Back
इचलकरंजी गोलीबारी: आरोपी ने पुलिसकर्मी पर गोली चलाई, हालत गंभीर
PNPratap Naik1
Mar 05, 2026 03:32:04
Kolhapur, Maharashtra
इचलकरंजी मधील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलिसासोबत निघालेल्या एका सराईत गुन्हेगारावर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार. गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी जखमी ओंकार कांबळे आणि संशयित हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी (रा. इचलकरंजी) यांच्यात प्रेमप्रकरणातून गंभीर मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ओंकार कांबळे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ते जामिनावर सुटले होते. दरम्यान, प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ओंकार कांबळे याला बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे साथीदार आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकारला समजली. त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी जगदीश पाटील यांना पुन्हा ओंकारसोबत जाण्यास सांगण्यात आले. ओंकार कांबळे हा पोलिसासह दुचाकीवरून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडला. काही अंतरावर असलेल्या सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानाजवळ ते आले असता मागून दुचाकीवरून आलेल्या संशयित प्रमुख आरोपी अनुराग सूर्यवंशीने अचानक ओंकारवर रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ही गोळी ओंकारच्या उजव्या बरगडीत घुसली. यावेळी ओंकार हा दुचाकी चालवत असल्याने आणि त्याला गोळी लागल्याने ओंकार आणि त्याच्यासोबत असलेले पोलिस पाटील हे दुचाकीसह खाली कोसळले. प्रसंगावधान राखत पोलिस जगदीश पाटील यांनी जखमी ओंकार याला जवळील पशुखाद्य दुकानात नेऊन दुकानाचे शटर खाली केले. दरम्यान, गोळीबार करून संशयित सूर्यवंशी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. यानंतर जखमी ओंकार कांबळे याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक पथक, श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. तपासासाठी काही काळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सुशांत चव्हाण उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी इचलकरंजी शहरात पिस्तूल आढळल्याच्या घटना घडल्या असल्या तरी प्रत्यक्ष गोळीबाराची घटना पहिलीच असल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्यामुळे या घटनेने कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 05:03:470
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 05:03:020
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 04:19:310
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 05, 2026 04:19:170
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:19:050
Report
KPKAILAS PURI
FollowMar 05, 2026 04:17:080
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 05, 2026 04:06:060
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:05:450
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 04:02:190
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 05, 2026 04:01:160
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 04:00:100
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:45:320
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 05, 2026 03:31:350
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 05, 2026 03:31:210
Report