Back
चंद्रपुर में महापौर चुनाव के लिए भाजपा में गुटबंदी फिर उभरी
AAASHISH AMBADE
Nov 18, 2025 08:01:26
Chandrapur, Maharashtra
महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात पुन्हा एकदा वाद
चंद्रपूर भाजपमध्ये ज्येष्ठ नेते आ. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आगामी चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. आमदार किशोर जोरगेवार यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे तर प्रदेश भाजपकडून भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सांगण्यात आलंय. त्याप्रमाणे कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर करावे असं आवाहन केलं. मात्र त्याचवेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी देखील सुधीर मुनगंडीवार यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावे करावे असं आवाहन केलं. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झालाय. राहुल पावडे यांनी केलेल्या आवाहनाला सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. राहुल पावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार गटाचे राहुल पावडे काहीही बोलण्यास तयार नाहीत.
148
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 09:51:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 09:51:360
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 09:36:480
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 09:17:17109
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 09:00:1169
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 08:55:0477
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 08:47:31146
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 08:45:16Pandharpur, Maharashtra:पंढरपूर में BJP नगराध्यक्ष प्रत्याशी शामल शिरसट ने श्रीराम दर्शन से प्रचार शुरू किया
172
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:43:19120
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:37:07175
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:31:59154
Report
JMJAVED MULANI
FollowNov 18, 2025 08:31:36108
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 18, 2025 08:18:59129
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 08:17:14117
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 08:16:25156
Report