Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
10 लाख मांगने पर सासरे के दबाव से कुरुंदवाड़ की पत्नी ने आत्महत्या
PNPratap Naik1
Nov 24, 2025 02:17:03
Kolhapur, Maharashtra
निवडणुकीसाठी आणि पतीच्या व्यवसायाकरता सासऱ्याने दहा लाख मागितल्याने सुनेची आत्महत्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मधील धक्कादायक घटना कौसर गरगरे असं सुनेचे नाव. आत्महत्येला प्रवृत्ती केल्याप्रकरणी सासरा, सासु, पती आणि जाऊ विरोधात गुन्हा दाखल. पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८, दोघेही रा. कुरुंदवाड) यांना अटक. सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना अद्याप अटक नाही. माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका आल्याने महिलेच्या भावाने कुरुंदवाड पोलिसात दिली तक्रार. पतीच्या व्यवसायाकरिता व सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असा तक्रारीत उल्लेख
109
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
Nov 24, 2025 02:32:07
83
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 02:31:27
Kolhapur, Maharashtra:याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याचा कोल्हापूर पोलीस तपास करत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेच्या उमेदवाराकडून मूळ कागदपत्रे आणि काही रक्कम घेऊन परीक्षापूर्वी पेपर मिळवून देतो असं सांगणारी टोळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि राधानगरीत कार्यरत होती. आरोपी दत्तात्रेय चव्हाण आणि गुरुनाथ चौगुले हे दोघे परीक्षेच्या अगोदर रात्री विद्यार्थ्यांना TET पेपरचे छायांकित परत देत होते. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अगोदर विद्यार्थी उमेदवारांना तीन लाख रुपये देऊन पेपरची छायांकित प्रत दिली जाणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील सोनगे इथं छापा टाकून TET पेपर फोडणाऱ्या आरोपींना जेर बंद केले. आरोपींना अटक करतेवेळी त्या ठिकाणी विद्यार्थी असल्याचे देखील समोर आल, पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांची नावे असलेली पदवीची कागदपत्रे, कोरे धनादेश चेक, प्रिंटर व इतर साहित्य देखील जप्त केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून सातारा जिल्ह्यातील महेश भगवान गायकवाड हा TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात समोर आल आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे.
27
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 24, 2025 02:31:10
Bhandara, Maharashtra:नाना भाऊ आता भूमिपूजनाचा वाढदिवस साजरा करायचा काय? संतप्त नागरिकांचा माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना सवाल!..... Anchor : माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व साकोली विधानसभेचे विद्यमान आमदार नाना पटोले हे भूमिपूजनच करून ठेवतात! रस्त्याच्या भूमिपूजनाला वर्ष पूर्ती होत आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी थेट नाना पटोले यांना प्रश्न केला आहे.' आता नाना भाऊ भूमिपूजनाचा वाढदिवस साजरा करायचा काय?. Vo :- साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यातील पेंढरी ते किटाडी हा ९ किमी चा रस्ता पूर्णतः उखडलेला आहे.परिसर जंगलव्याप्त आहे त्यामुळे या मार्गावर अनेकदा हिंस्र प्राण्याचा वावर असतो.हे मार्ग १०ते १५ गावातील नागरिकांना तालुका व जिल्हा ठिकाणी जोडणारे एकमेव मार्ग आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची मागणी होत होती.यासाठी काँग्रेस चे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी ५ डिसेंबर २०२४ ला थाटात भूमिपूजनही केले. रस्त्याच्या दर्शनीय भागात भूमिपूजनाचे मोठे फलक लावण्यात आले.त्यामुळे आता आपल्याला चांगला रस्ता मिळेल या आशेने नागरिकही खुश झाले , मात्र आता भूमिपूजनाची वर्ष पूर्ती होत आहे.अद्याप कुठेही काम सुरू झाले नाही.काही ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे विभागाचे म्हणणे आहे .मात्र त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून थेट आमदार नाना पटोले यांना आता या भूमिपूजनाचा वाढदिवस साजर करायचा काय अशा प्रश्न करत आहेत. BYTE :- फुलचंद नागलावडे, ग्रामस्थ BYTE :- ताराचंद घोरपडे, ग्रामस्थ Vo :- 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार नाना पटोले यांनी निवडून आल्यावर अवघ्या 12 दिवसांनी या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेत 5 डिसेंबर 2024 ला भूमिपूजन केले होते.त्यामुळे त्याचा या आमदारकीच्या काळातील पहिला भूमिपूजन म्हणता येईल मात्र निवडून आल्यावर पहिलेच केलेले भूमिपूजनाचे काम अद्याप सुरू झाले नाही . त्यामुळे नागरिकांडून विकासकामांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.या संबंधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी यांना विचारणा केली असता रस्त्यावरील काही भागातील झाडे तोडण्याचे काम झाल्याचे त्यांनी सांगितलं व लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले.मात्र भूमिपूजनाला वर्ष पूर्ण होत असून काम सुरू झाले नाही ही बाब गंभीर आहे.
