Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
RTE कानून के सही क्रियान्वयन के लिए जनहित याचिका कोल्हापुर अदालत में दाखिल
PNPratap Naik1
Mar 05, 2026 04:05:45
Kolhapur, Maharashtra
शिक्षण हक्क कायदा अर्थात RTE ची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचा आक्षेप नोंदवणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये दाखल करण्यात आली आहे. ही याचिका निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलावडे, निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने यांनी दाखल केली आहे. या याचिकेत संदर्भात सर्किट बेंचने राज्य सरकारच्या संबंधित विभागाने दोन एप्रिल पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती माधव जमादार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या डिव्हिजनल बेंचने हे आदेश दिले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार पूर्वी तीन किलोमीटरच्या परिघातील शाळांचा समावेश होता, पण आता हा परिघ एक किलोमीटरचा केल्याने या कायद्याचा उद्देश सफल होत नसल्याची तक्रार अनेकांची आहे. त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचा देखील 151 पानी जनहित याचिकेत मांडले आहे. याचिकेत नेमके कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यावर एक नजर टाकूया. अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही, ती व्हावी. शिक्षण हक्क कायद्यातून राज्यातील कोणतीही शाळा बंद करू नये. आरटीई 25% आरक्षणाची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी. आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांचे शुल्क पालकांकडून आकारले जाऊ नये. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशा मुद्द्यांचा समावेश या जनहित याचिकेत करण्यात आले आहेत. या मुद्द्यांचा विचार करून सर्किट बेंचने राज्य शासन, विधी व न्याय विभाग, शालेय शिक्षण खाते, शिक्षण मंत्री, बालक संरक्षण विभागाचे केंद्रीय आयुक्त, राज्य आयुक्त, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ स्टेट कौन्सील ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेिनिंग, ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने कोणती पावले उचलली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश दिले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 05, 2026 05:17:13
Nagpur, Maharashtra:नागपुरात झालेल्या १२ वी च्या पेपरफुटी प्रकरणात आधीच अटक असलेला संदीप सरटकर हाच सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती आहे.. - संदीप सरटकर एका शिक्षण संस्थेचा संचालक असून तो आणखी एका अन्य शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत ही आहे.. त्याचाच फायदा घेत त्याने बारावीचे पेपर फोडल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे.. - त्याच मालिकेत पोलिसांनी काल सरटकर शाळेत सीसीटीव्ही फुटेज तसेच डीव्हीआर जप्त केल्याची माहिती आहे... - त्यानेच पुढे खासगी शिकवणी संचालकाला पेपर पुरवल्याचे डिजिटल पुरावे ही पोलيسांच्या हाती लागल्याची माहिती.. - सरटकरला पोलिसांकडून गेल्या शुक्रवारीच अटक झाली होती.. त्याने मोबाईलमधील डाटा डिलीट केला होता, मात्र सायबर तज्जणांची मदत घेऊन सध्या तपास सुरू आहे.. - त्याने आणखी काही जणांना पेपर पुरवले का? या अनुषंगाने त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी ही सुरू आहे.. - १८ फेब्रुवारीला नागपूरच्या सेंट उर्सुला शाळेतील परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्राचा पेपर सुरू असताना पेपर फुटीचा प्रकार उघड झाला होता..
