Back
बीड़: गेवराई नगरपरिषद में महायुती सहयोगी दल आमने-सामने, शीतल दाभाडे बनाम गीता पवार
MMMahendrakumar Mudholkar
Nov 09, 2025 05:37:52
Beed, Maharashtra
बीड ब्रेक : अखेर ठरलं.. गेवराईत होणार महायुतीच्या मित्र पक्षात चुरशीची लढत. राष्ट्रवादीकडून शितल दाभाडे तर भाजपकडून गीता पवार निवडणुकीच्या रिंगणात. दोन्ही मित्र पक्षांनी केली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा. बातमी बीडच्या राजकीय गोठ्यातून आहे..गेवराई नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतीलच दोन पक्ष आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युतीचा निर्णय न पाहता शितल दाभाडे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं होतं, आणि आता भाजपनेही गीता बाळराजे पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे गेवराईत राष्ट्रवादी आणि भाजप याच्यात थेट सामना रंगणार आहे. शनिवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत गीता पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, युती होणार की नाही याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. मात्र गेवराईतल्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:21:260
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 07:21:050
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 07:18:130
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 07:09:420
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 07:07:270
Report
JMJAVED MULANI
FollowNov 09, 2025 07:06:530
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 07:04:430
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:32:211
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 09, 2025 06:22:532
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:22:302
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:22:182
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 09, 2025 06:19:147
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 06:19:056
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 09, 2025 06:07:493
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 06:05:433
Report