Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001
नागपुर में भारी अतिवृष्टि: दाढेरा के किसान कर्ज के बोझ तले दबे
AKAMAR KANE
Sept 30, 2025 06:15:11
Nagpur, Maharashtra
Ngp Farmer loss live u ने फीड पाठवले ------------- नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे... कळमेश्वर तालुक्यातील दाढेरा येथील शेतकरी संकटात सापडलेय... कपास,संत्र, भाजीपाला यांचं अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या नुकसान झाले आहे... एकीकडे शेती करता घेतलेले कर्ज आणि त्यानंतर झालेले अतिवृष्टी नुकसान यामुळे बळीराजा चिंतेत आहे.... ----- बाईट -- जनार्दन पाटील, नुकसान ग्रस्त
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MKManoj Kulkarni
Sept 30, 2025 08:05:29
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 30, 2025 08:05:21
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 3009ZT_BARAMATICITY FILE 4 सततचे होणारे अपघात रोखण्यासाठी बारामतीत नागरिकांचा आंदोलन.... अवजड वाहनांना दिवसा शहरातून कायमस्वरूपी बंदीची मागणी Anchor _ बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातांमुळे काहींचे मृत्यू देखील झाले आहेत. बारामती शहरातून दिवसा अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी यासोबतच अपघातास कारणीभूत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज बारामती प्रांताधिकारी कार्यालयावर स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढत आंदोलन केलं.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 30, 2025 07:48:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा तर उबाठाचा काँग्रेसच्या कावळ्यांचा - ज्योती वाघमारे (((( Facebook LIVE LINK )))) https://www.facebook.com/share/v/1FN4mXtyJD/ https://www.facebook.com/share/v/16Rph9g8FH/ ज्योती वाघमारे, शिवसेना प्रवक्ता --- शिवसैनिकसाठी दसरा मेळावा हा पंढरपूर वारीसारखा अतिवृष्टी झाली त्यामुळेच मोठं नुकसान झालं आहे पण तरीही स्फूरण घेण्यासाठी शिवसैनिक मुंबईला येतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खालची शिवसेना ही खरी शिवसेना संपत्तीचे वारसदार खूप असतील पण विचाराचे वारसदार वकनाथ शिंदे आमचा दसरा मेळावा हा मावळयचा तर उबाठाचा काँग्रेसच्या कावळ्यांचा दसरा मेळाव्यात विचार मांडले जायचे पण उबाठाचा मेळावा म्हणजे पीजे मारतात त्यामुळे त्यांनी हसरा मेळावा साजरा करावा मनसेचे नेते म्हणतात मुंबईचा महापौर हा मनसेचे होईल तेव्हा राऊत काहीही बोलले नाही भाऊ एकत्रित येतायत ठिक आहे पण ते वेगळे का झालं यावर राऊत बोलत नाही राऊत यांची गाडी का फोडली होती? संजय राऊत यांनी त्यांचा मेळावा दिल्लीला घ्यावा त्यांचे हायकामंड दिल्लीमध्ये आहेत एका विमानात बसतील एवढंच लोकं राहलेले आहे त्यांनी सोनिया गांधीच्या अंगणात जाऊन मेळावा घ्यावा उबाठाच्या मेळावा मुसा का कोण तो अंतःकवादी होता तो प्रवक्ता आहे त्याला बोलवणार का? उद्या दाऊदला ही बोलावतील धर्माच्या आधारावर मतं राजकारण करण्याशिवाय ओविसी यांन काय केलं? पूर बाधित क्षेत्रात अत्यंत वाईट अवस्था आहेत महिला माझ्या गळ्यात पडून रडतायत बँकेचा नोटीस येतं असतील तर त्या बंद झाल्या पाहिजे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना या बाबतीत सांगून ही सुलतानी वसुली थांबवा पूरग्रस्त भागात गेल्यानंतर लोकांच्या व्यथा ऐकून मी व्यथित झाले मी राजकीय नेता नसते सामान्य असते तरी तेच केलं असतं मी अशा ट्रोलिंग ला भीक घालत नाही आम्ही मान्य करतो जिल्हाधिकारी हुशार आहेत पण त्यांनी संवेदनशील पणे वागावं प्रशासनावर दबाव आहे मान्य आहे पण आम्ही सामान्य लोकांचे प्रश्न मांडतोय जर असं करताना अनेक वेळा टीका झाली तरी मला फरक पडतं नाही ऑन ओविसी नगर सभा --- महाराष्ट्र अतिवृष्टीशी झुंजतोय, पुरामुळे उध्वस्त झालेत अहिल्यानगरमध्ये त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषण करू नये आधीच अस्मानी संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्रला ह्या सभेनंतर काही झालं तर परवडणारे नाही त्यामुळे राजकीय नेत्यांकडून संवेदनशील पणे वागण्याची अपेक्षा करतोय LIVE LINK
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 30, 2025 07:47:58
