Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
इचलकरंजी गोलीबारी: मन्या नागोरी के घर दबिश देकर 865 ग्राम MD ड्रग बरामद
PNPratap Naik1
Mar 06, 2026 02:30:30
Kolhapur, Maharashtra
इचलकरंजी शहरात दिवसाखवळ्या पोलिसाच्या समोर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली आहे. इचलकरंजी शेजारी असणाऱ्या यड्राव मध्ये छापा टाकत कुख्यात शस्त्र तस्कर मनीष नागोरी यांच्याकडून 865 ग्राम MD ड्रगसह, चार जिवंत काडतुसे असा तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यड्राव मधील पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या रामविलास नागोरी याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी ही केली. इचलकरंजी मधील शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून मनीष नागोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. इचलकरंजीत घडलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी शस्त्र पुरवणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला होता. यावेळी मनीष नागोरे याच्या घरावर धाड टाकून कारवाई केली.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
CRCHAITRALI RAJAPURKAR
Mar 06, 2026 04:20:56
Pune, Maharashtra:मावळमध्ये शिवजयंती दिनी दोन शिवभक्तांवर काळाने घाला घातलाय. शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या दोन शिवभक्तांचा अपघातात मृत्यू झालाय. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या शिवभक्तांची नावं होती. विसापूर किल्ल्यावरुन शिवज्योत घेऊन हे शिवभक्त स्वतःच्या गावी म्हणजे शिंदेवाडीला मोठ्या उत्साहात परतत होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील नायगाव जवळ शिवज्योत घेऊन हे शिवभक्त पोहचले. तेंव्हा मध्यरात्रीचे दीड वाजले होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक कार बेदरकारपणे आली, त्या कारने दुभाजक भेदत या शिवभक्तांना ही चिरडले. तेंव्हा शिवज्योत घेऊन धावत असलेल्या ओंकार आणि दर्शनचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने आंदर मावळात शिवजयंती च्या दिवशी शोककळा पसरली..
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 06, 2026 04:02:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील नवे दानवाड येथे प्राचीन घाटाचे अवशेष सापडले आहेत. कृष्णा नदीच्या काठावर खोदकाम सुरू असताना काहींन दगडी पायऱ्यांचे प्राचीन अवशेष दिसून आले. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी उत्खनन करण्यात आले असता प्राचीन घाटाचे अवशेष समोर आले. हा घाट नेमका कोणत्या कालखंडात आणि कोणाच्या कारकिर्दीत बांधण्यात आला, याचा शोध सध्या घेतला जातोय. मात्र घाटावर असलेल्या कृष्ण मंदिरामुळे हा घाट अतिशय प्राचीन काळातील असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कृष्णा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी प्राचीन घाट आढळतात, त्यामध्ये आता नवे दानवाड येथे सापडलेल्या घाटाचीही नव्याने भर पडली आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 06, 2026 04:02:00
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 06, 2026 04:00:20
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात आज पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडी. धाराशिव जिल्ह्यातील 8 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड आज होणार आहे. या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं असून काही तालुक्यांमध्ये सत्तेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. विशेषतः उमरगा आणि कळंब पंचायत समितीत राजकीय हालचालींना वेग झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीनुसार राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उमरगा पंचायत समितीत सभापती पदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही पक्षांकडे जवळपास समान सदस्यसंख्या असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत सदस्यांची मनधरणी सुरू असल्याची चर्चा आहे. तर कळंब पंचायत समितीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात समसमान सदस्यसंख्या असल्यामुळे सभापती पदाची निवड अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कोणत्या गटाला अतिरिक्त पाठिंबा मिळतो, यावरच सत्तेचा निर्णय अवलंबून राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यात एकूण ८ पंचायत समित्या असून सभापती पदाच्या निवडीसाठी सर्वच पक्षांनी आपले सदस्य एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान ९ मार्च रोजी निकाल लागल्यानंतर काही पंचायत समिती सदस्य सहलीवर गेले असल्याने, या निवडीपूर्वी राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:45:16
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 06, 2026 03:35:03
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव/पुणे धामणी परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास महावितरण विभागाने नकार दिल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाले असून शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांन समोर उभा राहिला आहे,परिसरातील शेतकऱ्यांनी नऊ शेतकरी गट स्थापन करून डिंभे धरणाच्या कालव्यातून एकूण नऊ उपसा सिंचन योजना राबविल्या त्यासाठी कर्ज काढली व योजना पुर्ण केल्या परंतु पाणी उपसा मोटार पंपासाठी विज कनेक्शन महावितरण विभागाच्या वतीने दिले जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांना उपोषण करत आंदोलन सुरू केलंय, लाखो रुपये खर्च करून विद्युत पंपच सुरू होत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेेत
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:34:35
