Back
मुख्यमंत्री ने ई-केवायसी अटी रद्द की घोषणा, लेकिन किसानों के पैसे फँस क्यों?
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 02:18:31
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केवायसी ची अट रद्दण्यात आलेली आहे, ई केवायसी मुळे कुठल्याही शेतकऱ्याला आता त्रास होणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली होती मात्र खरंच ही अट रद्द केली आहे का तर याचे उत्तर साफ नाही आहे... कारण प्रशासन पातळीवर अजूनही लाखो शेतकऱ्यांचे पैसे फक्त इ-केवायसी मुळे अडकून पडलेले आहेत..छत्रपती संभाजी नगर विभागीय प्रशासनांना जून ते ऑगस्ट या दरम्यान अतिवृष्टी मुळे शेतीचे जे नुकसान झालं होतं त्यासाठी राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती त्यानुसार 1418 कोटी रुपये विभागीय आयुक्त प्रशासनाला मिळाले... छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांसाठीचे हे पैसे आहेत.. त्यापैकी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 885 करोड मागणीच्या यादी 8 ही जिल्ह्यातून या पोर्टलवर अपलोड झाले आहे आणि त्यापैकी फक्त आतापर्यंत 88.22 करोड रुपयांचं वाटप झालं आहे तर 746.43 कोटी हे वाटप फक्त ई-केवायसी पेंडिंग असल्यामुळे झालं नाहीये, हा निधी येऊन आता 15 दिवस उलटले आहे , मुळात हा निधी कमी आल्याची ओरड आहे त्यात 1418 कोटीपैकी प्रशासन कडे 885 कोटींच्या यादी आल्यात म्हणजे 40 टक्के अजून यादीच अपलोड नाही त्यात 90 टक्के पैसे ई-केवायसी मुळे अडकले असतील तर ही शेतकऱ्यांना तातडीची मदत आहे का असाच प्रश्न पडतोय सोबतच मुख्यमंत्र्यांनी ही केवायसी ची अट रद्द केली अशी घोषणा केली होती त्याचं काय झालं असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय त्यामुळे मदतीची ही संथगती शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.... मुळावर कशी हे ही बघा शेतकऱ्याच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारीची आहे. मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी काळात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रोज 2 ते 3 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला देखील पाच पेक्षा अधिक आत्महत्या झाल्या असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. तर जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात मराठवाड्यातील 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आत्महत्यांचा उच्चांक झाला आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 05:18:130
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 07, 2025 05:03:380
Report
UPUmesh Parab
FollowOct 07, 2025 04:47:410
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 07, 2025 04:45:150
Report
KJKunal Jamdade
FollowOct 07, 2025 04:34:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowOct 07, 2025 04:33:480
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:15:420
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 04:05:500
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowOct 07, 2025 04:00:350
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:50:070
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:49:512
Report
JMJAVED MULANI
FollowOct 07, 2025 03:48:480
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:48:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 07, 2025 03:47:410
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 07, 2025 03:47:290
Report