Back
नागपुर कांग्रेस में आंतरिक कलह, वाडी के कई नेताओं ने पार्टी से इस्तीफा
AKAMAR KANE
Nov 20, 2025 10:54:05
Nagpur, Maharashtra
नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस मधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला आहे....वाडी मध्ये शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे दिलेय.. वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आणि पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्यांना विकल्याचा केला गंभीर आरोप.. काँग्रेस पक्षाच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी केली.नागपूर जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षात मोठी नाराजी दिसून येत आहे.. नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्याला काँग्रेस च्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्यामुळे वाडी मधील तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष यासह अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे पक्षाला पाठवले आहे... अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या पदावरून तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा त्याग करत असल्याचे जाहीर केले आहे... काँग्रेसच्या काही नेत्यांनी (सुनील केदार यांच्या गटातील नेत्यांनी) वाडी सह बुटीबोरी डिगडोह या ठिकाणी उमेदवारी देताना घोळ केले.. एबी फॉर्म आपल्याच पसंतीच्या किंवा आपल्याच गटातील लोकांना दिले.. तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातील लोकांना काँग्रेसची उमेदवारी बहाल केली.. त्यामुळे अनेक प्रामाणिक आणि अनेक दशकांपासून काँग्रेससाठी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप वाडीतील राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.. एवढेच नाही तर वाडीसह नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची उमेदवारी विकण्यात आल्याचा गंभीर आरोपही राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे...
181
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 20, 2025 12:49:4195
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 20, 2025 12:35:4083
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:32:08115
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:17:1477
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 12:04:45111
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 11:36:4289
Report
JMJAVED MULANI
FollowNov 20, 2025 11:19:59171
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 20, 2025 11:04:0272
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 11:01:02257
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 10:51:11124
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 10:50:1286
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 20, 2025 10:49:5394
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 10:46:1193
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 10:31:55169
Report