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 05, 2026 05:03:47
Nagpur, Maharashtra:इजराइल, अमेरिका विरुद्ध इराण हे युद्ध सुरू झाल्यापासून Strait of Hormuz मधून मालवाहतूक जहाजांची येजा मर्यादित आणि धोक्याची झाली आहे.. त्यामुळे आखाती देशांना मध्यपूर्व आशिया मधील देशांना भारतातून विविध वस्तूंची आयात व निर्यात बाधित झाली आहे.. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देश आणि मध्य आशियासाठी कार्गो घेणेच बंद केले आहे... मात्र युरोपला पुरवठा करणाऱ्या काही मोजक्या शिपिंग कंपन्यांनी Gulf of Aden आणि Suiz Canal मार्गे सौदी अरब, जॉर्डन, तर पश्चिम आशिया मधील इजराइल, लेबनॉन, सीरिया या देशांसाठी War Risk Surcharge सह कार्गो (कंटेनर) घेणे सुरू ठेवले आहे.. परंतु नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत तब्बल सहा ते सात पट भाडा War Risk Surchargeच्या स्वरूपात दिला जात आहे... War Risk Surcharge काय? युद्धाच्या काळात सागरी जहाजांमधून कार्गोचे कंटेनर घेऊन आखाती देशांना आणि पश्चिम आशिया मधील देशांपर्यंत पुरवठा करण्यासाठी शिपिंग कंपनी जास्त भाडे घेते ते म्हणजे War Risk Surcharge... सध्या 20 फुटाच्या कंटेनर साठी 1800 डॉलर War Risk Surcharge घेतले जात आहे.. 40 फूट कंटेनर साठी 3800 डॉलर War Risk Surcharge घेतले जात आहे.. पूर्वी 20 फुटाच्या कंटेनरचा भाडा 250-300 डॉलर्स होता.. 40 फुटाचा भाडा 400-500 डॉलर्स होता... आताचे युद्धजन्य परिस्थितीत ते सहा ते सात पट वाढले आहेत... आखाती देशांमधील युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बहुतेक शिपिंग कंपन्यांनी तिकडे जाणे थांबवले आहे... Strait of Hormuz च्या खाडीमार्गे आयात-निर्यात बंद झाल्यानंतर काहीच अपवादात्मक शिपिंग कंपन्या Gulf of Aden आणि Suze Canal मार्गे मध्य आशिया आणि यूरोपकडे जाण्याचा पर्याय वापरत आहेत पण त्यांचा search charge प्रचंड आहे दरम्यान विदर्भातून स्टील ट्यूब, स्टील स्ट्रिप्स तसेच खाद्यपदार्थ आखाती देशांना निर्यात केले जातात.. तिथून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम पदार्थ आणि स्टीलचा स्क्रॅप भारतात आणला जातो... सध्या केंद्र सरकारकडे संपूर्ण देशासाठी 20 ते 25 दिवसांचा पेट्रोलियम पदार्थांचा स्टॉक आहे.. त्यामुळे युद्ध काही काळ लांबला तरी पेट्रोलियम पदार्थांची कमतरता होईल अशी स्थिती नाही.. शिवाय रशिया आणि वेनेजुएला कडून पेट्रोलियम पदार्थ घेण्याचे पर्याय उपलब्ध असल्याचे तज्ञांचे मत आहे... सध्या सगळ्या परिस्थितीबाबत तज्ञ शिवकुमार राव यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 05:03:02
Washim, Maharashtra:अँकर:एसटी बस तिकिटांमध्ये सवलत व कॅशलेस पेमेंटसाठी राज्य सरकारने NCMC स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.हे कार्ड काढण्यासाठी वाशिमसह जिल्ह्यातील बसस्थानकांवर वयोवृद्ध पुरुष आणि महिलांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळे वयोवृद्धांना तात्काळ रांगांमध्ये व राहावं लागत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग सवलतीचा गैरवापर होत असल्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी ही स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे.मात्र वृद्धांची गैरसळ टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून ही सुविधा अधिक सुलभ करून गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 05, 2026 04:19:31
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील सोशल मीडियावर हातामध्ये शस्त्र घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करण्याऱ्या आरोपींचा म्हसवड पोलिसांनी धिंड काढून कारवाई केली होती. यामध्ये एका अल्पवयीन युवकाचा समावेश होता. यानंतर हे धिंड प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अल्पवयीन मुलाची कथित धिंड काढल्याच्या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.यावेळी समाजकार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, “अल्पवयीन मुलांचा सन्मान धुळीस मिळवणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका मांडली. कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल उद्यापर्यंत मागवून घेतो, असं आश्वासन दिलं आहे.आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेतं, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
0
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 05, 2026 04:19:17
Pune, Maharashtra:Headline : बीज सोहळ्यानिमित्ताने देहूत फुलांची आकर्षक सजावट Anchor- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 378 वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजेच बीजसोहळा आज देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहू मधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहू मधील मंदिरात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात संत तुकाराम महाराजांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे. मुख्य मंदिरातील प्रवेशद्वाराजवळच हे संत तुकाराम महाराजांचे फुलांमध्ये चित्र रेखाटण्यात आले आहे. याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.03)
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 05, 2026 04:06:06