63
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 24, 2025 01:45:45
Pune, Maharashtra:शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंवर का नाराज होत्या? त्या शिवसेनेत येणार होत्या? त्या दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंना का भेटल्या? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंतांनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत बोलताना उपस्थित केला होता या सर्व प्रश्नांचा सुषमा अंधारे यांनी खुलासा केला आहे. नरेश म्हस्के यांची मी भेट घेतली नाही, तर ती योगायोगाने झाली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे...मी माझ्या कामानिमित्त दिल्लीत गेले असता, महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमध्ये चहा घेत होते त्यावेळी नरेश म्हस्के तेथे आले... जर माझ्यासमोर कोणी येऊन चहा घेऊ केला असेल तर इतकी संस्कृती आपली आहे की, चहा पिऊ म्हणा असं स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिल आहे... एका सहज स्वभाविक भेटीला उदय सामान्यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला... याचा अर्थ उदय सामंत यांच्या वर्मी घाव लागल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे... मी उदय सामंतांचेच उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का? कारण उदय सामंत हे शिवसेनेचा एक गट भाजपमध्ये विलीन करण्यासाठी अतिशय उत्सुक झाले असल्याचं मला वाटायला लागलं असल्याच सुषमा अंधारे यांनी म्हटल आहे... तर तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला बहीण म्हणून मला बोलवा मला नक्की यायला आवडेल असा उपरोधिक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
168
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:36
Baramati, Maharashtra:इंदापूरचा खडकपुरा येथून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉइंटर खडकपुरा प्रचार सभा ही निवडणूक शहराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे 2014 साली तुम्ही मला आमदार केले गेली 11 वर्ष या इंदापूर शहरात विकासाचा निधी कसा जास्त आणता येईल यासाठी मी प्रयत्न केला. येणाऱ्या माणसाची कामे हेलपाटे न मारता मार्गी लावली. 2014 पूर्वी इंदापूर शहर काय होतं आज ते बदलले की नाही जर इंदापूर शहर बदलले असले तरच तुम्ही घड्याळाला मतदान करा भविष्यात खूप काही इंदापूर मध्ये करायचं आहे. कोरोना काळात कशी मदत करता येईल यासाठी मी आणि नगराध्यक्ष अंकिता शहा आम्ही प्रामाणिकपणे केला. भविष्यात बारामती शहरात ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक केबल टाकली आहे त्याप्रमाणे इंदापूर शहरात टाकली जाईल हा शब्द देतो इथे सर्व व्यापारी पेठ आहे पाठीमागे अजितदादा एका उद्घाटनासाठी इथे आले होते त्यावेळी व्यापारी वर्गाने अजित दादांना शिरसोडीचा पूल मंजूर करावा अशी मागणी केली. या गणपतीची शपथ घेऊन सांगतो रात्रीच ऑफिस उघडून तुमच्या पुलाचा प्रस्ताव तयार करून वातावरणात मुंबईला नेऊन मंजूर करणार आहात तुमचा आमदार आहे. यात जर माझं काही खोट असेल तर हा गणपती मला शिक्षा करेल इथली बाजारपेठ वाढणार आहे.