Yeola, Maharashtra: अँकर:- भारतभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील दसऱ्याच्या घोडे बाजाराची साडेतीनशे वर्षांची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील आवारामध्ये देशातल्या विविध राज्यातून अश्वांची खरेदी विक्री करण्यासाठी देशाच्या विविध राज्यातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत. 25 हजार ते 7 लाख रुपये अशी अश्वांच्या प्रजातीनुसार या बाजारात बोली लावली गेली असून कोट्यावधी रुपयांची उलाढाल येवल्याच्या प्रसिद्ध अश्व बाजारात पाहायला मिळाली .राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज शाहू शिंदे व अविनाश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या अश्व बाजाराला सुरुवात करण्यात आली. पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आधी राज्यातून हजारोंच्या संख्येने अश्व व्यावसायिक व अश्वप्रेमी येवल्याच्या बाजारात दाखल झाले बाईट 1:-शाहू शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज, बाईट 2:-अविनाश शिंदे, राजे रघुजी बाबा शिंदे यांचे वंशज, बाईट 3-सम्राट जाधव, अश्वप्रेमी बाईट 4 :-रोहित डोंगरे, अश्वप्रेमी, P2C:-सुदर्शन खिल्लारे, झी 24 प्रतिनिधी, नाशिक ग्रामीण
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 30, 2025 07:47:36
Raigad, Maharashtra:स्लग - आरक्षण बचावसाठी कोळी, आदिवासी बांधवांचा एल्‍गार ........ जिल्‍हाधिकारी कार्यालयावर धडक ......... बंजारा , धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश नको .... आंदोलकांची मागणी ........ अँकर - रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाचा आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला आहे. राज्‍यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्‍या आरक्षणात हक्‍क सांगण्‍यास सुरूवात केली आहे. त्‍यामुळे रायगड जिल्‍ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. या मागणीला विरोध करण्‍यासाठी आज अलिबाग येथील रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चात समाज बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी, आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला आहे. आपल्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 30, 2025 07:35:29
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_TUSHAR_BJP चार फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 अखेर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांचा निलंबन मागे; भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी अँकर :– अमरावती महानगरपालिकेचे सभागृह नेते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती त्यामुळे भाजप विरोधात बंडखोरी केल्याने भाजपाने तुषार भारतीय यांना निलंबित केलं होत मात्र आज भारतीय यांचा निलंबन मागे घेत मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा तुषार भारतीय यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून भाजपने केलं निलंबन रद्द केलं आहे. तुषार भारतीय हे भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू असून ते पुन्हा भाजपमध्ये परतल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीत काय करिष्मा दाखवतात याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 30, 2025 07:30:20
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहिलेला बोर्ड काढायला लावला FTP slug -nm airport bord issue shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मनपा मुख्यालया जवळील उड्डाणं पुलावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लागणारा बोर्ड प्रकल्पग्रस्थानी काढायला लावला,दि बा पाटील यांच्या नावाची घोषणा झाली नसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नावं कसे देता म्हणत लावलेला बोर्ड भूमीपुत्रांनी काढायला लावला,सिबिडी बेलापूर पोलीसांनी यावेळी ताब्यात घेतले,दि बा पाटील यांच्या नावा शिवाय कोणताही बोर्ड लावू देणार नाही यावर भूमिपुत्र आक्रमक आणि ठाम असून, येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन होण्याची शक्यता असून यादृष्टीने प्रशासन तयारी करताना पाहायला मिळतेय. gf- ----------–---/-////////////
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 30, 2025 07:18:39
