी उपाध्याय यांचा मुलगा अमन याला बोलावून घेतले आणि त्याच्यावर मारहाण सुरू केली यावेळी उपाध्याय आणि मित्र गुप्ताला देखील मारहाण केली या घटनेत गुप्ता यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अंतर्गत टिटवाळा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला असून तिघांचा शोध सुरु आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 05, 2026 06:18:21
Kalyan, Maharashtra:सालाबाद प्रमाणे यंदा देखील कल्याण शहरात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कल्याण मध्ये तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवसेना उबाठा आणि शिवसेना शिंदे गटाला शिवजयंती निमित्त मिरवणुकांची परवानगी देण्यात आली आहे मात्र दोन्ही मिरवणुकांच्या वेळा आणि मार्ग हे वेगवेगळे आहेत . हे दोन्ही गट समोरासमोर येऊ नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवला आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज डीसीपी अतुल झेंडे यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या बैठका घेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Mar 05, 2026 06:16:33
Wardha, Maharashtra:वर्ध्यात भाजप पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टर आणि आरोग्य सेवाकाला लाथाबुक्क्यानी जोरदार मारहाण वर्ध्याच्या तळेगावं येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील धक्कादायक घटना - रुग्णाला बरोबर उपचार न केल्याने मारहाण केल्याची माहिती - मध्यरात्री 12 वाजता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून आणि दार बंद करून मारहाण केल्याची DHO बेले यांची माहिती भाजप तालुकाद्यक्ष,अल्पसंख्यांक पदाधिकारी यांचा समावेश असल्याची माहिती राहुल बुले,अंकीता होले,सचिन होले,नवाज शेख मारहाण करणाऱ्यांची नावे डाँ. संकेत चंद्रशेखर रावेकर असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव - अश्लिल शब्दात शिवीगाळ करुन हाताबुक्यानी मारहाण केल्याची माहिती - वैद्यकीय अधिकाऱ्याला जिवे मारण्याची दिली धमकी - मारहाण करणाऱ्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 05, 2026 06:16:06
Shirdi, Maharashtra:शिर्डीच्या साईमंदिरालगत असणारी अनेक घरे आणि व्यावसायिक दुकाने यांचे अतिक्रमणे स्थानिकांनी自主ःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमणांचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नगरपालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे काढण्यासाठी 10 मार्च पर्यंतची मुदत दिलेली होती. त्यामुळे स्थानिकांनी ही अतिक्रमणे自主ःहून जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. एरवी गजबजलेला लक्ष्मी नगर परिसर त्यामुळे ओसाड पडल्याचं चित्र आहे.. प्रशासन नाशिक कुठलाही संघर्ष न करता नागरिक自主ःहून अतिक्रमणे खाली करत असले तरी या नागरिकांचे पुनर्वसन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. नागरिक अतिक्रमण काढत असलेल्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 05, 2026 05:03:47
Nagpur, Maharashtra:इजराइल, अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध सुरू झाल्यापासून Strait of Hormuz मधून मालवाहतूक जहाजांची येजा मर्यादित आणि धोक्याची झाली आहे.. त्यामुळे आखाती देशांना मध्यपूर्व आशिया मधील देशांना भारतातून विविध वस्तूंची आयात व निर्यात बाधित झाली आहे.. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देश आणि मध्य आशियासाठी कार्गो घेणेच बंद केले आहे... मात्र युरोपला पुरवठा करणाऱ्या काही मोजक्या शिपिंग कंपन्यांनी Gulf of Aden आणि Suiz Canal मार्गे सौदी अरब, जॉर्डन, तर पश्चिम आशिया मधील इजराइल, लेबनॉन, सीरिया या देशांसाठी War Risk Surcharge सह कार्गो (कंटेनर) घेणे सुरू ठेवले आहे.. परंतु नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत तब्बल सहा ते सात पट भाडा War Risk Surchargeच्या स्वरूपात दिला जात आहे... War Risk Surcharge काय? युद्धाच्या काळात सागरी जहाजांमधून कार्गोचे कंटेनर घेऊन आखाती देशांना आणि पश्चिम आशिया मधील देशांपर्यंत पुरवठा करण्यासाठी शिपिंग कंपनी जास्त भाडे घेते ते म्हणजे War Risk Surcharge... सध्या 20 फुटाच्या कंटेनर साठी 1800 डॉलर War Risk Surcharge घेतले जात आहे.. 40 फूट कंटेनर साठी 3800 डॉलर War Risk Surcharge घेतले जात आहे.. पूर्वी 20 फुटाच्या कंटेनरचा भाडा 250-300 डॉलर्स होता.. 40 फुटाचा भाडा 400-500 डॉलर्स होता... आताचे युद्धजन्य परिस्थितीत ते सहा ते सात पट वाढले आहेत... आखाती देशांमधील युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बहुतेक शिपिंग कंपन्यांनी तिकडे जाणे थांबवले आहे... Strait of Hormuz च्या खाडीमार्गे आयात-निर्यात बंद झाल्यानंतर काहीच अपवादात्मक शिपिंग कंपन्या Gulf of Aden आणि Suze Canal मार्गे मध्य आशिया आणि यूरोपकडे जाण्याचा पर्याय वापरत आहेत पण त्यांचा search charge प्रचंड आहे दरम्यान विदर्भातून स्टील ट्यूब, स्टील स्ट्रिप्स तसेच खाद्यपदार्थ आखाती देशांना निर्यात केले जातात.. तिथून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ आणि स्टीलचा स्क्रॅप भारतात आणला जातो... सध्या केंद्र सरकारकडे संपूर्ण देशासाठी 20 ते 25 दिवसांचा पेट्रोलियम पदार्थांचा स्टॉक आहे.. त्यामुळे युद्ध काही काळ लांबला तरी पेट्रोलियम पदार्थांची कमतरता होईल अशी स्थिती नाही.. शिवाय रशिया आणि वेनेजुएला कडून पेट्रोलियम पदार्थ घेण्याचे पर्याय उपलब्ध असल्याचे तज्ञांचे मत आहे... सध्या सगळ्या परिस्थितीबाबत तज्ञ शिवकुमार राव यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 05:03:02
Washim, Maharashtra:अँकर:एसटी बस तिकिटांमध्ये सवलत व कॅशलेस पेमेंटसाठी राज्य सरकारने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.हे कार्ड काढण्यासाठी वाशिमसह जिल्ह्यातील बसस्थानकांवर वयोवृद्ध पुरुष आणि महिलांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळे वयोवृद्धांना तात्काळ रांगांमध्ये व राहावं लागत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग सवलतीचा गैरवापर होत असल्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे.मात्र वृद्धांची गैरसळ टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही सुविधा अधिक सुलभ करून गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 05, 2026 04:19:31
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील सोशल मीडियावर हातामध्ये शस्त्र घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करण्याऱ्या आरोपींचा म्हसवड पोलिसांनी धिंड काढून कारवाई केली होती. यामध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश होता. यानंतर हे धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलाची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.यावेळी समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका मांडली. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेतो, असं आश्वासन दिलं आहे.आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 05, 2026 04:19:17
Pune, Maharashtra:Headline : बीज सोहळ्यानिमित्ताने देहूत फुलांची आकर्षक सजावट Anchor- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 378 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा आज देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात संत तुकाराम महाराजांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे. मुख्य मंदिरातील प्रवेशद्वाराजवळच हे संत तुकाराम महाराजांचे फुलांमध्ये चित्र रेखाटण्यात आले आहे. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.03)
0
comment0
Report
Advertisement
Back to top