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बाजारपेठेत रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या हातगाड्या २ दिवसांत हटवा, अन्यथा तिसऱ्या दिवसापासून गांधी पुतळा ते सिटी चौक सर्व मार्केट बंद दिसेल, असा इशारा व्यापाऱ्यांनी महापौर आणि मनपा प्रशासनाला दिला आहे. हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी, मंगळसूत्र चोरी आणि वादाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे हातगाड्या हटवून त्यांना स्वतंत्र जागा द्या, या मागणीसाठी सराफा व्यापाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यापारी ६ मार्च रोजी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयावर आले होते मात्र मनपाने 2 दिवसाचा वेळ वाढवून मागितला आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:17:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भरदिवसा कुलूपबंद घरे टार्गेट करून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोराला छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आजज्या महादू भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीच्या अटकेमुळे विरगाव आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात विरगाव परिसरात घरफोडी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. तब्बल ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर संशयिताचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर रोडवरील स्मशानभूमीजवळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून ५० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 06, 2026 03:17:27
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरला तब्बल 61 वर्षांनी मिळाले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय - अखेर तब्बल 61 वर्षानंतर सोलापूरला मिळाले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संबंधित विभागाला महाविद्यालय सुरू करण्याचे दिले आदेश - आ. देवेंद्र कोठे यांच्या सततच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिला ग्रीन सिग्नल - अभियांत्रिकीसाठी 250 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्याची आ. देवेंद्र कोठे यांची मागणी - येत्या शैक्षणिक क्षेत्रात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 03:04:18
Nashik, Maharashtra:द्राक्षांची निर्यात २३ हजार मेट्रिक टनाने घटली; ७०० कोटींचे नुकसान यंदाच्या शेती हंगामात वातावरणातील बदलाचा सर्वाधिक मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून कृषी विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार युरोप व नॉन युरोप खंडात मागील वर्षाच्या तुलनेने यंदा तब्बल २३ हजार मेट्रिक टन द्राक्षमाल कमी प्रमाणात निर्यात झाला आहे. त्यामुळे जवळपास ६०० ते ७०० कोटी रुपयांचे परकीय चलन बुडाले असून द्राक्षावर आधारित अर्थव्यवस्था बिघडून आलीये....पहिलेच भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू असताना चवदार द्राक्षांनी देखील शेतकऱ्यांना घाम फोडला आहे. समुद्रमार्गे कंटेनर युरोप व नॉन युरोपात रवाना होतात. फळधारणा ४० टक्के कमी झाल्याने यंदा द्राक्षाचे भाव किलोला ७० ते ८० रुपये शेवटपर्यंत राहतील. शिवाय हगामही तीन आठवडे लवकर संपेल, असे निर्यातदार संघटनेचे च्या वतीने सांगितले... गतवर्षी सलग सहा महिने पडलेल्या पावसाचा फटका द्राक्ष बागांना बसला.जवळपास ४० टक्के उत्पादन घटले. त्याचा परिणाम निर्यातीवर झाला आहे. नाशिकचे द्राक्ष युरोप खंडात चवीसाठी ओळखले जातात. ५ फेब्रुवारीअखेर ३२० कंटेनरद्वारे ४३०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात युरोप व नॉन युरोप खंडात झाली होती....
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:04:06
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:03:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालालिकेच्या सत्तेचे महत्त्वाचे स्थान असलेल्या आणि आगामी निवडणुकांच्या रसदीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीसह ५ विषय समित्यांवर शिक्कामोर्तब झाले. महापौर समीर राजूरकर यांनी घेतलेल्या या विशेष सभेत भाजपच्या वाट्याला 8 जागा आल्या आहेत. तर एमआयएमकडे 4, शिंदे गट 2, उबाठा गटाला 1 आणि लोकसेवा विकास आघाडीला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये मंत्री अतुल सावे यांनी स्थायी समितीत भाजपच्या वाट्याला आलेल्या ८ जागांवर आपल्या समर्थकांना स्थान मिळवून देऊन स्वतःच्या हाती शहराची सूत्रे असल्याचे सिद्ध केले, तर दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 06, 2026 03:03:19
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार... व्हिडिओ व्हायरल - नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील कोराडी रोडवर पती पत्नीकडून युवकाची धारदार चाकूने हत्या.. - सागर वानखेडे मृतकाचे नाव आहे. आरोरपी पत्नी सोनाली गजभिये आणि पती राजू गजभिये यांना पोलिसांनी अटक केली.. - सोनाली आणि सागरचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, मात्र सोनालीने राजू गजभिये हिच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत.. - परंतु सोनाली आणि सागर लग्नानंतरही संपर्कात होते. राजु गजभिये यांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.. - सागर होळीनिमित्त पुण्याहून गावी आला होता. या दरम्यान त्याने सोनालीला इंस्टाग्रामवर भेटण्यासाठी मॅसेज केला.. - आज सकाळी दहा वाजेदरम्यान सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून गेले असता सोनालीने रस्त्यात मुद्दाम तिची पर्स खाली टाकली.. - सागरने बाईक थांबताच सोनालीने सोबत नेलेल्या चाकूने दोन वार केले. त्यानंतर राजू गजभिये पाठलाग करत तिथे पोहचला त्यानेही सागरवर अनेक वार केले.. - यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला.. आरोपी पती - पत्नीला पोलिसांनी अटक केली. - या प्रकरणी कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून पुढील तपास सुरू..
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 06, 2026 03:02:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाणीपुरवठ्यावर टांगती तलवार; ६४ कोटी भरा, अन्यथा १६पासून पाणी बंद पाटबंधारे विभागाची महापालिकेला नोटीस पाटबंधारे विभागाने सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीवर जोर दिला आहे. छत्रपती संभाजी नगर मनपाला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपास नोटीस बजावून १५ मार्चपर्यंत एकरकमी ६४ कोटी ९७ रुपये भरा अन्यथा १६ मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून महापालिकाेला दरमहा पाणीपट्टीचे बिल अदा करण्यात येते. मात्र महापालिका प्रशासनाकडून जायकवाडी प्रकल्पाला पाणीपट्टीचे बिल वेळेत अदा केले जात नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 03:01:26
0
comment0
Report
Advertisement
Back to top