Washim, Maharashtra:वाशिम: File:3009ZT_WSM_COTTON_CROPS_DAMAGE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर: वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः कपाशी पिकावर मोठा परिणाम झाला असून,हजारो एकर क्षेत्र अतिपावसामुळं बाधित झालं आहे.अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने झाडांची वाढ खुंटली असून, कापसाच्या बोंडांना कुज येण्यास सुरुवात झाली आहे.कर्ज काढून उभी केलेली पिके डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हातबल झाले आधीच सोयाबीन पिकाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलेला असताना आता कपाशीतील नुकसानामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे.यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नाचे गणित पूर्णपणे कोलमडले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणार नसल्याने रब्बीची पेरणी कशी करायची व वर्षभर संसाराचा गाडा हाकायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 30, 2025 07:18:15
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 30, 2025 07:05:41
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 3009ZT_CHP_PYTHON ( single file sent on 2C)   टायटल -चंद्रपूर शहरातील धवल कॉलनीत कोंबडीच्या बांबू टोपल्यात 6 फूट लांबीचा अजगर, सर्पमित्रांनी पकडून केले निसर्गमुक्त  अँकर - चंद्रपूर शहरातील धवल कॉलनी मागे, आंबेडकर सभागृहाजवळ पहाटे धक्कादायक घटना उजेडात आली. अर्जुन सुखदेवे यांच्या घरी असलेल्या कोंबडीच्या बांबूच्या टोपल्यात तब्बल 6 फुट लांबीचा अजगर शिरल्याचे समोर आले.पहाटे 3 वाजताच्या सुमारास कोंबड्यांच्या आरडाओरड ऐकून सुखदेवे जागे झाले. कोंबड्या टोपल्यातून बाहेर पळाल्याने त्यांनी आत पाहिले असता मोठा अजगर दिसला. तात्काळ सर्पमित्र आणि हॅबिटॅट कंझरवेशन सोसायटी चे अमित देशमुख यांना कळविण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी अजगराला शिताफीने पकडत सुरक्षितपणे निसर्गमुक्त केले. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 30, 2025 07:01:52
Navi Mumbai, Maharashtra:story slug - नवी मुंबई पोलिसांनी केली 15 मुलींची सुटका नवी मुंबई पुलीस ने की 15 महिला FTP slug - nm massage parlour crime shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १५ महिलांची सुटका करण्यात आली असून या रॅकेटचा मास्टरमाइंड स्पा मालक व त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरु आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद् भारंबे यांनी अनैतिक व्यापार व अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाली की, सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील "मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा" मध्ये सहा हजार रुपयांच्या मोबदल्यात महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. ही माहिती पक्की झाल्यानंतर घोरपडे यांनी बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवला. त्याच्या इशाऱ्यावर शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी १५ महिला मिळून आल्या. चौकशीत उघड झाले की स्पाचा मालक व सफाई कामगार या महिलांना मसाजच्या नावाखाली आणून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडत होते. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये २ महिला थाई लेंडमधील, १ नेपाळची, २ दिल्लीतील, २ उत्तर प्रदेशातील, १ पश्चिम बंगालची, १ गुजरातची आणि ६ महाराष्ट्रातील आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीडी पोलीस करत आहेत. gf - ----------------------
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 30, 2025 07:01:40
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 3009ZT_CHP_SMALLEST_WOMAN ( single file sent on 2C) टायटल :---चंद्रपूरच्या ज्ञानेश्वरी  दुणेदारचे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव, उंची आहे केवळ 2 फूट 3 इंच अँकर:--चंद्रपूर जिल्ह्याची कन्या ज्ञानेश्वरी दुणेदार हिने जागतिक स्तरावर नवा इतिहास रचला आहे. फक्त 2 फूट 3 इंच फूट उंचीची असलेल्या ज्ञानेश्वरीचे नाव International Book of Records मध्ये Smallest Woman in the World म्हणून नोंदविण्यात आले आहे. ही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या नोंदीमागे अलंकार सावळकर आणि योगेश गोखरे यांचे विशेष प्रयत्न राहिले. त्यांच्या पुढाकारातून ज्ञानेश्वरीचे नाव अधिकृतपणे या जागतिक विक्रमात नोंदविण्यात आले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीला सन्मानित करण्यात आले. बाईट 1) ज्ञानेश्वरी दुणेदार बाईट 2) योगेश गोखरे, विक्रम नोंदीसाठी मदत करणारे चंद्रपूरकर            आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 30, 2025 07:00:39
