Back
संभाजीनगर महापालिका सत्ता कौन जीतेगा: भाजप, शिवसेना, एमआईएम मुकाबला
VKVISHAL KAROLE
Jan 05, 2026 14:32:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाड्याची राजधानी, या शहरात ज्याची सत्ता तोच मराठवाड्यात राज्य करतो असं म्हटल्या जातं आणि हीच सत्ता काबीज करण्यासाठी आता सर्वपक्षीय धडपड सुरू आहे महापालिकेच्या निवडणुकांमुळे सर्वे पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत, महायुती झाली नाही महाविकास आघाडी विस्कटली त्यामुळे सगळेच एकला चलो च भूमिकेत आहे आणि त्यामुळे सर्वच पक्षांना एकमेकांचं मोठा आव्हान असणार आहे. छत्रपती संभाजीनगरात कुणाची सत्ता महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांचा संघर्ष. छत्रपती संभाजीनगर एकेकाळी हा शिवसेनेचा गड मानला जायचा, शिवसेना भाजप युतीनं महापालिकेवर राज्य केले, अगदी 2015 च्या निवडणुकीत अखेरच्या सहा महिन्यातील वाद सोडला तर शिवसेना-भाजप सातत्याने सोबतच राहिले आणि या महापालिकेवर भगवा फडकत राहिला.. मात्र यंदा चित्र वेगळा आहे शिवसेनेचा विभाजन झालंय त्यामुळे दोन शिवसेना रिंगणात आहे, महायुती जमली नाही त्यामुळे भाजप एकटा रिंगणात आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा यावेळी निवडणुकीच्या रिंगणात ताकद आजमावत आहे तर एम आय एम चा सुद्धा मोठा आव्हान आहे आणि या सगळ्यात महापालिकेवर कोणाची सत्ता हाच सध्या संभाजीनगर मधील चर्चेचा विषय आहे. गेली अनेक वर्षे संभाजी नगर मधील अनेक मुद्दे सुटले नाहीयेत. संभाजीनगरात अजूनही पाणी किमान 4 दिवसाआड येतेय, अनेक भागात अजुनही पाण्याची पाईप लाइन नाही. संभाजीनगरचे रस्ते लोकसंख्येच्या मनाने छोटे झालेत त्यामुळं वाहतूक कोंडी नित्याची. महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने मूलभूत काम करण्यात महापालिका अपयशी ठरतेय. अनेक रस्त्यावर स्ट्रीट लाईट महापालिका लावू शकली नाही, रस्ते साफसफाई करणे, कचरा उचलणे यातही अनेक उणिवा कायम आहे. महापालिकेने रस्ते मोठे करण्यासाठी मोठी अतिक्रमण मोहीम राबवली, मात्र आता रस्ते बांधण्यासाठी पैसे नाहीत. या समस्या अजूनही सुटता सुटत नाही आहे. खरंतर संभाजीनगरचा प्रचार हा कधी विकासाच्या मुद्द्यावर झालाच नाही तुम्हाला खान हवाय की बाण, संभाजी नगर की औरंगाबाद हे दोनच मुद्दे प्रचारात महत्त्वाचे विषय असायचे आणि त्यामुळे विकास मागे पडल्याचं सांगण्यात येते, आता शहराच्या नामांतराचा विषय संपलाय, खान की बाण हा मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरे गटाने थेट मुस्लिम समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिल्याने मागे पडलाय. आता सर्वच पक्ष विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं पुढे सांगताय मात्र समस्या सोडवणार कसा कदाचित याचे उत्तर कोणाकडे नाही, युती तुटल्याने शिवसेना भाजप ही आमने सामने आहेत त्यामुळं दोघांमध्ये युद्ध पेटणार असे चित्र आहे. शिंदे सेना मात्र टीका करण्यापेक्षा आम्ही विकास कामावर लक्ष देऊन निवडणूक लढू असे सांगताय तर भाजप ही आता विकासाचाच मुद्दा पुढे रेटते आहे. गळलेला गड शिवसेनेचा आहे शिवसेना इथल्या समस्या सोडवू शकते, बाळासाहेब ठाकरे वर प्रेम करणारे लोक इथं राहतात त्यामुळं जनता आम्हाला समर्थन देईल असा अंबादास दानवे यांचा दावा आहे. तर शिवसेना भाजप कोणीही या शहराचा विकास करू शकला नाही यांनी फक्त जातीय राजकारण केलं त्यामुळे या जातीय राजकारणाला एमआयएम संपवेल आणि या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करेल असे इम्तियाज जलील सांगतात आहेत. गेल्या निवडणुकीतील संख्याबळ शिवसेना भाजप युती कडे होते पाहुयात कसे होते संख्याबळ शिवसेना 29 भाजप 22 एमआयएम 25 काँग्रेस 10 बहुजन समाज पार्टी 5 एनसिपी 4 अन्य 20. 2015 अखेर महापौर शिवसेनेचा होता शेवटच्या 6 महिन्यात भाजपने पाठिंबा काढलेला तरी शिवसेना सत्ता कायम होती...मात्र यंदा आता चित्र वेगळे आहे सर्वच पक्ष एमकेकांची उनीदुनी काढताय, त्यात संभाजी नगरात ही लढत प्रामुख्याने चौरंगी रंगण्याचीच शक्यता जास्त आहे, शिंदे सेना , उद्धव सेना , भाजप आणि एमआयएम प्रमुख प्रतिस्पर्धी असतील आता यातील कुणाचा झेंडा महापालिकेवर फडकणार याचा निर्णय मात्र मतदार राजाच घेणार आहे. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowMar 12, 2026 04:16:510
Report
ABATISH BHOIR
FollowMar 12, 2026 04:04:020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 12, 2026 04:02:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 12, 2026 03:30:400
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 12, 2026 03:30:170
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 12, 2026 03:16:560
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 12, 2026 03:16:060
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 12, 2026 03:04:480
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 12, 2026 02:46:450
Report
KPKAILAS PURI
FollowMar 12, 2026 02:46:310
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 12, 2026 02:45:220
Report
PNPratap Naik1
FollowMar 12, 2026 02:45:090
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 12, 2026 02:33:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 02:33:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 12, 2026 02:30:460
Report