पाच पटीने. व्यवसाय पाच पटीने वाढणार आहे. इंदापूरचा चेहरा मोहरा एका शिरसोडीच्या पुलामुळे बदलणार आहे शिरसोडीचा पूल होणार नाही असे म्हणणारे इथले कोण नेते आहेत ते तुमच्यासमोर आहेत, पूलाच्या कामाला कोण आडवे आले होते तो पूल होणार नाही अस कोण म्हटलं होतं हे आमच्या लाडक्या बहिणींना कळू द्या. लाडक्या बहिणींनी जर डोक्यात घेतलं चांगल्या चांगल्यांचं काम होतं इंदापूरच्या बाह्य वळणावर मालोजीराजेंचे जे शिल्प होते त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याची तूट फूट झाली आपण नव्याने शिल्प करणार आहोत. व्यापारी बांधवांना मनापासून विनंती करायची आहे तुम्ही सर्व व्यापारी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात असे समजून काम करायचं. एका पुलाच्या निर्णयामुळे इंदापूर बदलणार आहे व्यापारी संकुलासाठी आपण 10 ते 12 कोटी रूपये आपण मंजूर केले आहेत. मला कोणावर टीका करायची नाही टीका करून कोणाला मत मागायचं नाही, मी आणि अंकिता शहा यांनी इंदापूर शहराज्य विकासाचे काम केले आहे त्या जोरावर तुम्हाला मत मागत आहे पूर्वी इंदापूर शहर काय होतं आता काय बदललं याचा तुम्ही विचार करा मी निवडणुकीपुरता बोलत नाही. मी तुम्हाला तळमळीने सांगत आहे. वीरश्री मालोजीरாஜे भोसले यांच्या गढीचे काम आपण हाती घेतल आहे,ते लवकरच पूर्ण होईल. हिंदू मुस्लिम आपण भाई भाई आहोत. आज सकाळी मला खासदार रामदास आठवले यांचा फोन आला होता त्यांनी आपल्याला पाठिंबा दर्शविलेला आहे या शहराने मला 2009 पासून 2024 पर्यंत मतदान रुपी मला जे आघाडी दिली मी आयुष्यभर विसरू शकत नाही शहरात एक स्वतंत्र एसी हॉल करायचा आहे तो प्रस्ताव दिला आहे. शहरात अनेक शासकीय विभागाच्या नवीन इमारती पूर्ण केल्या आहे. महिला बचत गटाची एका स्वतंत्र इमारत माझ्या लाडक्या बहिणींसाठी केली जाईल हा शब्द लाडक्या बहिणींना देतो उत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी 56 कोटी रूपयाचे क्रीडा संकुल मंजूर केले आहेत. मला विरोधकांवर टीका करायची नाही, ही सर्व मंडळी वेगवेगळ्या कारणामुळे एकत्र आले आहेत वेगवेगळे सांगण्याची गरज नाही आज तारिक 23 आहे मागच्या वर्षीची 23 तारीख तुम्हाला आठवते का ? 23 तारखेला खडकपुरा परिसरात सर्व गुलालाने भरलेला होता. आज बरोबर एक वर्ष झाल. मुख्यमंत्र्यांनी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती. 23 तारखेला आपला विजय झाला होता. तोच गुलाल तीन डिसेंबरला खडकपूडा येथे असाच पडला पाहिजे आम्ही फुकट घेणारे नाही,आम्ही वर्गणी मागणारे नाही आणि दोघे दादागिरी करणारे नाही ( दत्तात्रय भरणे यांचा विरोधकांना टोला) शहा कुटुंबीयांनी इंदापूर शहराला दिलेल्या योगदानाची उतराई करण्याची वेळ आली आहे. इंडापूरकर खूप भाग्यवान आहात भरत शेठ सारखा उमेदवार तुम्हाला उमेदवार मिळाला आहे, जो 5 वर्षे तुमची निस्वार्थपणे सेवा करेल मदत करेल स्वर्गीय शंकररावजी पाटील यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही कारण त्यांनी कधी खोटी आश्वासन या तालुक्याला दिली नाहीत निवडणुकीच्या काळात दोन समाजात धर्मात भांडणे लावायची काही लोकांची सवय असते हे इंदापूर शहर आपल्याला भयमुक्त करायचे आहे. इंदापूर शहरातील जनता मतदार खूप हुशार आहे त्याला खूप कळत,उद्या आपल्याला कोण मदत करेल,कोण आपल्याला विकासाचा निधी देईल.
