Back
पश्चिम महाराष्ट्र में महायुती पर असमंजस, कई दल स्वबळ चुनाव के लिए तैयार
PNPratap Naik1
Oct 12, 2025 10:28:06
Kolhapur, Maharashtra
राज्यांमधील महायुतीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात महायुती म्हणून निवडणुका लढवतील असं सर्वांनाच वाटलं होतं. पण महायुती मधील अनेक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. इच्छुकांची भाऊ गर्दी आणि जागा वाटपाचा तिढा वाढू नये यासाठी महायुती जिथे शक्य आहे तिथं युती करून तर जिथे शक्य नाही तिथे स्वबळावर अशा प्रकारची तयारी करत असताना दिसत होते. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुती मधील अनेक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर सोलापूर जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे त्यावर एक नजर टाकूया. कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपावरून भाजपा शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाला. यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपा आणि शिंदे शिवसेना अर्ध्या अर्ध्या जागा घेणार असतील तर आम्ही स्वबळावर निवडणुकी लढू असे विधान केले होते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत माहिती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. गावागावातील गटातटाच राजकारण यामुळे प्रत्येक पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्रपणे ताकद आजमावण्याची शक्यता आहे. सातारा - यावेळी सातारा नगरपालिका निवडणुकीत खा.उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनोमिलन होईल असं चित्र निर्माण झालं आहे. त्यात हे दोघेही भाजप मध्ये असल्याने या दोघांच्या आघाड्या आणि भाजप यांच्याकडेच जास्त नगरसेवक असतील असे चित्र आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट मात्र शहरात अल्प प्रमाणात असल्याने त्यांना खूप कमी जागांवर निवडणूक लढतील. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे लढतील असच चित्र आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाच प्रभाव राहील. सोलापूर सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचे प्राबल्य अधिक आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर होईल असे वक्तव्य भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद शहरात कमी प्रमाणात आहे. भाजपाचे तीन आमदार असल्यामुळे महापालिकेत भाजपचा दबदबा असणार आहे. भाजपाचे स्थानिक आमदार महायुती म्हणून लढण्यास इच्छुक आहेत मात्र शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागांची अपेक्षा आहे नाहीतर स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवण्यात आलीय. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. तालुका आणि गावांमध्ये गटातटाचे राजकारण असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक प्रत्येक जण आपल्या ताकदीवर लढवण्याची शक्यता आहे.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:48:220
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 10, 2025 04:47:150
Report
KJKunal Jamdade
FollowNov 10, 2025 04:20:034
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 10, 2025 04:19:057
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 10, 2025 04:18:07Yavatmal, Maharashtra:यवतमाळ की अरनी नगरपरिषद में भाजपा सत्ता लाने की जिम्मेदारी प्रिया तोडसाम को मिली
4
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 10, 2025 04:15:594
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:454
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:377
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:297
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 10, 2025 04:15:116
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:46:399
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 10, 2025 03:35:1810
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 10, 2025 03:34:5714
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 10, 2025 03:32:408
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 10, 2025 03:31:358
Report