Mumbai, Maharashtra:अँकर -- २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा "दसरा मेळावा” आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळाव्या निमित्त शिवाजी पार्क येथे  महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून वेगवेगळया वाहनांतून अनेकजण मोठ्या प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम व पुर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची तसेच कार्यक्रम स्थळी जाण्याच्या मार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थापना मध्ये  बदल करण्यात आले आहेत.मुंबई पोलिस वाहतूक विभागाने   ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.०० ते रात्री अकरा वाजेपर्यंत वाहतूक बदल केले आहेत. ग्राफिक अ) वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्तेः- १. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बैंक सिग्नल) २. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर. ३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर. ४.पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर ५.दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर. ६.दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर. एन सी केळकरमार्ग (हनमान मंदिर ते गडकरी चौक), दादर ब) वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग:- १. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन) पर्यायी मार्ग : सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज वर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा. २. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत. पर्यायी मार्ग : एल. जे. रोड, गोखले रोड स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोड चा वापर करतील. ३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी. पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा. ४.गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर. पर्यायी मार्ग : एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा. आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणारे मार्ग :- १. बाळगोविंद दास मार्ग, पद्‌माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोड पासुन पश्चिम दिशेला एल.जे. मार्गापर्यंत. पर्यायी मार्ग:- मनोरमा नगरकर मार्गाचा वापर करतील. २.दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळा येथुन गडकरी जंक्शनपर्यंत. पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड, रानडे रोडचा वापर करतील. असे आदेश डॉ. दिपाली धाटे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) वाहतूक, मुंबई.यांनी काढले आहेत. मनोज कुळकर्णी  Use file vdo 
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 30, 2025 07:00:31
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- MIM असदुद्दीन ओवेसी सभा परवानगी फीड 2C Anc:- MIM खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या अहिल्यानगर येथील सभेला परवानगी देण्यात आली आहे परवानगी देत असताना पोलिसांकडून अटी आणि शर्ती असलेली एक नोटीस देखील देण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे सभा आयोजित केलेली आहे काल नगर शहरात घडलेल्या प्रकारानंतर या सभेबाबत परवानगी मिळते की नाही असा समोरून होता मात्र पोलिसांनी या सभेला परवानगी दिली असून सभेमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चितावणीखोर वक्तव्य करू नये आवाजाची मर्यादा पाळावी अशा अटी शर्ती घालत सभेला परवानगी दिली आहे बाईट:- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 30, 2025 07:00:15
Washim, Maharashtra:वाशिम: File:3009ZT_WSM_VEGETABLE_PRICES_UP रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बाजारातील आवक लक्षणीयरीत्या घटली आहे.टमाटरसह शेवगा, वांगी, गोभी, दोडके, कोथिंबीर आदी पिकांवर याचा मोठा परिणाम झाला असून, टमाटराच्या दरात तब्बल दुप्पट वाढ झाली आहे.मागील आठवड्यापर्यंत टमाटर ४० रुपये किलो दराने मिळत होता.मात्र,आवक कमी झाल्याने सध्या त्याचा दर ८० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.केवळ टमाटरच नव्हे, तर इतर भाजीपाल्यांच्या किमतींमध्येही सरासरी ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत असला, तरी व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मात्र या परिस्थितीचा थेट परिणाम झाला असून, विक्रीत घट जाणवू लागली आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top