Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
संभाजी नगर में भाजपा की हाईटेक सभा, मुख्यमंत्री का टॉक शो आज
VKVISHAL KAROLE
Jan 08, 2026 09:52:50
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
संभाजी नगर में आज भाजपची हाईटेक सभा आहे मुख्यमंत्री यांचा टॉक शो संभाजी नगरात होणार, त्याचे प्रक्षेपण 90 शब्दात करण्यात येणार आहे कमीतकमी वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Jan 09, 2026 06:50:13
kolhapur, Maharashtra:नागपुर बायट-- मंगलप्रभात लोढ़ा, भाजपा नेते (विज्ञान महोत्सव) विदर्भ विज्ञान उत्सव हा विज्ञान भारती तर्फे अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शन ठरेल असा हा कार्यक्रम. त्यामुळे मुंबईत निवडणूक असताना या निमंत्रणाला मी आलो आहे. बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत सहभाग घेतला आहे. (मुंबई बंडखोर कारवाई) बंडखोरी करणे हे चुकीचं काम असल्याने चुकीच्या कामाला शिक्षा झाली पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून अनुशासित पक्ष आहे, म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला आहे. (उद्धव ठाकरे आरोप... मुंबई-बॉम्बे) प्रत्येक निवडणुकीत त्यांचे आरोप हे पब्लिसिटी करीता असतात. त्यापेक्षा अधिक काही नाही. (ठाकरे बंधू मुलाखत भाग दोन) दुसरा भाग येऊ द्या किंवा तिसरा भाग येऊ द्या. जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे. (उद्धव अदानी आरोप) धारावीचा पुनर्विकास संदर्भात तेथील लोकांना तसेच ठेवायचं का? सर्वजण आरामात असतात मात्र धारावी मधील लोक कशा स्थितीत राहतात. तिथला पुनर्विकास करायचा नाही का. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागात ते विकसित करून घरे देत असतील त्यात चुकीचं काय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 06:49:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर -नवीन काय बोलताहेत हे काहीच कळलं नाही. उद्धव म्हणता शाह सेना मग तुम्ही काँग्रेस बरोबर होता तर सोनिया सेना होती की मग राहुल सेना. तुमचे युवराज भारत जोडे मध्ये जाणार.. टीका करताना आपल्या बुडाखाली काय जळत ते पाहा. -त्यानंतर संवाद राहणार. - मातोश्री वर मोठमोठे नेते यायचे आता तुम्ही लोटांगण करत आहेत. चोरांची युती - चोर हेच ठरवणार, मुंबई हेच ठरवणार, मराठी माणूस कोण याचा सर्टिफिकेट तुम्ही ठरविणार. तुमच्या चुकीमुळे मराठी माणूस बाहेर गेले, तुम्ही अनेक अदानी जन्माला घातले म्हणून मराठी माणूस बाहेर गेला, तुम्हाला अडचण ही आहे की मुंबई तुमच्या हातातून गेली आहे.. भीतीने ही वक्तव्य करतात. मुंबईचे पुन्हा बॉम्बे करतील. - हा जोक झाला नाही का? कुणाची हिंमत आहे का? त्यात सर्वच होते ना. नामकरण करायची खाज कुणाला. तुम्हाला करायचा असेल तुम्हाला मुसा चालतात. मुंबई आमचा प्राण आहे. मुंबईचं कायम राहणारं ऑन दोन्ही ठाकरे सभा. - पहिल्यांदा दोघे भाऊ एका स्टेजवरून बोलत आहेत. यावरून कळते की उद्धव ठाकरे यांचि क्रेज संपली आहे. गर्दी होणार नाही. ते च टोमणे आणि तेच ते... ऑन परळी सेना युती. - अधुरी माहिती आहे. Mim वर आम्हीच कडवट बोलतो, संभाजीनगर मधे तुम्ही १२ मामु उभे केले तुमचा हिंदुत्व कुठे चालले पहा... आम्ही mim ला महाराष्ट्र बाहेर पाठवणार. - आमचा कुठेही नेता mim मुळे झालेले नाही. ऑन फडणवीस युती विधान. - त्या दिवशी शेवटची बैठक झाली. मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखील होते. मुख्यमंत्री यांनी विनंती केली. मी ते ऐकले. मात्र दुसऱ्या दिवशी जो प्रस्ताव येणार होता. त्यात स्थानिक नेत्यांनी खोडा घातला. त्यांचा गैर समज झाला असेल तर मी मुख्यमंत्री यांना प्रस्ताव दाखवेल. ऑन मोठा भाऊ... - पक्षाची लाइन घेणे, नेत्याची जबाबदारी असते सत्ता येईल सांगत असतात. मताच्या टक्केमध्ये वाढ होईल अशी समज असेल. शहराच्या जनतेने शिवसेनेला 1 नंबर दिला आहे. महापौर आमचा असेल.. ऑन रोहित पवार ट्विट. - बारामती पुण्याचा लोन इकडे येत आहे. ते वाईट आहे. त्याचा बंदोबस्त करू. तुम्ही तोकडे लक्ष द्या. तुम्हाला खाजवायची सवय आहे. ऑन गणेश नाईक. - गणेश नाईक काय बोलतात त्याची दखल त्याचे नेते