Back
संभाजीनगर के सिंह जोड़ी मराठी-सीखेंगे, आयुक्त की मदद से
VKVISHAL KAROLE
Sept 30, 2025 10:32:42
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn lion pkg
Feed csn lion by tvu
2 vdo clip assignment no वर टाकल्या आहेत...
Anchor : बातमी संभाजीनगर मध्ये आणलेल्या सिंहाच्या जोडीची, कर्नाटक मधल्या शिवमोघा तुन सिंहाची जोडी आणण्यात आली आहे, आठ वर्षाचे हे सिंह आहे आणि आतापर्यंत हे कानडी भाषाच ऐकत आले आहे त्यामुळे संभाजीनगर मध्ये मराठीत बोलताना त्यांची काळजी घेणाऱ्यांचा चांगलाच कस लागतो आहे, त्यांना खाऊ घालणे त्यांना शिस्त लावणे सगळंच अडचणीचे झाले आहे मात्र यात मदत झालीय ती महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची, आयुक्तांना कानडी येते आणि त्यामुळं त्यांची मदत प्राणि संग्रहालयातील लोकांना घ्यावी लागतेय... पाहुयात
Vo 1...
संभाजीनगरचा सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे हे नव आकर्षण म्हणजे अर्जुन आणि सुचित्रा ही सिंहाची जोडी.. कर्नाटकातल्या शिवमोघा प्राणी संग्रहालयातून हे सिंह तीन दिवसांपूर्वी संभाजीनगर मध्ये दाखल झाले.. इथं प्राण्यांची काळजी घेण्यासाठी खास केअरटेकरही आहेत मात्र त्यांना अडचण झाली या सिंहाशी संवाद साधण्याची , कारण सिंह जन्मले तेव्हापासून कानडी ऐकतात त्यामुळे मराठी भाषेशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि नेमकी हीच अडचण झाली आहे त्यांना खायला घालताना त्यांना शिस्त लावताना त्यांच्याशी संवाद साधताना भाषेची एक मोठी अडचण इथल्या काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना होते , त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांचीच मदत घेतली आहे , आयुक्त कानडी बोलू शकतात त्यामुळे या सिंहांना आयुक्त कानडी भाषेतुन बोलण्याचा प्रयत्न करताय...
( आयुक्त बोलताय आवाज फार आला नाही सिंहाचा येतोय जास्त 2 व्हीडिओ assignment व्हाट्स अँप वर टाकले आहेत ...)
आयुक्त ही भाषेची अडचण येते हे मान्य करतात त्यामुळे मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि इथल्या कर्मचाऱ्यांनाही या भाषेचं काही प्रमाणात प्रशिक्षण देणार असल्याचं आयुक्त सांगतात आहे..
Byte जी श्रीकांत महापालिका आयुक्त
Vo 2... या सिंहाला येऊन फक्त तीन ते चार दिवस झाले आहे मात्र अजूनही ते इथं रूळले नाही , नेहमीचे काळजी घेणारे नाही वरून भाषेची अडचण मात्र लवकरच सिंहांना मराठी भाषा सुद्धा कळेल त्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्यास महापालिका आयुक्तांनी सांगितले..
Byte जी श्रीकांत , महापालिका आयुक्त
Vo 3.. असं म्हणतात की प्राण्यांना प्रेमाची भाषा पुरेसी आहे मात्र जे शब्द रोज कानावर येतात त्यांची त्यांना सवय झाली असते आणि त्यानंतर काय करायचं हे त्यांना माहिती असतं आतापर्यंत कानडी सूचना ऐकणारे हे सिंह थेट मराठी भाषा प्रदेशात आले त्यामुळे निश्चितपणे अडचण येते मात्र महाराष्ट्रात आल्यावर सिंहानाही लवकरच मराठी कळेल समजेल हीच अपेक्षा आपण करूया, आणि इथेही ते लवकरच रुळतील हीच अपेक्षा...
विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 13:00:430
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 12:51:300
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 12:50:590
Report
UPUmesh Parab
FollowSept 30, 2025 12:50:360
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 12:48:150
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 30, 2025 12:33:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 12:31:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 12:30:420
Report
KJKunal Jamdade
FollowSept 30, 2025 12:25:260
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 12:25:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 30, 2025 12:18:120
Report
PNPratap Naik1
FollowSept 30, 2025 12:04:340
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 12:03:190
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 30, 2025 12:02:100
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 30, 2025 11:45:530
Report