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 05, 2026 04:01:16
Amravati, Maharashtra:रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 वेळ पडल्यास आम्ही वनमंत्र्यांच्या घरावर डेरा टाकू; मेळघाट संघर्ष यात्रेतून बच्चू कडूंचा इशारा अँकर :- आदिवासींच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष पुढे आणण्यासाठी बच्चू कडूंनी गेल्या एक तारखेपासून मेळघाट संघर्ष यात्रा सुरू केली आहे. यामध्ये वनविभागाच्या जाचक अटींमुळे मेळघाटचा विकास होत नसल्याने बच्चू कडूंनी मेळघाटातील वनविभागाच्या कार्यालयाला घेतलं होते त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बच्चू कडूंशी चर्चा केली आणि अखेर रात्री उशिरा हे डेरा आंदोलन सोडण्यात आल मात्र यावेळी बच्चू कडू यांनी वनमंत्र्यांना इशारा देत वेळ पडल्यास वनमंत्र्यांच्या घरावर डेरा टाकू असं म्हटलं आहे. त्यामुळे वनविभाग आणि बच्चू कडू हा संघर्ष सुरू राहणार आहे. बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 05, 2026 03:45:32
Beed, Maharashtra:GST अधिकारी सचिन जाधवर यांनी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून जानेवारी महिन्यात आत्महत्या केली होती. याप्रकरणी फरार असलेला अधिकारी आरोपी प्रदीप फाटे याला बीड स्थानिक गुन्हे शाखेनी चाळीस दिवसानंतर पुण्यातून अटक केली. आरोपी प्रदीप फाटे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चाळीस दिवसात आरोपी फाटे याला पळून जाण्यास कोणी मदत केली. त्याचे यादरम्यान कोणाचे संपर्क होते. या सर्व बाबी पुढे आल्या पाहिजे. शिवाय सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात आणखीन किती जणांचा हात आहे या सर्व गोष्टींचा उकल झाला पाहिजे. त्यामुळेच आरोपी प्रदीप फाटे याची नार्को चाचणी करा अशी मागणी मयत सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 03:32:04
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी मधील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलिसासोबत निघालेल्या एका सराईत गुन्हेगारावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार. गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी जखमी ओंकार कांबळे आणि संशयित हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी (रा. इचलकरंजी) यांच्यात प्रेमप्रकरणातून गंभीर मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ओंकार कांबळे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ते जामिनावर सुटले होते. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ओंकार कांबळे याला बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे साथीदार आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकारला समजली. त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी जगदीश पाटील यांना पुन्हा ओंकारसोबत जाण्यास सांगण्यात आले. ओंकार कांबळे हा पोलिसासह दुचाकीवरून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडला. काही अंतरावर असलेल्या सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानाजवळ ते आले असता मागून दुचाकीवरून आलेल्या संशयित प्रमुख आरोपी अनुराग सूर्यवंशीने अचानक ओंकारवर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ही गोळी ओंकारच्या उजव्या बरगडीत घुसली. यावेळी ओंकार हा दुचाकी चालवत असल्याने आणि त्याला गोळी लागल्याने ओंकार आणि त्याच्यासोबत असलेले पोलिस पाटील हे दुचाकीसह खाली कोसळले. प्रसंगावधान राखत पोलिस जगदीश पाटील यांनी जखमी ओंकार याला जवळील पशुखाद्य दुकानात नेऊन दुकानाचे शटर खाली केले. दरम्यान, गोळीबार करून संशयित सूर्यवंशी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. यानंतर जखमी ओंकार कांबळे याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तपासासाठी काही काळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुशांत चव्हाण उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी इचलकरंजी शहरात पिस्तूल आढळल्याच्या घटना घडल्या असल्या तरी प्रत्यक्ष गोळीबाराची घटना पहिलीच असल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्यामुळे या घटनेने कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 05, 2026 03:31:35
Bhandara, Maharashtra:राष्ट्रीय महामार्गावर मानेगाव ते पिंपळगाव दरम्यान संदीप पेट्रोल पंप मानेगाव समोर युवकाचा दुचाकीने गंभीर अपघात...कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा मुळे अपघात झाल्याचा अंदाज.. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामाग्र मानेगाव सडक येथे उडान पुलाचे काम सुरू असल्याकारणाने रस्त्यावरील वाहतूक ही वळवली आहे. तिथेच चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी डिव्हायडरला आढळली. आणि घटनास्थळी तो निश्चित पडला. रुग्णवाहिकेने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.सध्या अपघातग्रस्त तरुणाची प्रकृती स्थिर आहे.मात्र या अपघातामुळे या ब्रीज चे काम करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्न निर्माण होत आहे.रस्ता वळविला आहे त्या ठिकाणी कोणतेही सुरक्षारक्षक अथवा सूचना दिलेल्या नाहीत.त्यामुळे या कंत्राटदारावर कार्यवाही व्हावी अशी स्थानिक मागणी करत आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top