घेत आहेत. शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली तर आम्ही देखील उत्तर देऊन. ऑन सामना भाजप mim युती बाबत .. - भाजप पक्षाने काय भूमिका घेतली फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकर दिले आहे. ऑन ठाकरे मुलाखत सायलेंट प्रचार प्रश्न. - राज ठाकरे यांच्या बोलण्याची शैली आहे. मात्र ते गेल्याने पक्ष वाढतो हे गैर समज आहे. युतीत ऑन ठाकरे म्हातारे झाले,फडणवीस विधान. - ही वस्तुस्थिती आहे. दर पावसाळ्यात मुंबई का तुंबत होती? खड्डे का होत होते? गेल्या साडेतीन वर्षात गती वाढली आहे. मुंबईकरांचा कोंडलेला श्वास आता मोकळा व्हायला लागला आहे. आता विश्वास वाटायला लागला आहे की महायुतीत विकास करू शकते. ऑन मुंबई काही भागात महायुती उमेदवार नाही. - काही prभागात असतात तेथे महायुतीचे उमेदवार नसतात. काही ठराविक भागात आमचे उमेदवार नाही तेथे आम्ही प्रचार करीत नहीं ऑन भाजप कार्यकर्ते खोके घोषणा... - भाजपचे कोण महारथी आहे त्यांना पहावं लागेल. या घोषणा देण्या अगडोदर फडणवीस यांना विचार आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा.. याबद्दल फडणवीस दाखल घेतील. ऑन राऊत शिंदे भेट. - काय बोलाव या माणसाला, कधीतरी खरे बोलले पाहिजे. राज्यसभेवर जाण्यासाठी पाय पडत होते शिंदेंच्या . अर्ध्या मतांनी निवडून आलेल्यांनी उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. बदलती भूमिका, बदलता नेते अनेक दिवसापासून हेच धंदे करत आहे. नागपूर परिणय फुके विधान. - निवडणुकीत वेगवेगळे नारे येत असतांत. मतदार जागृत आहेत. क्षेत्रपुरता काय विकास पाहिजे याचा विचार मतदार करीत असतात. ऑन सुप्रिया सुळे प्रादेशिक पक्ष विधान. - सुप्रिया सुळेला हे उद्देशून बोलायचे नव्हते ते त्यांच्या राष्ट्रवादी बाबत बोलले होते. पवार एकत्र यावे याबाबत ते बोलले. - नक्कीच ना खान, ना बाण भगव्याचि शान.. हातात राखू हातात धनुष्यबाण - महापौर शिवसेनेचाच होईल... ऑन निवडणूक नंतर - जो भगव्यासाठी आमच्या बरोबर येईल त्यांना सोबत घेऊ.. ऑन उमर खालिद मृत्युदंड. - जो कुणी देशविरोधात जाईल त्याला फाशी दिलीगेली पाहिजे. धर्मगुरूंनी जे विधान केले आहे. त्यावरून विधान केले असले. - विकासाच्या आड मंदिर - मशीद येऊ द्यायला नको. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jan 09, 2026 05:02:06
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर मध्ये शिंदेंच्या सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होल्डिंग्स मीरा–भाईंदरमधील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड मीरा–भाईंदरमधील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. महायुती नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेकडून लावण्यात आलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मीरा–भाईंदरमध्ये आज प्रचार सभा होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागताचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या बॅनर वर महायुतीचा उल्लेख मात्र नाही. हे होर्डिंग्ज मंत्री प्रताप सरनाईक यांनी लावल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे हे फलक अधिकच लक्षवेधी ठरत असून, मीरा–भाईंदरमधील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Jan 09, 2026 04:45:32
Nashik, Maharashtra:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नाशकात जाहीर सभा नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच संयुक्तपणे नाशिक मध्ये जाहीर सभा घेत आहे... नाशिकच्या गोल क्लब मैदानावर त्यांची सभा पार पडणार आहे... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याचा आनंद होत असल्याची भावना नाशिककरांनी व्यक्त केली आहे... तर ते दोघेजण एकत्र आले तर त्यांनी नाशिक सह महाराष्ट्राचा विकास करावा असं मत व्यक्त केले आहे... तसच महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे तर पक्षांतराच्या मुद्द्यावर देखील नाशिककरांनी हात घालत नाराजी व्यक्त केली आहे... