Back
चंद्रपुर महनगरपालिका चुनाव: बीजेपी बनाम कांग्रेस में तीखा मुकाबला
AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 10:54:52
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- भाजप आणि काँग्रेस यांच्यात चंद्रपूरची मनपा निवडणूक ठरणार रंजक, एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई
अँकर:-- अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत देखील विविध पक्षांचे नेते-कार्यकर्ते सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. ही लढाई भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राज्यातील महत्वाची लढत ठरणार आहे. एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यातील अंतर्गत कुरघोडीसह यात कोण बाजी मारते हे बघणं औत्सुक्याचे बनले आहे.
बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
बाईट २) नंदू नागरकर, काँग्रेस नेते,माजी नगरसेवक
एकूण प्रभाग--- 17
एकूण नगरसेवक- 66
भाजपा- 36
शिवसेना-0
राष्ट्रवादी-0
अपक्ष--3
-------
काँग्रेस-12
UBT शिवसेना- 2
राष्ट्रवादी (शरद पवार) -2
मनसे - 2
----
बसपा- 8
प्रहार - 1
आधी काँग्रेस आणि आता भाजप असा या महानगरपालिकेचा राजकीय लंबक फिरत राहिला आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पळापळीनंतर नेमके दान कुणाच्या पारड्यात पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोण कसे लढणार, योग्य उमेदवाराला तिकीटवाटप, याशिवाय बंडखोरांची समजूत काढण्यात कुणाला कसे यश मिळेल या राजकीय गणिते अवलंबून आहेत.
बाईट ३) प्रमोद काकडे, जिल्हा प्रतिनिधी, दै. सकाळ
एकूण व्ही. ओ. ३) चंद्रपूर शहराला मोठा राजकीय इतिहास आहे. राज्याला 2 मुख्यमंत्री देणारा हा भाग राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आहे. शहराला वळसा घालणारी ईरई नदी आणि बल्लारपूर वळण मार्गाला एकीकडे आणि दुसरीकडे मूल मार्गाला जोडणारे घनदाट जंगल ही याची चतुःसीमा आहे. सुमारे 3 लाख मतदार मनपातील कारभारी निवडणार आहेत. हे शहर राज्यात धूळ आणि प्रदुषणासाठी कुख्यात आहे. तापते ऊन आणि वन्यजीवांचा संचार यामुळे शहर-जिल्हा सतत चर्चेत आहे. 2017 ते 2022 या काळात भाजपची सत्ता असताना मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर आसूड ओढणारे विरोधी बाकावरील नगरसेवक मात्र रखडलेली निवडणूक आणि गैरकारभार यामुळे प्रचंड नाराज आहे.
बाईट ४) पप्पू देशमुख, विरोधी नगरसेवक
व्ही. ओ. ४) मागील 5 वर्षात या शहरात मूलभूत विकासकामांच्या बाबतीत प्रगती झाली आहे मात्र राज्यात भाजपची सत्ता असताना ज्या प्रमाणात विकासनिधी अपेक्षित होता तो मिळाला नाही परिणामी 300 कोटींच्या अंदाजपत्रकापैकी केवळ 50-60 कोटी महसूल प्राप्ती असताना विकास योजना राबविताना तारेवरची कसरत होत आहे. मनपा हद्दीत राबविलेली अमृत पाणीपुरवठा योजना टप्पा 1 चे काम पूर्ण झालेले नाही मात्र टप्पा 2 साठी शहरात अनिर्बंध खोदकामे सुरू आहेत. याशिवाय शहराची 100 कोटी रु. खर्चून तयार मलनिस्सारण योजना प्रभावी ठरलेली नाही. शहरातील अंतर्गत रस्ते वाईट स्थितीत आहेत. तर सार्वजनिक वाहतूक, पार्किंग आणि प्रसंधानगृहांची संख्या आणि स्थिती चिंताजनक आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरातील आरोग्य व्यवस्था खुद्द सलाईनवर असून कचरा संकलन सुविधा आणि शहर स्वच्छता सुधारण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात बगीचे आणि सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प राबविण्यात आले ही यातील जमेची बाजू आहे.
--------
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowDec 16, 2025 13:06:390
Report
KJKunal Jamdade
FollowDec 16, 2025 12:36:530
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:32:470
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 12:19:110
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 12:18:480
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 16, 2025 11:59:490
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:57:440
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 16, 2025 11:56:360
Report
JMJAVED MULANI
FollowDec 16, 2025 11:56:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 16, 2025 11:46:010
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 16, 2025 11:07:030
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 16, 2025 10:55:100
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 16, 2025 10:54:350
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 16, 2025 10:54:250
Report