Back
कोल्हापूर महापालिका चुनाव: महायुती में जागावाटप तिढा बढ़ा, क्या बनेगी एकजुटता?
PNPratap Naik1
Dec 16, 2025 08:49:13
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात जागांवरून दावे-प्रति-दावे होत असून, महायुतीत रस्सीखेच स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. नेमकं गणित काय आहे आणि ही युती अखेर एकत्र लढणार की फुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
VO 1:- कोल्हापूर महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका जरी जाहीरपणे नेतेमंडळी मांडत असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपावरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचं चित्र आहे. शिवसेना आणि भाजपकडून अधिक जागांची मागणी होत असताना, राष्ट्रवादीला तुलनेने कमी जागा दिल्या जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.. त्यामुळेच महायुतीतील घटक पक्ष असणारा आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सलग दोन वेळेला सत्तेत असणारी राष्ट्रवादी मित्र पक्षांच्या जाग्या दारासंदर्भात केल्या जाणाऱ्या काहीशी नाराज दिसत आहे.. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच उघड भूमिका मांडली आहे.
Byte :- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी ( जुना बाईट )
VO 2:- भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी “मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागांवर आमचाच क्लेम राहील. फक्त काँग्रेसच्या जागांवरच महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा होईल असं वक्तव्य करून राष्ट्रवादीची कोंडी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे हे विधान आणि दुसरीकडे महायुती म्हणूनच आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असं धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर जागावाटपात स्थानिक आमदारांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याचं संकेत देत धनंजय महाडिक यांनी दिले आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार क्षीरसागर असल्यामुळे त्या भागात शिवसेनेला झुकत माप दिलं पाहिजे, तर कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपचे आमदार अमल महाडिक असल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला प्राधान्य मिळालं पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. यावरून भाजप कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘मोठा भाऊ’ च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.
Byte:- धनंजय महाडिक, खासदार राज्यसभा
VO 3 :- एकीकडे भाजपा खासदार धनंजय महाडिक असोत किंवा राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ असोत. हे दोघेही कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगत आहेत.. पण भाजपा आणि शिवसेना अधिक जागेवर मागणी करत राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतील तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल,” असा थेट इशारा देत त्यांनी दबाव वाढवला आहे.
Byte:- मंत्री हसन मुश्रीफ, नेते राष्ट्रवादी
VO 4 :- हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेत होती.
महानगरपालिकेचा दांडगा अनुभव, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेटवर्कच्या जोरावर हसन मुश्रीफ आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . त्यामुळे महायुती मध्ये पडद्यामागच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसतंय.
महत्त्वाचं म्हणजे नागपूर अधिवेशनादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊनच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोर जाण्याची तीव्र इच्छा व्यक्त करत असल्याचं दिसतंय. पण एकीकडे एकत्र लढण्याची इच्छा, तर दुसरीकडे जागावाटपावरून मोठे दावे… जर राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, तर हसन मुश्रीफ यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी “एकला चलो” ची भूमिका घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू शकतो. अशा परिस्थितीत महायुती एकसंध राहणार की जागावाटपाच्या तिढ्यातून फुटणार, याकडेच आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलं आहे.
प्रताप नाईक झी २४ तास कोल्हापूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:18:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 11:59:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:57:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 11:56:360
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:56:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 16, 2025 11:46:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 11:07:030
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:520
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report