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या जाहीर सभेबद्दल नाशिककरांना काय वाटतं याबद्दल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Jan 09, 2026 04:45:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 09, 2026 03:46:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पक्षाचे कार्यकर्ते पक्षाबरोबरच पक्षातील बंडखोर उमेदवारांना साथ देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अनेक पक्षांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी थेट पक्षाविरोधात बंडखोरी करत निवडणूक रिंगणात उभे टाकलेत. त्यामुळे पक्षादेश असताना देखील तळागाळातील कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला अशा बंडखोर उमेदवाराला मैत्रीपूर्ण अंतर्गत मदत करत असल्याचे अनेक प्रभागात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा मैत्रीपूर्ण अंतर्गत हात देण्याचा फंडा डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे एका प्रभागातील सर्वच उमेदवारांना पक्षीय पातळीवर एकत्रित मतदान होईल असं अनेक प्रभागात दिसत नाही. सध्या मैत्रीपूर्ण अंतर्गत मदतीमुळे सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढत आहे, त्यामुळे अशी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून सूचना देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 09, 2026 03:45:42
Kolhapur, Maharashtra:एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी कोल्हापूर महानगरपालिकेत उमेदवार निवडून आणण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे. काँग्रेस सोबत आघाडी केलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.. शिवसेनेत फाटा फूट झाल्यानंतर बहुतांश जुने कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अस्तित्व राहावे यासाठी काही शिवसैनिक प्रयत्न करत आहेत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने अशीच धडपड शिवसेना ठाकरे पक्षांच्या उमेदवारांची शहरात सुरू आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Jan 09, 2026 03:08:36
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 09, 2026 03:07:22
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 08, 2026 15:47:05
kolhapur, Maharashtra:नागपूर देवेंद्र फडणवीस बाईट ( उद्धव ठाकरे आरोप मुंबईला बॉम्बे करण्याचा डाव) -- मी याला गंभीरतेने घेत नाही... त्यांच्याकडे दाखवायला काही नाही... 25 वर्षात काही केले नाही... त्यामुळे अफवांचा बाजार उठवून मत मिळवू शकू असं त्यांना वाटत असेल ते 16 तारखेला स्पष्ट होईल.. -- पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे त्यामुळे हे राजकारण सुरू आहे (on शहा सेना ) --- ते अनेक वेळा बोलले आहे... ते बोलल्यावर त्यांच्यावर कोणाचा विश्वास आहे का? विधानसभे असच बोलत होते तरी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही... नगरपालिकेतही पुन्हा आम्हाला निवडून दिलं... महानगरपालिकेतही जनता आम्हालाच निवडून देईल --- जनता टोमणे आणि टीकेवर मतदान करणार नाही... जनता विकासावरच मतदान करेल -- 29 महानगरपालिकेत आमची स्थिती चांगली आहे.. 27 महापालिकेत महायुतीतील 3 पैकी एका पक्षाचा महापौर असेल... आणि भाजप नंबर वन असेल
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 08, 2026 15:15:51
Kolhapur, Maharashtra:महिलांसाठी केएमटी बससेवा मोफत करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी थेट केएमटी बसमधून प्रवास करत अनोख्या पद्धतीने प्रचार केला. शहरातील केएमटी बसमध्ये बसून सतेज पाटील यांनीप्रवाशांशी संवाद साधत आपल्या जाहीरनाम्याची माहिती दिली. महिलांना सुरक्षित, मोफत आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक बचतीसह त्यांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. केएमटी बसमधील प्रवासादरम्यान महिला प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. प्रत्यक्ष बसमधून प्रवास करून प्रचार केल्यामुळे सतेज पाटील यांच्या या प्रचाराची शहरात चर्चा होत आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 08, 2026 14:27:34
