Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
कोल्हापुर के रंकाळा झील पर साल के आख़िरी सूर्यास्त का विदाई उत्सव
PNPratap Naik1
Dec 31, 2025 13:30:07
Kolhapur, Maharashtra
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या काठावर देखील कोल्हापूरकर आणि पर्यटक दाखल झालेत. या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताला अलविदा करत कोल्हापूरकर आणि पर्यटक बाय बाय करणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Dec 31, 2025 15:17:24
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यातील सहा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान, परळीमध्ये मुंडे, बीडमध्ये क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला...! ANC- बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बीड माजलगाव परळी गेवराई धारूर आणि अंबाजोगाई या नगर परिषदेसाठी निवडणूक मतदान होत आहे. तब्बल आठ वर्षानंतर होत असलेल्या या नगरपरिषद निवडणुकीसाठी अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एकत्रित लढत आहेत. त्यांना परळी मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आव्हान आहे. तर बीडमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर या चुलत भावंडांमध्ये थेट लढत होत आहे. माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सोळंके तर गेवराई मध्ये आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अंबाजोगाई मध्ये मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी स्थानिक आघाडी करून एकत्रित लढणं पसंत केला आहे. त्यांच्या विरोधात भाजपने देखील स्थानिक आघाडी करून शड्डू ठोकला आहे. धारूर मध्ये मात्र भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी समतोल लढत आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 31, 2025 14:53:08
0
comment0
Report
SKShubham Koli
Dec 31, 2025 09:58:38
Thane, Maharashtra:ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी काटेकोर नियोजन 33 केंद्रांमध्ये 2013 मतदान कक्षांची तयारी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पंधरा दिवसांवर येवून ठेपली असून त्या दृष्टीने ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांचे सखोल नियोजन पूर्ण झाले असून, निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. या माहितीनुसार शहरातील 33 मतदान केंद्रांमध्ये एकूण 2013 मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागसमितीनिहाय मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये 266, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 186, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभागसमितीमध्ये 242, कळवा प्रभाग समितीअंतर्गत 263, उथळसर प्रभाग समितीमध्ये 158, वागळे प्रभाग समितीमध्ये 160, नौपाडा कोपरी प्रभागसमितीमध्ये 214, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 269 आणि दिवा प्रभाग समितीमध्ये 255 मतदान केंद्र असणार आहेत. मतदारांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक मतदान करता यावे यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे. यामध्ये तळमजल्यावर 1207 कक्ष, पार्टीशन स्वरूपातील 361 कक्ष, मंडपामध्ये 403 कक्ष, तर पहिल्या मजल्यावर 42 कक्ष उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, मतदान अधिकारी व पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ईव्हीएम व बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदन केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत. मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पडावी, यासाठी कक्षांची संख्या व मांडणी नियोजनपूर्वक करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसेच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प, रेलिंग, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले...निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल व पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 31, 2025 09:58:25
kolhapur, Maharashtra:नागपूर - - "उमेदवारी अर्ज कुठल्या प्रवर्गातून दाखल करायचा हा माझा अधिकार" - ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर कुमेरिया यांचं स्पष्टीकरण - ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन तिवारी आणि जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांच्यातील अंतर्गत वाद टोकाला - प्रभाग 28 च्या खुल्या प्रवर्गातून किशोर कुमेरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, यावर शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी आक्षेप घेतलाय - "यापूर्वीच्या चार निवडणुकात दोनदा खुल्या तर दोनदा ओबीसी प्रवर्गातून निवडून आलोय"- किशोर कुमेरिया - "मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, मी कुनसोबतही हातमिळवणी केली नाही" ----- बाईट - किशोर कुमेरिया, ठाकरे शिवसेना उमेदवार
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 31, 2025 08:48:18
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरात शिंदे सेनेने शिवाजी पेठेतून अजय इंगवले याना उमेदवारी दिली आहे. अजय इंगवले हे २००८ मधील साईराज जगताप खून प्रकरणातील संशयित असल्याचा आरोप उबाठा सेनेने केला आहे. या प्रभागातून माजी जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांच्या कुटुंबातील व्यक्ती इच्छुक होती, रामभाऊ चव्हाण यांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले, पण त्यांच्याच कुटुंबातील उमेदवारी कापून खुनी व्यक्तीला उमेदवारी देण्याचे कारण काय ? असा प्रश्न उबाठा सेनेने केला आहे. शिवाय काल अर्ज भरताना पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या डान्स वर सुद्धा त्यांनी टीका केली आहे
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 31, 2025 07:28:23
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा–भाईंदर ब्रेक मिरा–भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जावेद पठाण (वय ६६) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद पठाण यांनी सकाळी १० ते ११ या वेळेत प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरा रोड येथील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मिरा–भाईंदरच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्याने सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 31, 2025 07:05:59
kolhapur, Maharashtra:स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक जिल्ह्यात वेगवेगळी युती झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांची युती झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि अजित पवार पक्ष यांची युती झाली आहे. अकोल्यात काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील राजकारण पाहून निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या पक्षातील जास्त नगरसेवक कसे निवडून येतील पाहूनच सर्व पक्षांनी भूमिका घेतली आहे. काँग्रेसनेही काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर युती केलीय, काही ठिकाणी शिवसेनेबरोबर युती केली आहे. वेगवेगळ्या पक्षाने त्या जिल्ह्यातील राजकारण पाहून पक्षाने युती केली आहे. आम्ही नगरपालिकेमध्ये स्थानिक नेत्यांना सूचना दिल्या होत्या की स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा. त्यावेळेस अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतले पक्ष अगदी भाजपासोबत गेलेले दिसले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही.
0
comment0
Report
Advertisement
Back to top