207
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 17:46:09
Baramati, Maharashtra:इंदापुरातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणेची प्रचार सभा लाईव्ह, इंदापूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल मैदानात इंदापूर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण पॉईंट अकलूज नाका प्रचार सभा सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान काय करायचं पूर्वीच इंदापूर आणि आजच इंदापूर यामध्ये बदल झाला की नाही ही एकदा तपासून पहा. पूर्वी इंदापूर काय होतं आणि आता इंदापूर काय आहे, आपल्या भागात पूर्वी रस्ते कसे होते काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माजी नगराध्यक्ष अंकिता शहा आणि मी स्वतः एक तालुक्याचा आमदार एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही दोघांनी पण एकमेकांच्या हातामध्ये हात घालून या इंदापूरच्या विकासासाठी जेवढा विकासाचा निधी जास्त आणता येईल तेवढा प्रयत्न केला. सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती करायची आहे कुणी गैरसमज तुमच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतील, कधीकधी वेळ येते कावळा बसतो आणि फांदी मोडते. मी इंदापूर शहरात विकासाचा निधी आणला म्हणजे तुमच्यावरती उपकार केले नाहीत. 2009 ते मजेदार 2024 असू द्या माझ्या इंदापूर शहराने मला मतदान आरोपी आशीर्वाद दिला ते मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही 2014 सालापासून आमदार केलं मला माहित आहे कुठे पोलिसाची गाडी किंवा बॉडीगार्ड ठेवले नाहीत या शहरासाठी जेवढा काय निधी देण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधुनो प्रामाणिकपणे केलेला आहे. काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही कशी मदत होईल हे पाहिले माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार म्हणून तुम्हा सर्वांना मदत केलीली आहे. एक रात्रीत शिरसोडीचा पूल मंजूर केला तो करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यालय उघडलं आणि रातोरात मुंबई गाठली तेव्हा हा पूल उपमुख्यमंत्र्या अजित पवारांच्या माध्यमातून मंजूर झाला. यामुळे इंदापूरचे बाजारपेठ पाचपटीने वाढणार आहे, याचा इंदापूर शहरातील व्यापारांना फायदा होणार आहे. शिरसोडी चा पूल मंजूर करून घेण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन मी रातोरात जर ऑफिस उघडलं नसलं कागदपत्र तयार केली नसली तर माझं तोंड सडल परमेश्वर मला शिक्षा देईल यात काहीही खोटं नाही. मागील पाच वर्षात इंदापूर शहरासाठी एकूण साधारणता 867 कोटी मंजूर करणारा हा तुमचा आमदार आहे. इंदापूर शहर काय होतं इंदापूर शहर तुम्हाला बदललेलं दिसतंय का नाही दिसत नसेल त्यांनी डोळ्यावरचा चष्मा बदला. इंदापूर शहराची ओळख ही वेगळी प्रकारची होती कुठला पाहुणारावळा आज आपल्याकडे आला तरी नावे ठेवायचा. मी जास्त बोलण्यापेक्षा बोललेलं तोलणार आहे. मागील वर्षी 23 तारखेला याच दिवशी याच भागात तुम्ही कशा फटाकडे फोडल्या होत्या तशाच फटाकडे आपल्याला तीन १०० ला फोडायचे आहेत. तुम्ही माझ विधानभवनातलं माझं भाषण ऐका मी सगळ्यांच्या समोर जाऊन भाषण केलं होतं हिंदू मुस्लिम बांधवायचे भांडण लावायची आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या आमचा स्वभाव राहिलेला नाही. अद्यापही माझी चार वर्ष आमदारकीचे आहेत शेवटी आमदार मी आहे दोन्ही विभागाचा निधी हा आपल्या भागामध्ये आणू शकतो. हिंदू मुस्लिम आम्ही भाई भाई आहोत हे विधानभवनात ठणकावून सांगणार तुमचा हा आमदार आहे. भरत शहा यांना जर तुम्ही नगराध्यक्ष केलं तर विकासाचा किती निधी मिळेल याचा विचार करा अफवांना बळी पडू नका,फक्त घड्याळाच चिन्ह बघा. माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासमोर उभा आहे.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी खूप योजना तुमच्यासाठी जाहीर केल्या आहेत मी काम करणारा आमदार आहे. मी चमकोगिरी मधला नाही,निवडणुकी पुरता येणारा मी नाही(हर्षवर्धन पाटील यांची ॲक्शन केली). माझं क्रीडा मंत्री पद जाणार आहे याची मला दोन ते तीन दिवस अगोदर चाहूल होती शेवटच्या दिवशी इंदापूर मधील क्रीडा संकुल साठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा त्यांचा आमदार आहे. हात जोडून विनंती करतो, भरत शहा यांसह माझ्या नगरसेवक पदाचे उमेदवारांना निवडून द्या विकास कसा करायचा मी तुम्हाला सांगतो
149
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 23, 2025 17:16:59
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली बेधुंद कारचालकाने चार ते पाच जणांना उडवलं,संतप्त नागरिकांकडून वाहनाची तोडफोड.. अँकर - सांगलीत बेधुंद कारचालकाकडून चार ते पाच जणांना उडवल्याचा प्रकार हा घडला आहे.या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याचाही प्रकार घडला आहे.शहरातल्या बालाजी मिल रोडवर हा प्रकार घडला आहे.एका बेधुंद कारचालकाने भरधाव वेगाने रस्त्यावरील जाणाऱ्या दुचाकी वाहनधारक व रस्त्याने चालत जाणाऱ्यांना उडवले आहे.त्यामुळे चार ते पाच जण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.यानंतर संतप्त नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करत चारचाकी वाहनाची तोडफोड करत बेधुंद चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे,या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाणे मध्ये घटनेची नोंद झाली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या थरारक घटनेने सांगली हादरून गेले आहे.
175
comment0
Report
Advertisement
Back to top