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना - प्रकाश आंबेडकर *- अजित पवार आणि शरद पवार युतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका* *- दोन्ही पवार एकच आहेत मात्र त्यांनी भाजपला उल्लू बनवले.* *- प्रकाश आंबेडकर pc पॉईंटर्स :* - मागच्या वेळी म्हटलेलं होत अभद्र युत्या तुम्हाला पाहायला मिळतील - अकोट मध्ये भाजप एमआयएम युती झालेली दिसते - सत्तेसाठी भाजपाने सुद्धा तत्व सोडलं, एमआयएम ने आम्ही RSS भाजप विरोधी आहे हे सोडलं - त्याचं बरोबर काँग्रेस आणि भाजप यांची सुद्धा युती अंबरनाथमध्ये झालेली पाहिली - पक्ष, विचर आता महत्वाचा नाही.. सत्तेततून मिळणारे टेंडर हेच महत्वाचे राहिलेत असं वाटतय - एकीकडे देशावर असलेलं संकट आहे, दुसऱ्या बाजूला देश चालवणाची धुरा असलेले अनैतिक पद्धतीने चालतायत - मतदारांना एवढं सांगणं आहे अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे बाजूला ठेवा तरच शहराचे प्रश्न सूटतील - परिवहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहे पण त्याची आखणी झाली *- अभद्र युतीची सरकार लोकांनी दूर ठेवावे असं म्हणणं आहे* *- काँग्रेस आणि वंचित दोघे सेक्युलर आहेत, त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली* - फडणवीस यांनी अकोटबद्दल कारवाईचे सांगून 24 तासं झाले पण अजून काही झाली नाही *- ऑन बाळासाहेब सरवदे :* - सत्ता आणि टेंडर हे दोन्ही रिलटेड झालेत - त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी खून करावे लागले तरी हरकत नाही असं म्हणतायत - महाराष्ट्र बिहार सारखे होत आहे *- सुजात आंबेडकर ऑन प्रणिती :* *- सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्य आहे. ते जे बोलले खर बोललेत, तुम्हाला लवकर समजेल* *- कोणाच्याही रक्तात किती भाजप आहे दिसतंय सर्वांना* *- कोणी किती एकनिष्ठ आहे लवकर समजेल* *- ऑन बिनविरोध :* - महाराष्ट्र हा बिहार होत चाललंय - सुशीलकुमार शिंदेनी बिनविरोध व्हावं म्हणून प्रचंड प्रयत्न केला - मलप्पा शिंदे नावाचा व्यक्ती शेवट प्रयत्न केला - मल्लप्पाला यांनी मारपीट करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. - मात्र आता परिवारावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जातात. *- आमचे निम्मे उमेदवार भीतीमुळे फॉर्म भरायला आले नाही* *- नागपूरमध्ये भाजपने सांगितलं आम्ही शिंदे-पवार सोबत बसणार नाही* *- वंचित शहराध्यक्षने शिंदे-पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षाशी बोलणं झालं, जगवाटप झालं होते* *- पण ऐनवेळी भाजपने शिंदे गटाच्या अध्यक्षाना बोलून केवळ 9 जागा दिल्या आणि दबाव आणून त्यांना युती जाहीर करायला लावली* - दबाव आणि धमक्याचे राजकारण सध्या सुरु आहे - हे थांबवायचं असेल तर 2-4 महिन्यात जे युद्ध पाकिस्तान बरोबर सुरु आहे - ट्रम्पला सांगितलं पाहिजे की आम्हीच मोदींचे कंबरड मोडतो कारण या दोघांच्या इगोमूळ हे सुरु आहे *- ऑन ड्रग्स :* - 18 हजार कोटीचं ड्रग्स गुजरातमध्ये पकडलं गेलं - ते कोणाचे होते माहिती नाही, केवळ एका व्यक्तीला त्यात पकडण्यात आलं - अमित शह आणि मोदी यांनी याचा खुलासा केला पाहिजे - राज ठाकरे जे बोलतायत ते फॅक्ट आहेत *- ऑन मतदान पैसे वाटप :* *- मतदानला पैसे कोणी दिलेत तर ते घ्या पण पैसे जे देत नाहीत त्यांनाच मतं द्या* *- ऑन दोन्ही राष्ट्रवादी युती :* *- मी आधीच म्हटलं होत की हे दोघे वेगळे नाहीतच, फक्त त्यांनी भाजपला उल्लू बनवलं.* *- चौकशी लागली होती म्हणून एक जण भाजपसोबत गेला स्वतःवरची चौकशी थांबवली* *- एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यावर आठवण करून देतायत की 70 हजार कोटीची फाईल पेंडिंग आहे* *- आम्ही उलट भाजपला विचारतोय तुम्ही एवढे दिवस फाईल दाबली का यांचा खुलासा करा* - जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे पण पुण्यात, ठाण्यात युती नाही *- यांचा राजकीय अर्थ असं काढतोय की भाजपला दोघांना (सेना-राष्ट्रवादी) संपवायचं आहे* - म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडलं आहे तुमचं तुम्ही बघा - विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच आहे - पण किती यशस्वी होतील या बाबत शंका आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top