Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

ई-केवाईसी शिथिल: जालना के किसानों को राहत मिलने की उम्मीद बढ़ी

NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 12:25:17
Jalna, Maharashtra
जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा दूर,ई -केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथील, कृषीमंत्री भरणे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्र्ी दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-केवायसीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Sept 30, 2025 15:37:19
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या माता महाकाली महोत्सवात आज देवी महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची रथातून निघाली नगरप्रदक्षिणा, शहरभर देवी महाकालीच्या नामाचा गजर, विविध धार्मिक देखाव्याची रेलचेल, शेकडो सामाजिक- धार्मिक मंडळे झाली आहेत सहभागी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने शहरात नवरात्रीच्या पर्वावर सलग चौथ्या वर्षी माता महाकाली महोत्सवाचे आयोजन सुरू आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम ,कन्यापूजन व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांना मिळत आहे. शहर- जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी देवी महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची चांदीच्याच रथातून केली जाणारी नगर प्रदक्षिणा म्हणजे या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य. महोत्सव स्थळ असलेल्या देवी महाकाली मंदिरापासून निघालेली मूर्तीची नगरप्रदक्षिणा मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत पुन्हा एकदा देवी महाकाली मंदिरात पोहोचणार आहे. या नगरप्रदक्षिणा यात्रेत हजारो चंद्रपूरकर सहभागी झाले असून विविध देखाव्यांची यात्रेत रेलचेल आहे. शहरभर देवी महाकालीच्या नामाचा गजर होत असून शहरातील विविध सामाजिक -धार्मिक मंडळे यात सहभागी झाली आहेत. सुप्रसिद्ध जागरण गायक लखबीर सिंह लक्खा यांचे सुपुत्र पन्नासिंग गिल या संपूर्ण यात्रेत लाईव्ह गितगायन करत असून यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीने भारले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 30, 2025 14:30:39
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 30, 2025 13:48:48
Buldhana, Maharashtra:बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांची शेतकऱ्यांसाठी मोठी मदत! अँकर : राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटात सापडलेल्या उध्वस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःचे दोन भूखंड (प्लॉट) विकून त्यातून मिळालेले २५ लाख रुपये थेट मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (Chief Minister's Relief Fund) जमा केले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत आमदार संजय गायकवाड यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी तातडीने आपली मालमत्ता विकून जी रक्कम आली, ती शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिली आहे. या २५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) काढून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःची मालमत्ता विकून तातडीने एवढी मोठी रक्कम देणारे संजय गायकवाड हे राज्यातील पहिले आमदार ठरले आहेत. त्यांच्या या कृतीने शेतकरी वर्गाला मोठा आधार मिळाला असून, राजकीय वर्तुळातून त्यांच्या या निर्णयाचे विशेष कौतुक होत आहे. byte - संजय गायकवाड, आमदार बुलढाणा
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 30, 2025 12:51:30
Khed, Maharashtra:पुण्याच्या खेड तालुक्यातील ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवासच आता प्रवाशांसह विद्यार्थींना धोक्याचा वाटु लागलाय.. कडुस कोहिंडे रोडवर दोन एसटी बसचा समोरासमोर धडकीचा अपघाताचा थरार प्रवाशांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अनुभवला यावेळी एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी बाजुला घेतल्याने मोठ्या अपघाताचा प्रसंग टळला यावेळी दोन एसटी बस ग्रामीण भागातील रस्त्यावर धावताना भरधाव वेगाने धावत होत्या यावेळी एकमेकांना कट मारण्याच्या नादात हा भिषण अपघात झाला यावेळी प्रवाशांनी अपघाताचा थरार डोळ्यासमोर अनुभवल्याने आता एसटी बसचा प्रवासही सुखरुप नसल्याची भावना व्यक्त केलीय
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 30, 2025 12:50:59
Kalyan, Maharashtra:पथदिवे दुरुस्त करताना हाय टेन्शन वायरचा संपर्क आल्याने केडीएमसी विदयुय विभागात खाजगी काम करणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू.. ​कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात आज दुपारच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू. संदीप चौधरी असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव; तो कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) खाजगी ठेकेदाराचा कामगार होता. पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना संदीप चौधरी याचा महावितरणच्या हाय टेन्शन वायरला संपर्कात आल्याने विजेचा जोरदार विजेचा झटका बसला. पथदिव्यांमध्ये विविध विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे कंत्राटी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 30, 2025 12:50:36
Oros, Maharashtra:शाळेत सरस्वती पूजन करून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एक मुलगा जागीच ठार झाला. तर अन्य दोघे विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर कुठाळ झाराप फाटा येथे घडली. राज पेडणेकर असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याच्यासमवेत सोहम परब व लवू रविंद्र पेडणेकर हे दोघे जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. जोपर्यंत कार चालकावर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र पोलीसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 30, 2025 12:33:11
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 30, 2025 12:31:25
Yavatmal, Maharashtra:राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात पुसद येथे आदिवासी समाजाने विराट मोर्चा काढून बंजारा व धनगर याच्यासह कुठल्याच समाजाची आदिवासींमध्ये घुसखोरी खपवून घेणार नाही असा इशारा दिला. भाजपाचे आमदार राजू तोडसाम, आमदार भीमराव केराम व भाजप जिल्हाध्यक्ष आरती फुफाटे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. आरक्षणासाठी जीआर नाही तर डॉक्टर बी आर आंबेडकर नावाचा बाप लागतो असे लक्षवेधी फलक त्याचप्रमाणे आदिवासी क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा घेऊन मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते. बाईट - राजू तोडसाम, आमदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 30, 2025 12:30:42
Jalna, Maharashtra:जालना : अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा दूर,ई -केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथील, कृषीमंत्री भरणे यांची घोषणा, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया(सुधारीत) अँकर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरेपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 30, 2025 12:25:26
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत... यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत केली होती जाहीर... पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला... 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक... मुख्यमंत्री सहाय्यात निधीसाठी साई संस्थान देणार 5 कोटी रुपये... राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीचे साई संस्थान मदतीसाठी सरसावले... यापूर्वीही देशातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थाकडून दिली गेली भरघोस मदत... आता राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थानने पुन्हा जपली सामाजिक बांधिलकी...
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top